नागपुर नंदनवन येथे संत जगनाडे महाराज यांचे स्मारक तयार करण्यात आले. संताजींचे कार्य आणि उपदेश सातत्याने समाजाच्या समोर राहावा आणि त्यांच्या विचारांवर जगण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. विठ्ठलराव खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. संताजींच्या हातात लेखणी आहे आणि ते लिहित असल्याचे दृश्य साकारणारा हा पुतळा संपूर्ण भारतात एकमेव आहे. संताजी हे संत तुकाराम महाराजांचे लेखनिक होते. त्यांचे अभंग संताजींनी लिहून काढले आहेत. स्मारक समितीच्यावतीनेही विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वयंरोजगार प्रशिक्षण, मेळावे आदींचे आयोजन समितीतर्फे करण्यात येते. समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे आणि विश्वस्त आ. कृष्णा खोपडे समितीचे कार्य समोर नेत आहेत. याशिवाय अनिल ढोबळे, राजेंद्र पिसे, कृष्णा घुग्गुसकर आदी मान्यवर मंडळी विविध उपक्रम राबवीत आहेत.