औरंगाबाद - आमचा पारंपारिक असा तेलाचा धंदा बसतोय... अशावेळी सरकारने आम्हाला विविध सवलती देण्याची गरज निर्माण झाली आहे अशी भावना शहरातील तेली समाज बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी बी.टी. शिंदे, संतोष चौधरी, जे. यू. मिटकर, कचरू वेळंजकर, मनोज संतान्से, विश्वनाथ गवळी, कृष्णा ठोंबरे, ऑड. गजानन क्षीरसागर, भारत कसबेकर, निखिल मिटकर, अॅड. दीपक राऊत आदींनी सहभागी होऊन तेली समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा केली.
विदेशातील तेल 60 टक्के आयात होत आहे. करडीचे पीक कमी होत चालले आहे. आयते तेल येऊ लागल्या मुळे तेली समाजाच्या पारंपारिक धंद्यावर फार मोठा परिणाम झाला. आहे. खादी बोडर्ज्ञच्या सवलतीही बंद झाल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. चार टक्के व्याजदराने पूर्वी कर्ज मिळायचे. ते पूर्ववत चालू करण्यात यावे, एमआयडीसीत तेली समाज ला प्राधान्याने भुखंड देण्यात यावे. संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
क्रिमिलेअरची अट टाकायला नको. जातीचे प्रमाणपत्र सक्तीचे केल्यामुळे शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क मिळू शकत नाही, जातीनिहाय जनगणना वारंवार मागणी करूनही होत नाही. महिला आरक्षणाचा कायदा करण्यात यावा, अशा ओबीसींच्या अनुषंगानेही मागण्या या मंडळींनी केल्या.
महाराष्ट्रात सुमारे पन्नास लाख तेली समाज बांधव असुन चंद्रशेखर बान्नकुळे हे सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. एत खासदार व पाच आमदार तेली समाजाचे निवडून आले आहेत.