संताजी सेना - राठेड बंगल्यापासून दुपारी 12.30 वाजता शोभायात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेच्या आग्रभागबी आश्वारूढ युवती होत्या, त्यानंतर महिला भजनी मंडळ, दिंड्या, पाठोपाठ एक सुशोभित वाहनावर संताजी महाराजचीं मुर्ती आरूढ होती. मंगलवाद्यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महानगर अध्यक्ष श्रेयस भिरड, मंगेश गोतमारे, मनोज जुमळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. देवाशीष काकड, बालमुकुंद भिरड, गोपाल भिरड, यांच्यासह समाजबांधव शोभायात्रेत सहभागी होते. जयहिंद चौकामध्ये सुधाकर झापर्डे रमेशभाऊ वानखडे यांनी चहापाण्याची व्यवस्था केली होती. पप्पु वानखडे, नितीन वनखडे, भूषण भिरड आणि सहकार्यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. बांधी चौकातही स्वागत करण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade