तसा मी व्यवसायीक सुर्य उगवताच घाण्याच्या बैला प्रमाणे व्यवसायात गुंतावे यातुन विश्रांती यातुन विसावा कधी मिळेल हे मला सांगता येत नव्हते. पण व्यवसायात गुंतल्या नंतर ही माझे संवेदना क्षम मन मला शांत बसु देत नव्हते यातुन दुर व्हावे, यातुन सवड काढावी, यातुन मिळणारी प्रतिष्ठा समाजासाठी वापरावी ही रूख रूख मला होती मी जमेल तेवढे समाज कार्य करीत होतो. याच वाटेवर मला श्री. विजय रत्नपारखी व श्री. सुभाष पन्हाळे भेटले आणि मला पुणे जिल्हा (प.) अध्यक्षपद मिळाले. या पदाने जी दिशा मिळाली त्यांची ही तोंड ओळख.
माझ्या सहित आम्ही पाच भावंडे. घरचा परंपरेचा धंदा संपलेला. वाड वडिलांनी जीवापाड जपलेली जमिन तेवढीच उशाला. यावर कसे तरी घर चालत होते. गावच्या शाळेत कसा तरी दहावी पास झालो. परिक्षा पद्धती बदलेली ते पहिल्या वर्षी तरी बर्या पैकी मार्क मिळवण्यात आघाडीवर होतो. घरात शिक्षण घ्यावे अशी अवस्थाच नव्हती. भाकरीचा प्रश्न मिटवणे हीच दिशा होती. चार भिंतीतल्या शाळे पेक्षा मला भाकरी मिळवण्याच्या शाळेत खुप शिकता आले. कारण या शाळेत मी दाखल होताच आईसक्रिम दोन पैशाना आणुन ५ पैशाला विकु लागलो. मान आपमान पेक्षा पैसा महत्वाचा मतो मिळवु लागलो मिसरूड फुटू लागण्याच्या काळात हा व्यवसाय तसा सिझनेबल. यात भांडवल कमी आणि उत्पन्न ही तेवढेच. परंतु चार पैसे जवळ साचताच लाल मिरची नारायणगांव, नगर, पुणे येथे जाऊन घेऊन येत आसे. ही मिरची आठवडे बाजारात विकु लागलो. या ठिकाणी एक कळुन चुकलो जो. आठवडे बाजारात खर्या अर्थाने गिर्हाईक समजु शकतो. विक्रीचे परिपुर्ण ज्ञान घेतले ते जीवनाच्या व्यवहारात यशस्वी झाला. हे बाळकडू मिरची व्यवसायात मिळाले यातुन भुसार, तांदुळ वाटाणा, विक्री करू लागले व्यवसायाचे स्वरूप तेच होते. माल जवळ पास खरेदी करण्यापेक्षा ज्या ठिकाणी उत्पन्न होते त्या जागेवर जावुन खरेदी करणे. खरेदी केलेला माल किरकोळ व होलसेल मध्ये विक्री करू लागलो. या व्यवसायातुन मला बरेच शिकता आले. मी बराच स्थीर झालो. ही स्थिरता मला शांत बसु देत नव्हती. वेगळी झेप मला हाका मारत होती. तांदुळ किंवा इतर भुसार माल खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागात जात होतो. तेंव्हा प्रवासात जेवन हे कोणत्याही हॉटेलवर करावे लागे. आणि हे जेवण करताना मी बारकाईने शोधु लागलो. काही हॉटेल मालका बरोबर काही ढाबा मालका बरोबर प्रवासात संवाद साधला या संवदातुन एक विद्यार्थी बनुन मी व्यवसाय समजुन घेतला. आणि पुर्ण तयारीनिशी हॉटेल हेमंत ढाबा नाशीक रोडला सुरू केला. ५ ते ६ तास झोप ही ठरलेली आचारी व कामगार हि खरी या क्षेत्रातील साटवण. आशी मंडळी गोळा करून कसे हवे ते पटवून देऊन एक दर्जा निर्माण केला एक विश्वास निर्माण केला. एक चव निर्माण केली. एक विनम्र सेवा निर्माण केली. गेली अनेक वर्ष नाशीक ते पुणे मार्गावरील हे चवीचे केंद्र निर्माण केले.
जीवनाचा प्रश्न म्हणजे पहिला भाकरीचा हा प्रश्न ज्याला काळजी पुर्वक सोडवता आला तोच भावी जीवनात वाटचाल करू शकतो. हे मला आठवडे बाजारात बाळकडू मिळालेले या बाळकडूवर वाटचाल सुरू केली असली तरी माझ्या बरोबरचे नातलग, माझ्या बरोबरचे सोबती हे सुद्धा माझे आहेत. मी या समाजात जन्म घेतला म्हणुन सोबतीला आलेले कडू व गोड अनुभव हे माझ्या एकट्याचे नाहीतर माझ्या सोबत वावरणार्या समाजाचे ही आहेत. याचे संस्कार माझ्यावर झालेल. संत संताजी, शनिमहाराज ही समाजाची साठवण. व्यवसायातून वेळ काढुन सुदूंबरे येथे जाणे सामाजाची धडपडणारी मंडळी जवळ येताच त्यांनी योगदान मागताच त्यांना पाठबळ देणे ही प्रणाली ठेवली. आळे येथे ज्ञानेश्वरांचा वावर होता. त्या ही संस्थेत काम करू लागलो. शिकणे ही प्रणाली ठेवली या सर्व समाजातील मंडळीत वावरताना आनेक विचार पहाता आले. आनेक पदावर काम करता आले. कल्पकता संघटन व विश्वास या बाबी मी यातुन शिकलो काही तरी वेगळेपणा पाहिजे. बरोबरच्या अनेक विचारांना समजावुन घेऊन त्यांचे संघटन करता आले पाहिजे. एक रूपया देणारा व लाखो रूपये देणारा हा समान असतो त्याचा विश्वास हा समान आसतो. त्याने दिलेला विश्वास आपण गमावला नाही तर तो उद्या अधीक त्यागी बनतो. त्याचा विश्वासाला दगा दिला तर उद्या आपल्यालाच नव्हे तर अन्य चांगले काम करणार्याला ही जवळ येऊ देत नाही. ही प्रणाली मला इथे राबवता आली. तेली समाजाचे एक जुने शनी मंदिर होते या मंदिराला आकार द्यावा ही सर्वांची एकवाक्यता. शनी मंदिर उभारण्याची सुरूवात सुरू झाली. स्वत:ची समाजाची त्यागी भुमीका प्रथम उतरवली व दानशुर समाज बांधव शोधले इच्छा व्यक्त केली. मदतीचा हात मिळाला. त्या हाताला विश्वास देणे ही भुमीका वठवली या मुळे आळे येथे हेमांडपंथी मंदिर रचनेचे शनैश्वर व संताजी मंदिर उभारले. या सर्व वाटचालीत मी माझी प्रतिष्ठा माझा मान, माझी संपत्ती म्हणजे मी ही बिनबुडाची, बिन भरवश्याची वाटचाल आडवाटबनवून समाजाचा मी एक सर्व सामान्य घटक बनलो.
समाजाचा एक धागा बनुन काम करू लागलो तेली समाजाची स्फृर्ती देवताचा व समाजाची मातृसंस्था श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था या संस्थेने मला पदाधीकारी म्हणुन काम करण्याची संधी दिली. यातुन संघटन कौशल्य व जन माणसातील विश्वास सर्वा समोर आला. कदाचित या मुळेच श्री. विजय रत्नपारखी श्री. सुभाष पन्हाळे यांनी विनंती केली की तुम्ही पुणे जिल्हा ग्रामिण पश्चिमचे अध्यक्ष पद स्विकारा मी गावपातळीवरच बर्या पैकी कर्ता जिल्हा पातळीवर काम करणे आवघड. पण विश्वास दिलाच आहे. मला आपले म्हंटलेच आहे. मला जबाबदारी दिलीच आहे तर वाटचाल करूया. प्रथम कामाची, व्यप्ती, कामाचे स्वरूप जबाबदारीची मर्यादा वाटचाल व कार्य समजुन घेऊन उभा राहिलो. वाट्याला आलेल्या सहाही तालुक्यात जावुन तेथील समाज संस्था. जेष्ठ समाज बांधव यांच्याशी संवाद साधला काही ठिकाणी तर काम करण्यास समोर कोण येत नव्हते. परंतु विश्वास व स्वरूप समजताच अध्यक्ष तयार केले. त्यांच्यात आत्मविश्वास व जिद्द निर्माण करुण तालुका कमिट्या उभ्या केल्या समाजाची खाने सुमारी हा अजंठा तेली महासभेने दिलेला तो राबवणे म्हणजे हा अजंठा होय. हे सर्व पदाधीकारी व कार्यकर्त्यांना पटवुन दिला. त्यांची घडण पक्की केली. यात बराच काळ गेला.
पदाधीकारी आपल्या पदासह घरात बसुनयेत ते समाजाच्या घरा घरात जावेत शक्य तो त्यांच्या खिशााला धक्का लागु नये. जरी लागला तरी तो आधिक नसावा यासाठी स्टेशनरी पुरवली. हा सहा तालुक्यांच्या परिसर म्हणजे शक्यतो डोंबर दर्यात बसलेला बाजाराच्या गावात जेवढा समाज तेवढा खेंडो पाड्यात विखुरलेला तेंव्हा कार्यकर्ता त्या घरापर्यंत जायचा सह्याद्रीच्या कुशीत नीट रस्ता नाही. त्या दरीत त्या वस्तीवर समाजाचे एकच घर परंतु आशा घराची माहिती घेण्यास त्या ठिकाणी ४-४ वेळा जाणारे पदाधिकारी निर्माण झाले ही माहिती संकलीत होताच आपले काम झाले हे क्षणभर वाटले परंतु जिद्द व आत्मविश्वास या मुळे एकत्र आलेले बांधव शांत बसेनात ही माहिती एका ठिकाणी राहिली पुढे काय ? विशेष असा उपयोग करावयाचा असेल सुसंवाद साधावयाचा असेल संघटन बांधावयावचे असेल तर हि माहिती मुद्रित स्वरूपात प्रसिद्ध करणे तेवढेच महत्वाचे आहे. विचार मांडणे सोपे पण पुर्णत्वाकडे घेऊन जाणे महाकठिण आहे. याचा अनुभव सर्वांना आला निधी संकलन करणे मुद्रित प्रत तपासणे आगदी त्या वाडी वस्तीवरील घरात जावुन सत्यप्रत दाखवणे हे ही काम कार्यकर्ते व पदाधिकारी मंडळींनी केले.
महाराष्ट्र तेली महासभेने विश्वास दिला म्हणुन उभा राहिलो पदाधिकारी नेमून त्यांना दिशा ही दिली. परंतु समाजात जाताना त्या बांधवांचे अनेक प्रश्न कारण या पुर्वी काहींनी त्यांना अनुभव चांगले दिलेच नव्हते. त्यामुळे ती त्यांची चुक नव्हती . तर त्यांचे सत्य मत बरोबर होते. या मंडळींना कृतीतुन विश्वास दिला. पुस्तक मुद्रित करण्यासाठी गोळा झालेला निधी ज्ञानराज पतसंस्थेत मुदत ठेवीत जमा केला. त्या मुदत ठेवीच्या पावत्या घेतल्या. जमा झालेला निधी कुठे आहे हे काही विचारू लागले. त्यांना आपला दिलला विश्वास सुरक्षित आहे हे दिसताच ते म्हणु लागले काही कमी असेल तर हाक मरा हीच खरी आमची वाटचाल.
संत तुकाराम हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते या लढाईचे सरसेनापती संत संताजी जगनाडे त्यांनी इतिहास घडविला. बीड जवळच्या राजुरी गावात स्वातंत्र्य मिळताच कै. सोनाजीराव क्षिरसागर यांना सुनावले तेली समाजाने राजकारण करू नये. परंतु समाज माता कै. केशरकाकु क्षिरसागर यांनी नवा इतिहास निर्माण केला. या वाटेवर महाराष्ट्र तेली महासभा वाटचाल करू लागली. या वाटेवर मला सहा तालुक्याची जबाबदारी नव्हे तर सर्व समाज बांधवांनी व सर्व पदाधीकारी जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री सत्यवानशेठ कहाणे, सतीश दळवी सोमनाथ फल्ले, दिलीप शिंदे, राजेंद्र राऊत, गणेश शेडगे, तालुका अध्यक्ष सर्वश्री उल्हास वालझाडे, मारूती फल्ले, प्रदिप कर्पे, गणपत लोखंडे, ज्ञानेश्वर दुर्गडे गणेश पवार तालुका उपाध्यक्ष सर्वश्री सोमनाथ काळे, उमेश मारूती शिंदे, वासुदेव कर्पे, अनिल कहाणे, गजानन घाटकर, किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे, हरिभाऊ किर्वे, सुरेश देशमाने, शेखर शेजवळ नामदेव बागुल महिला आघाडी सौ. सुनिता वाव्हळ जिल्हा अध्यक्ष सौ. जयश्री देशमाने उपाध्यक्ष जिल्हा या सर्वांची धडपड म्हणजे आज महाराष्ट्राचा इतिहासात लिहीले गलेले सुवर्ण पान होय.
:- शब्दांकन मोहन देशमाने