अवघी दुमदुमली अमरावती । संताजीचे जयघोषाने ।।
दिनांक 16/12/2017 रोजी दुपारी 04 वाजता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ( तेली ) अमरावती व शोभा यात्रा नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित संताजी महाराज शोभा यात्रा श्री. शंकरराव हिंगासपुरे ( विभागीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रामदासजी आंबटकर यांचे अध्यक्षते खाली मा. आमदार राविभाऊ राणा , माजी आमदार, माजी मंत्री जगदिशभाऊ गुप्ता , किरणभाऊ पातूरकर , सुनीलभाऊ साहू , संजयभाऊ हिंगासपुरे ,संजयभाऊ शिरभाते , संजयभाऊ तिरथकर , अरुनभाऊ गुल्हाने यांचे प्रमुख उपस्थितीत संत संताजी महाराज यांचे मंगल मूर्तीला हारार्पण करून व महाआरती करून शोभा यात्रेला विठ्ठल मंदिर अंबागेट येथून संताजीचे जयघोषाने सुरवात करण्यात आली , सुरुवातीला प्रचार वाहन , त्यानंतर संतांच्या प्रतिमा यांचे वाहन , त्यानंतर साउंड सिस्टीम , ट्रेकटर वरील झाकि , बँड पथक , संताजींचे वेशभूषा व कार्य यांची झाकि , दिंडी पथक गणोजा देवी , समाजातील शोभायात्रेत सहभागी महिला व युवती ,परत दिंडी पथक , त्यानंतर समाजातील पुरुष व युवक व शेवटी संताजी जगनाडे महाराज यांचे मूर्ती व प्रतिमा यांनी सजवलेला रथ असा संपूर्ण देखावा घेऊन शोभा यात्रा अंबागेट, मृगेंद्र मठ , धनराज लाईन , सक्करसाथ , जवाहर गेट , तहसील , प्रभात चौक , बापट चौक, शाम चौक , राजकमल चौक , गांधी चौक , व अंबागेट , तेथून विठ्ठल मंदिर येथे येऊन समापन करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली .
या शोभा यात्रेस समाजातील बंधू व भगिनी तसेच युवक व युवती , समाजातील प्रतिष्टीत मंडळी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली , शोभा यात्रेस इतर समाजातील जेस्ट व मानवाईक मंडळी, तसेच आजी व माजी नगरसेवक तसेच अनेक पक्षाचे नेते मंडळी यांनी सदिच्छा भेटी देऊन संताजींना अभिवादन केले , स्थायी समिती सभापती तुषारभाऊ भारतीय , विलासभाऊ इंगोले , प्रकाशभाऊ म मंजलवार , बाबासाहेब शिरभाते , संजयभाऊ आसोले , प्रदीपभाऊ वादनेरे , सुनीलभाऊ खराटे , राजूभाऊ हजारे , तायवाडे मामा यांनी हि शोभा यात्रेस भेटी देऊन शोभा यात्रेत सहभागी झाले , या वेळी अनेक ठिकाणी लोकांनी संताजी महाराज यांचे पूजन करून स्वागत केले चौका चौका मध्ये पाणी व नास्ता, गोड पदार्थ वाटून शोभा यात्रेतील सहभागी लोकांना प्रोत्साहित करण्यात आले व शोभायात्रेवर पुष्प वर्षाव करण्यात आला .
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुनीलभाऊ साहू , संजयभाऊ हिंगासपुरे , अरुनभाऊ गुल्हाने , संजयभाऊ तिरथकर , अविभाऊ जसवंते , श्रीकृष्णराव माहोरे , विजुभाऊ शिरभाते, प्रतीक पिंपळे , प्रवीण भस्मे , दीपकभाऊ गिरोळकर , अविभाऊ देऊळकर , संदीप भाऊ गुल्हाने , अमोल आगाशे , योगेश मावळे , सागर शिरभाते, कुशाल बिजवे , वैभव बीजवे ,पवन बीजवे , तर महिलांमध्ये किरणताई गुलवाडे , निताताई राऊत , जयश्री ताई गुलवाडे , अर्चनाताई राजगुरे , मीनाताई मुंडवाईक, सरोज गुल्हाने , माधुरी भस्मे , स्नेहा शिरभाते , संगीता आगाशे , माधुरी शिरभाते , सोनू शिरभाते यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शोभा यात्रा आनंदात व उत्साहात पार पाडली .