उमरगा- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक दि.३/२/२००१८ रोजी झालेल्या दत्त नगर मंदिरात समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर तर प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष महादेव मेंगले , सुरेश घोडके, लक्ष्मण निर्मळे, लोहार तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे उपाध्यक्ष उमाशंकर कलशेट्टी, प्रसिध्दी प्रमुख गणेश खबोले, आदीची प्रमुख उपस्थिती होती.
याबैठकिस उमरगा तालुक्यातील मुरूम, गुंजोटी, भुसणी, केसरजवळगा, येणेगुर, दाळींब कदेर, तुरोरी, नाईकचाकुर, तुगाव, खसगी या परिसरातील तेली समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होता. याबैठकिस सर्व मान्यवरांनी समाज एकत्रि आल्यानंतर काय फायदे होतात याचे समाजाला मार्गदर्शन केले व उदिष्ठे समाज बांधवांना समजाऊन सांगितले. तसेच याबैठकित उमरगा कार्यकारणी संदर्भात चर्चा करून काही नावे समाज बांधवांनी सुचवली त्याचा विचार करून व जेष्ठ मार्गर्दशकांचा विचार घेऊन आणखीन उमरगा तालुक्यात चाचपणी करून येणार्या काही दिवसात कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. सदरील याबैठकिस पहिल्याचं बैठकीला समाज बांधवंनी चांगला प्रतिसाद दिला. येणेगुरचे संतोष कलशेट्टी, भूसणीचे शिवानंद कलशेट्टी, नाईकचाकुरचे महेश लुटे, तुगावचे सदाशिव रोकडे, मुरूमचे विजयकुमार देशमाने,उरग्याचे शिवानंद साखरे, परमेश्वर साखरे, खसगीचे विजय कलशेट्टी, उरग्याचे शिवकुमार दळवी, मुरूमचे प्रविण अंबुसे यांच्या बरोबर विविध गावातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.