माजीमंत्री जयदत्त क्षिरसागरसह दिग्गजांची उपस्थिती
अमरावती :- अमरावती जिल्हा तैलिक समितीतर्फे आयोजीत विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुला- मुलींच्या परिचय महामेळाव्याचे भव्य आयोजन व कुर्यात सदा मंगलम पुस्तिकेचे प्रकाशन 17 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजीमंत्री आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते केले जाईल.
अध्यक्षस्थानी जिल्हा तैलीक समितीचे अध्यक्ष मधुकर सव्वालाखे तर स्वागतअध्यक्ष म्हणून चंद्रकांत मेहरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, माजी, खा. सुरेश वाघमारे, माजीमंत्री जगदीश गुप्ता, वाशिमचे निवासी उपजिल्हाधिक शैलेश, अभिजित वंजारी, प्रिया महेंद्रे, प्रदीप पडोळे, दिलीप क्षिरसागर, संजय बिजवे, प्रमोद ढांगे, विलास काळे, प्रा. डॉ. राजेश पाचपोर, राजू फटिंग, अनंत बिजवे, डॉ. दीपक शिरभाते, शंकर श्रीराव, रूपेश वाघमारे, देवानंद सुने, सुरेश तल्हेकर, ररूज अजमिरे, अविनाश टाके, लिमिंद ढोले, लक्ष्मण हांडे, रजू श्रराव, महादेव गुल्हाणे, नंदू रावेकर उपस्थित राहणार आहेत.
17 डिसेंबरला सकाळी 9 वाजता उपवर मुला - मुलींची नोंदणी सकाळी 10.30 वाजता उपवर मुला - मुलींच्या परिचय मेळाव्याचे उद्घाटन, सकाळी 11 वाजता उवर मुला - मुलींचा मंचावरून प्रत्यक्ष परिचय, आलेल्या सर्व समाज बांधवाकिरता सकाही 9 ते 10.30 वाजता आल्पोहार, दुपारी 3 वाजता सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कुर्यात सदा मंगलम पुस्तिकेचे दुपारी 1 वाजता खा. रामदास तडस, माजी खा. सुरेश वाघमारे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, शैलेश हिंगे, अभिजित वंजारी यांचे हस्ते प्रकाशन होणार आहे. समाज बांधवानी व उपवर मुला - मुलींनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आव्हाण जिल्हा तैलिक समितीचे अध्यक्ष मधुकर सव्वालाखे, उपाध्यक्ष प्रा. संजय आसोले, प्रकाश बनारसे, सचिव गंगाधर आसोल, कोषाध्यक्ष रमेश शिरभाते, संचालक प्रभाकर गुल्हाणे, डॉ. प्रा. अनुप शिरभाते, डॉ. मुंकुद नाहे, डॉ. रंजना बनारसे , अविनाश राजगुरे, किशोर शहाळे, अतुल बिजवे यांनी केले.