शिरवळ - मधील श्री संताजी महाराज तेली महिला बचत गट व श्री संत जगनाडे महाराज तेली महिला बचत गट यांच्या मार्फत शिरवळमध्ये श्री संताजी महाराज पुण्यतिथी सजारी करण्यात आली. यामध्ये समाजातील सर्व महिला व तरुण वर्ग सहभागी झाली होती. या दिवशी समाज प्रबोधन पर डॉ. विधाते मॅडम यांचे सुखी होणे सोपे दु:खी होणे अवघड हे व्याख्यान ठेवण्यात आले होेते.
या वेळी समाजातील वयोवृद्ध महिला इंदुमती क्षीरसागर, मानन किर्वे, सुलोचना किरवे, कमल दाभोळे, शंकुतला देशमाने यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सर्वाचे स्वागत सौ. सुरेखा हाडके यांनी केले तसेच फोटो पुजनानतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यांचालाभ सर्व समाज बंधु भगिनीनी घेतला आभार अंबिका देशमाने यांनी मानले. सामाजातील व गटातील सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखविली दोन्ही गटाचे अध्यक्ष सौ. सुमन दाभोळे सौ. अनुराधा दळवी सचिव सौ. सुरेखा हाडके सौ. चंद्रकला राऊत यांनी कार्यक्रम व्यवस्थित नियोजनबद्ध पार पडला. सर्व गटातील सभासदांची कार्यक्रमासाठी भरपुर योगदान दिले. यामुळे कार्यक्रम छान पार पडला.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade