दि. १९/मार्च/२०१७ रोजी सोमवारी क्वार्टर, नागपूर येथील संताजी सभागृहात तेली समाज सभा, नागपूर जिल्हा अंतर्गत उंच माझा झोका—महिला मंचच्या संपूर्ण चमुने जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर तेली समाजातिल कर्तुत्त्ववान महिलांचा गुणगौरव, सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा व आनंद मेळावा असे कार्यक्रम अतिशय भव्य स्वरूपात व थाटामाटात समाजबंधु—भगिनींच्या साक्षीने पार पाडले.
.........सदर कार्यक्रमास.......
उद्घाटक—नागपूर नगरीच्या सन्माननिय महापौर—सौ. नंदाताई जिचकार
अध्यक्षा— कळमैश्वर तालुक्याच्या सन्माननिय नगराध्यक्षा— सौ. स्मृती ईखार
प्र. पाहुण्या—सन्माननिय डाॅ. सौ. आसावरी देशमुख
यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
*सदर कार्यक्रमास पारंपारिकतेला आधुनिकतेची छटा असलेल्या महिलांच्या ड्रेस कोडची महापौरांनी 'महिलांचे सक्षमिकरण" या शब्दांत पोचपावती दिली.
**महापौरांच्या हस्ते सत्कार प्राप्त**
*****कर्तृत्त्ववान महिला*****
* श्रीमती मीराबाई बळवाईक (गृहिणी)
* सौ. ललीता अवचट रंधावा (क्रिडा)
* सौ. सुनंदा खोरगडे (सामाजिक)
* सौ. शीतल किंमतकर (अपंग)
* कु. अनुश्री कुंभलकर (विद्यार्थिनी)
घरातील कामे सांभाळून सर्वांची मने जपणाऱ्या घरातील *जीवनरेखा (lifeline) हीचं स्वास्थ्य* निरोगी राहावं ( तिच्या मुळेच संपूर्ण घराचं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य निरोगी रहाते ) यावर डाॅ. आसावरी देशमुखांचे मार्गदर्शन उपस्थितांच्या ह्रदयात जागा करून गेले.
जिजाऊ,सावित्री, बहिणा, इंदिरा यांची आठवण करून देत सौ. स्मृती ईखार यांनी असे कार्यक्रम घेऊन स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी पुढे सरसावलेल्या उंच माझा झोकाच्या समस्त चमु व त्यांना प्रोत्साहित करणार्या तेली समाज सभाचे सर्व पदाधिकारी तसेच आयोजक चमु व अप्रत्यक्ष मदत करणार्या सर्व समाजबांधवांचे विशेष अभिनंदन केले.
मंचचालन मंगला चरडे व निषा दांडेकर, तर आभार प्रदर्शन रोहिणी भावळकर या सख्यांनी केले.
'सौंदर्य सम्राज्ञी' या स्पर्धेचे महत्त्व वाढविले ते किरण ढोबळे आणि मृणाल रेवतकर या दोन सख्यांच्या मस्त—जबरदस्त anchoring ने आणि खेळाडू वृत्तिने सामोर येणार्या २० सख्यांमुळे. महत्त्वाचे म्हणजे, खेळाच्या प्रत्येक फेरी दरम्यान 'लकी ड्रॉ' आणि प्रश्नोत्तरांच्पा माध्यमातून सभागृहात शेवटपर्यंत उत्साह होता.
*स्पर्धेत प्रथम (पैठणी) विजेती—सौ.वंदना गायधने
* उपविजेती — सौ. शारदा वैद्य
आणि
*सौंदर्यसम्राज्ञी — सौ. चित्रा माकडे
ह्या ठरल्या.
माता/ भगिनी साठी हाच सण, सोहळा,उत्सव.... आगतिक मनाचा जागतिक महिला दिवस एवढ्याच पुरता मर्यादित नसून..... 'काल त्या होत्या म्हणून आज आपण आहोत' याची उपस्थित समाज बांधवांना आठवण करुन देणारा हा दिवस ठरला..!
तेली समाज सभा नागपूर जिल्हाचे अध्यक्ष— श्री. बाबुरावजी वंजारी, कोषाध्यक्ष— श्री. चंदुजी मेहर व संपूर्ण पदाधिर्यांनी
उंच माझा झोका—महिला मंचच्या संपूर्ण टिमचे कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी कौतुक केले व पुढील वाटचालीस मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या.....~*