भांडारकर च्या संग्रहात दुर्मीळ हस्तलिखित
श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या हस्तक्षरातील संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगाची वही पंढरपूर संशोधन मंडळाला सापडली आहे. शके 1731 म्हणजेच इसवी सन. 1731 मधील दुर्मीळ हस्तलिखित असलेला हा अनमोल खजिना भांडरकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या संग्रहात आहे. या वाह्यांची एक प्रत मराठी हस्तलिखित केंद्राकडे आहे.
हे दुर्मीळ हस्तलिखित पंढरपुर संशोधन मंडळाकडे होते. पंढरपूर येथे वास्तव्यास असलेले संतसाहित्याचे ज्येषइ अभ्यासक भा. पं. बहिरट आकण अॅड. वामनराव आत्रे यांच्या मदतीने संताजी महाराज जगनाडे यांच्या हस्ताक्षरातील अभंगाची वही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी गंथपाल वपा.ल. मंजुळ यांनी दिली. हे अभंग संताजी जगनाडे यांनी लिहिले आहेत असे संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि संतसाहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनीही सांगितले आहे, अशी माहिती दुर्मीळ हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.
संताजी नंतर ही वही संताजी महाराजंचे जेश्ठ पुत्र बळाजी जगनाडे यांच्याकडे आणि त्यांच्यानंतर नातू भागोजी जगनाडे यांच्याकडे परंपरेने चालत आली. संत तुकारामाच्या अभंगग गाथ्ाेतील सर्वांत जुनी प्रत म्हणून ही वही संशोधकांनाही मान्य असल्याचे मंजूळे यांनी सांगितले.
वहीच्या पृष्ठ क्रमांक 308 वर सके 1653 विरोध नाम सवत्सरे श्रावण सुध पंचमी बुधवार या दिवशी लेखन समाप्त झाल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अभंगावर वीठल अशी नोंद आहे त्या काळी शुद्धलेखनाचे नियम अस्तित्वात नसल्याने विठ्ठल असा उल्लेख दिसत नाही. संताजी महाराज जगनाडे यांच्या हस्ताक्षरातील र हे अक्षर वेगह्या पद्धतीने लिहिण्यात आलेले आहे. अभंग लेखनपद्धती याचा व्यापक संशेाधनातून आणखी नवी माहिती प्रकाशात येऊ शकेल, असेही मंजूळ यांनी सांगीतले.