प्रामुख्याने तेली समाज मोठय़ा प्रमाणात पूर्व नागपुरात आहे. पण बदलत्या काळात अनेक तेली बांधव पश्चिम नागपुरात स्थायिक झाले. विखुरले गेल्यामुळे त्यांचा समाजाशी असणारा संबंध-संपर्क कमी झाला. समाज एकसंघ राहावा, या हेतूने ही संघटना शंकरराव भुते यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली. या माध्यमातून पश्चिम नागपुरातील सर्व बांधवांना विविध उपक्रमांतून एकत्रित करण्याचे काम होते आहे. प्रामुख्याने मकरसंक्रांत आणि विजयादशमीचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. गुलाब जुननकर आणि नरेश चोपकर यांचे सहकार्य यासाठी भुते यांना मिळते आहे.