हे सदर मुळात तेली मताचा आवाज आहे. हा आवाज अनेकांना खटकतो हा आवाज अनेकांना परिवर्तन करावयास लावतो. हा आवाज आत्मसंशोधन करावयास लावतो हा आवाज काही फुकट फौजदारांना समाज पातळीवर धावपळ करावयास लावतो. आणि हा आवाज हजारो बांधवांना आपला वाटतो. त्यांच्या मनातील त्यांच्या वेदनांना वाट करून देतो म्हणुन प्रत्येक महिन्याचा अंक मिळताच शेकडो समाज बांधव साथ सोबत देतात. पण हे ही आमचे मत आहे. आम्ही मांडलेले विचार हे पुर्ण सत्य आहे आसे नव्हे यातील उनीवा अजुन सत्य सांगा. मुळात या आवाजा विषयी चुक स्पष्टीकरण किंवा विरोधी मते कळवा. त्यांना प्रसिद्धी देऊ. गाव गप्पा तोंडी विरोध किंवा कुणीतरी सांगीतले म्हणुन मत सांगणे याला किंमत शुन्य कारण हा आवाज मुद्रित केलेला आहे. तेंव्हा आपल्या विचार प्रणाली प्रमाणे मते पाठवा त्याला ही प्रसिद्धी देऊ आता मुळ विषयाकडे वळु.
मी जाणीव पुर्वक या दोघांची नावे मांडली ओबीसी आरक्षणा मुळे आज कुठे तरी राजकीय सामाजीक स्थान हे तेली समाजाला मिळाले हे वास्तव आपण आपल्या जवळ ठेऊया. सुशिलकुमार शिंदे दलीतात जन्मलेले फुले, शहिु आंबेडकरांच्या त्यागाने ते सत्तेत गेले. ते जेंव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेंव्हा मराठ्यांच्या बळावर मुख्यमंत्री होते. ते टिकवीण्यासाठी त्यांनी मराठा कुणबी ही नवी जात अस्तीत्वात आणली. कोणताही आधार नाही. कोणतीही एैतिहासिक परंपरा नाही आशा वेळी मराठा कुणबी ही जात एका परिपत्रकाने ओबीसीत टाकली. राज्य मागास वर्ग आयोगानेही विरोध केला नाही. कारण जे सदस्य होते ती मंडळी खुर्ची साठी शांत बसले. या महाराष्ट्र राज्य अयोगात एक तेली सुपूत्र आहेत. त्यांना फोन द्वारे विचारले तेंव्हा त्यांचे मत मी विदर्भाचा विदर्भात कुणबी आहेत. पण मराठा कुणबी नाहीत. कुणबी समाजाची आशी शाखा नाही. मग याला विरोध त्यांनी अस्पष्ट तयारी दाखवली. राहिलेल्या महाराष्ट्रात शहाण्णव कुळी मराठा ४ ते ५ लाख देऊन ओबीसी होतात त्या विषयी काय ? ते स्पष्टीकरण देऊ शकत नाही मग आपला माणुस सत्तेत जावुन समाजाचा विचार करीत नसेल तर परिवर्तन करणे हा गुन्हा होऊ शकत नाही.
मी या पुर्वी दोन पुस्तका द्वारे प्रसिद्ध केले. अनेक वेळा या सदरात मराठ्यांच्या या कुनिती बाबत स्पष्ट मते मांडलीत. ही स्पष्ट मते आम्हाला बोचत असते आम्ही आत्मपरीक्षण करीत नसु. या प्रश्नावर आक्रमक न होता. नुसतेच मी पणा माझे पद माझे राजकीय भवितव्य, माझी सामाजीक प्रतिष्ठा याला गोंजरत आसु सारांश आपण कातडी बचाव धोरण राबवत आसु तर आपनणास जाब विचारणे हा समाजाचा हाक्क आहे. तो समाज बजावणारा ही. कारण ही लढाई आपण म्होरके होऊन लढावी. या लढाईला समाज साथ सोबत देईल ही कारण मराठा - कुणबी यातुन गावचा पाटील गावचा देशमुख जेव्हा समोर येतो तेंव्हा गाव गाड्यातला तेली घरात गप्प आसतो नैराश्य पणा दतो झटकून टाकु शकत नाही. त्याची उमेद संपते तो नाऊमेद आसतो. यासाठी समाज जागा करणे नेते जागे करणे हे कर्तव्य आहे. कदाचित कुणाला गुन्हा ही वाटत असेल. पण संत संताजींचे पुर्ण कार्य अभ्यासले तर दिसुन येईल त्या वेळच्या दहशद वाद्या विरोधातील लढाई त्यांनी धनदांडग्या व जात दांडग्यांच्या विरोधात लढली आणि निराश. नाऊमेद झालेल्या समाजाला त्यांनी संजीवनी दिली.
स्वातंत्र्यासाठी समाजातील लाखो बांधवांनी त्याग केला. हजारो जणांचे संसार उद्धवस्त झाले. शेकडो जण हुतात्मा झाले. आशा बर्याच बांधवा विषयी मी पुस्तक ही लिहीले आहे. आसो मुळ प्रश्न आसा स्वातंत्र्याच्या सुरूवातीस बहुजन हे नाव देऊन मराठ्यांनी तेली समाजाला मान वर करून दिली नाही. आपवाद क्षिरसागर घराणे आहे. छटाकभर दुध गोळा करणारी सोेसायटी ते मुख्यमंत्री व विरोधी नेते पक्ष याच समाजाने जवळ ठेऊन हजारो घराणी मात्तब्बर झाली त्यांना शेजारचा गरिब मराठ्यांना आपल्या शाळेत संस्थेत फुकट प्रवेश देता आला नाही. आणि ही मंडळी दांडगाईने ओबीसी होत आसतात. रस्त्यावर येऊन उत्तर देण्यास जी तेली मंडळी आली त्यांचे स्वागत ही केले जी आली नाहीत त्यांचा समाचार ही घेतला. मग काही बोल घेवड्यांना राग येण्याची गरज ही नाही. असो तर प्रश्न आसा आह. दहशद माजवुन मराठ्यांनी बहुजनांचे नाव सांगुन स्वातंत्र्यातील बरेच वर्ष राज्य केले. हा राग मत पेटीतुन व्यक्त करताना ब्राह्मणी पणाचा वावर असलेला भाजपा निवडला. ब्राह्मण मुख्यमंत्री होताच काही मंडळींनी स्पष्ट केले. शेकडो वर्षानी हिंदू राजा झाला. शेकडो वर्षांनी हिंदूची सत्ता आली. यादवांची अतिरेकी राजवट नष्ट झाल्या नंतर आज ब्राह्मणी प्रणालीचे राज्य आले. आणि म्हणुन मी ब्राह्मणांच्या राज्यात म्हंटले आहे. हे ब्राह्मणांचे राज्य येण्यास तेली कारण आहे. विदर्भातील प्रत्येक मतदार संघात २० ते ४० टक्के मतदान तेली समाजाचे. एका आशेने, एक विचाराणे मतदान झाले. तेली मत घेऊन जर ब्राह्मणशाही सत्तेत असेल. आणि ते जर तेली विचाराला बगल देत असतील तर त्या विरोधात लेखन करणे हा गुन्हा होत. असेल तर आसे गुन्हे संत संताजींचा विचार वंश म्हणुन मला ही करावे लागतील. ब्राह्मणी शासनाने सत्तेत येताच मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रथम विचार केला तर. ठराव ही केला. हा ठराव न्यायालयात किती टिकेल हा उद्याचा प्रश्न आहे परंतु ब्राह्मणी शासन सुरू करण्यास तेली मत पाहिजे ते टिकविण्यास मराठा आधार पाहजे हे वास्तव आपण विसरतो ? हा ही प्रश्न वादासाठी बाजुला ठेवू १६ टक्के मराठ्यांना १६ टक्के आरक्षण परंतु ४८ टक्के हिंदु ओबीसींना २० टक्के आरक्षण असताना या विषयी तक्रारार नसतानाही या २० टक्के आरक्षणात मराठा कुणबी ही जात जोडुन दिली. आहे. त्यांना बाजुला सारण्यास जर हे ब्राह्मणी शासन गप्प बसत असेल तर या बाबत जाग्रृती करणे हा गुन्हा असेल तर असे गुन्हे करणे हा आमचा मुलभुत हाक्क आहे. तो आम्ही बजावणारच.
आपल्या समाजाचे राजे, सरदार व सैनिक आसले प्रश्न एैरणीवर आणत नाहीत ते आणावे तसे परिवर्तन घडावे ही खरी वाटचाल फुकट फौजदारांना आवडत नसेल रूचत नसेल तर ही विचाराची समोरा समोरची लढाई त्यांनी उभी करावी. तुमच्या आमच्या सर्वांच्या सर्वांगीन विकासासाठी घटनेत २४१ वे कलम आहे. या कलमा नुसार सामाजीक, आर्थिक, राजकीय मागास समाजासाठी स्पष्ट नोंदी आहेत. या समाजाची स्वतंत्र जणगणना करावी या समाजाला ग्रामपंचायत ते लोकसभा या सत्तेत वाटा द्यावा. या समाजासाठी शासनाचा पैसा लोसंख्यनुसार द्यावा. हे सर्व जणगणनेने मिळते. ही होवू न देणारी कोणती जमात आहे. मंडल आयोग रोखणारी कोणती जमात आहे. या बाबत आम्ही साधा ब्र ही काढत नसु आणि जे काढतात त्यांना आपण वाटेत काटे देत आसु तर ही कोणती समाज सेवा आहे ? विदर्भात २० ते ३० टक्के तेली मत आहे. एकत्र एक खासदार व ४ आमदार होत असतील तर आपण गप्प बसावे ही प्रतिकीया जर काही बोल घेवडे करीत असतील तर त्यांना समाज प्रवाह समजुन घ्यावा लागेल समाजाचे नक्की प्रश्न काय ? ते कोणत्या मार्गाने सोडवावेत हे अंगीकरावे लागेल परिवर्तन घडावे ही सदिच्छा.