संताजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी, समाजबांधवांची उपस्थिती
तेली समाजाच समग्र इतिहास सर्वांसमोर यावा : डॉ. महेंद्र धावडे
संताजी सेना अकोला - तेली समाजाचा प्रलग्भ इतिहास असून, महापुरूषांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची गरज आहे. तैलिक वशंच्या अनेक विभुतींनी कर्तृव्य बजावले आहे. त्याविषयी समाजाला माहिती झाल्यास प्रेरणा मिळू शकेल, असा विश्वास समाजाचे गाढे अभ्यासक डॉ. महेंद्र धावडे यांनी व्यक्त केला.
समाजाचे दैवत संताजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. प्रमिलाताई ओक सभागृहात शुक्रवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड होते. तर प्रमुख अतथी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबअकर होते. गोपाल भिरड, डॉ. योगेश साहू, अॅड. आनंद गोदे, प्रकाश डवले, सुधाकर झावर्डेख रामेश्वर वानखडे, अरविंद देइे, संजय वनखडे, मदन भिरड, मनोज साकरकर, गणेश पोलावरे, राजू झापर्डे, हरिश्चंद्र धनभर, महादेवराव राठोड, प्रमोद देंडवे, रमेश गोतमारे, सुमनताई इचे, कल्पनाताई तावडे, नगरसेविका किरणताई बोराखडे, पुष्पाताई गोतमारे, संजय जिरापुरे, सुरेश खोडे व्यापीठावर होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. देवशीष काकड, प्रमोद देडवे, योगेश गोतमारे, विश्वनाथ भगत, जितेश नालट, मनोज जुमळे, सचिन थोटागे, श्रेयस भिरड सागर जटिले, आदित्य खरपकार, शंतनू माहोरे, सचिन आगाशे, रवी बनसोडे, श्याम थोटागे, अनिता भिरड, यांनी पाहुण्याचे स्वागत केले. डॉ. रामदास आंबटकर म्हणाले, ज्या समाजाने वर्षानुवर्षे कष्ट उपसले तो तेली समाज अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे. जनगणनेच्या 13 टक्के असलेल्या समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. जुन्याला नव्याने जोडून सांगड घालावी लागेल. सम्राट चंद्रुतंची परंपरा आमची आहे, याचा विसर पडू नय. समाजाच्या अस्मितेसाठी आम्ही चंग बांधला पाहिजे. अध्यक्षीय भाषणात बालमुकुंद भिरड यांनही मागदर्शन केले. युवकांनी विविध उपक्रमातून आनपले अस्तित्व टिकावावे या मद्शावर त्यांनी भर दिला. जय संताजी महाराज असा जयषारेघ करण्यात आला. साक्षी अवचार, गायत्री सरोदे या गुणवंत विद्यार्थिनींचा तसेच समाजातील मान्यवरांचा सत्कार केला. संचालन अमर भागवत यांनी तर आभार अँड.% देवाशीष काकडे यांनी मानले.