क्रांतीकारी अभिवादन संत जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर
बहुजनरत्न मानवतावादी संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरू तुकारामाच्या ग्रंथाचे लिखान करून संत तुकारामाच्या वैचारिक-विज्ञाननिष्ठ विचार जिवंत ठेवला. 8 डिसेंबर संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आपण संत तुकाराम व संताजीच्या वैचारिक विचाराचा वारसा बहुजन समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याकरिता कार्यरत रहावे. बहुजन समाजातील ओबीसी घटक मोठ्या प्रमाणात श्रद्धेच्या नावाखाली कर्मकांड व अनावश्यक धार्मिक रूढी परंपरेत आपली तन-मन-धनशक्ती वाया घालवित आहे. कुठलिही गोष्ट जोपर्यंत चिकित्सा न करता स्विकारणे म्हणजे श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धेच्या आहारी जाणे होय.
प्रस्तापित भट ब्राह्मणवाद व पुंजीवाल परास्त करण्यासाठीी बहुजन संत व फुले-शाहू-आंबेडकरासारखे क्रांतीकारी महापुरूषांचे विार कार्य आत्मसाथ करणे आज सुद्धा काळाची गरज आहे.