देशभरातील तेली समाजाची संख्या 14 कोटी आहे. काही राज्यामध्ये तेली मसाज एनटीत आहे. महाराष्ट्रात काही राज्यांमध्ये हा समाज ओबीसीत आहे. आज ओबीसीत सवलतीच नाहीत. त्यातल्या जातींची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तेलीच असलेला तिरूमल समाज एनटीत आहे. आमचे रोटी बेटा व्यवहार होतात; पण मराठवाड्यात व उर्वरित महाराष्ट्रात ओबीसीत आहे.
हा फरक नाहीसा करण्यासाठी देशभरातील तेली समाज एनटीत समाविष्ट करण्यात यावा.. अशी आमची मागणी आहे. 7 जानेवारीला छत्तीसगड येथे जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तेली समाजाची बैठक आहे. तिसर्या सुचित तेली समाजाचा समावेश करण्यात यावा. या मागणीवर यावेळी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.