शिरूर - महिला सक्षम व संघटीत तरच समाज वैभव संपन्न होणार आहे. या संघटने साठी. महिला बचत गटा द्वारे संघटीत होत आहेत. तेली महासभेचे कार्य हाती घेताच पुणे ग्रामिण मध्ये काही बचत गट कार्यरथ झाले. शिरूर शहरातून याची सुरूवात गत दोन वर्ष सुरू आहे. किमान अडचणीला ५० हजार रूपये इथे मिळताच महिला भक्कम पणे उभ्या राहु शकतात. संसदेने महिला साठी सामाजिक, राजकीय आर्थिक संपत्ततेला संधी दिली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी महिला संघटीत होणे गरजेचे आहे. काही ठराविक गावातच समाजाची दहा घरे आहेत. बर्याच गावात १ ते ३ घरे आहेत. या समाज बांधवांची सामाजीक, राजकीय आर्थीक अवस्था दयनीय आसते. या घरातील महिलांना खर्या अर्थाने मदतीची गरज आहे. मी भविष्यात मिळावी यासाठी महाराष्ट्र तेली महासभे तर्फे आम्ही प्रयत्नशील राहु.