पैठण - जगदगुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांचे पैठण येथे श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा पैठण येथे भव्य मंदीर असुन तेली समाजाची भव्य धर्मशाळा आहे. धर्मशाळा सर्व लोकोपयोगी असुन या धर्मशाळेत दरवर्षी श्री. संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन केले जाते. या वर्षी नाथवंशज श्रीनाथ बुवा गोसावी यांचे अमृतवाणीतुन एकनाथी भागवताचे आयोजन केले आहे.
त्यांना सोबत नाथवंशज ह.भ.प. पुष्कर महाराज गोसावी पण आहेत. साथसंगत श्री गोर्डे सर व ऋषिकेश साबनकर हे असुन मार्गशिर्ष वद्य 13 म्हणजे दि. 16/12/2017 ला संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त ह.भ.प. किशोर महाराज भिसे विश्वासानंद संस्थान कांबी यांचे पुण्यतिथी किर्तन होऊन पुण्यतिथी महापंगत धर्मशाळेचे अध्यक्ष श्री. विक्रमशेठ सर्जे यांची झाली. व तसेच सप्ताहादरम्यान कोंडीरामजी मिटकर, एकनाथजी क्षिरसागर वाहेगांव, गंगाधर म्हस्के, नारायण भागवत पिंपळवाडी, रामनाथजी ससाणे, सखाराम शिदलंबे औरंगाबाद, शिवनाथ म्हस्के, मोहन व्यवहारे लाडजळगांव, उत्तमराव लोखंडे औरंगाबाद, बद्रीनाथ सर्जे, यशवंत मामा बरकसे, लक्ष्मण उचित सर, विजय काळे अहमदनगर, कचरूशेठ गवळी गोंदी, व महाप्रसाद प्रकाशशेठ शिदलंबे तुर्काबाद तर चहापाण सोमनाथ लगडे कातपुर, यांनी सप्ताहादरम्यान अन्नदान करत आहे.
सप्ताह यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष विक्रमशेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारशेठ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे, संस्थेचे सचिव भगवानराव मिटकर, सहसचिव एकनाथ क्षिरसागर, सदस्य शिवमुर्ती ससाणे, सखाराम शिदलंबे, गंगाधर म्हस्के, डॉ. गंगाधर क्षिरसागर, भारतशेठ कसबेकर, मधु अण्णा शिदलंबे, तसेच तुळशीदास खर्गे, झुंंबरलाल व्यवहारे, विष्णु मिसाळ, कल्याण क्षिरसागर, गोकुळ बरकसे, दामुअण्णा उचित, श्री, प्रकाशशेठ शिदलंबे यांची विशेष उपस्थिती असुन सोनाजी म्हस्के, बबनराव क्षिरसागर, सुनिल लोखंडे, किशोर खर्गे, विजय क्षिरसागर, योगेश दारूणकर, माऊली क्षिरसागर, दत्तात्रय ताकपिर, आदी परिश्रम घेत आहेत.
पुण्यतिथीच्या दिवशी प्रत्येक गावात पुण्यतिथी उत्सव होतात. काहीजण संताजी महाराज समाधी स्थळ श्रीक्षेत्र सदुुंबरे येथे जातात त्यामुळे पैठण येथील उत्सवात सर्वांना सहभागी होता येत नाही. म्हणुन पैठण येथील कार्यक्रमात पुण्यतिथी मध्ये सप्ताहाच्या मध्ये घेतले जाते. तरी दि. 20./12/2017 रोजी सकाळी 8 ते 10 भव्य शोभा यात्रा 10 ते 12 ह.भ.प.कृष्णा महाराज नवले यांचे काल्याचे किर्तन आहे. व नंतर महाप्रसाद तरी सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे कार्यकारी विश्वस्त मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येत अहिे.