पेण :- येथिल तेली समाज सेविका सौ. चंपाबाई उर्फ मंगला वैरागी यांचे पनवेल येथे दि. १०/१/२०१५ रोजी हृदय विकराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. भाव, भावना व अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम असणार्या सौ. चंपाबाई यांचे जन्मग्राम पनवेल असुन येथील प्रसिद्ध पन्हाळे कुटूंबातील स्व. आबासाहेब पन्हाळे, माजी पनवेल नगरपालिका अध्यक्ष आणि माजी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष यांची ती पुतणी होती. सौ. चंपाबाई शिक्षण, बालपण व तारूण्य पनवेल येथेच गेले. बालपणापासूनच समाज सेवेच्या संस्कृतीत वाढलेल्या सौ. चंपाबाई या शैक्षणिक जिवनांत चागल्या बॅडमैटन पटु होत्या. तसेच संगीत क्षेत्रात पेटीवादन व गायिकाही होत्या. मागासलेल्या तेली समाजांतील महिलांच्या समाज कार्यात सेवेचा हात आणि दानांची मदत त्यांच्याकडून वारंवार घडून आलेल्या आहेत.
पेणचे ज्येष्ठ पत्रकार श्री. भालचंद्र वैरागी यांच्या त्या पत्नी होत्या. पत्रकार वैरागी बंधु यांच्या साहित्य सेवेत त्या नेहमी सहभागी होत. आदर्श गृहिणी, माता व स्तुतीमय जीवन त्या जगल्या अश्या या समाजसेविका आणि विचारशील सौ. चंपाबाई वैरागी यांच्या अंत्यविधीला नाशिक, मुंबई, पुणे, रायगड जिल्हा येथिल मोठ्या प्रमाणात समाज बांधव तसेच आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक श्री. राजु सोनी, श्री. संतोष भोसले व इतर राजकीय क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली वाहिली व भुषण कर्डीले, गजानन शेलार, व्यवहारे काका, शरद महाले, विलास त्रिंबककर, बापु भागवत, चंद्रकांत वाव्हळ, विजय रत्नपारखी, सुनिल चौधरी, चंद्रकांत दुर्गडे, शैलेश मखामले, पोपटराव गवळी, विभुते, शरद तेली, मेहेर आणि प्रदिप सायकर आदिंनी भावपूर्ण श्रद्धांजली दुरध्वनीवरून दिल्या.
त्यांना तीन मुले व एक मुलगी ही अपत्ये असून पनवेलचे स्थायिक श्री. सतीश वैरागी अध्यक्ष कोकण प्रदेश तेली प्रांतिक महासभा व पनवेलच्या नुकताच पार पडलेल्या तेली वधुवर पालक मेळाव्याचे अध्यक्ष व पनवेल तेली साजाचे उपाध्यक्ष हे त्यांचे पूत्र आहेत.