पिंपरी चिंचवड तेली समाज :- पिंपरी या परिसरातील श्री सचिन काळे यांची नियुक्ती तेली महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी झाली जिल्हा अध्यक्ष श्री. संदिप चिलेकर यांनी नुकतेच अधीकार पत्र दिले. या प्रसंगी श्री. विजय रत्नपारखी विभगीय अध्यक्ष, श्री. रमेश भोज कार्याध्यक्ष श्री. संदिप चिलेकर जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप शिंदे विभागीय सचिव व इतर बांधव उपस्थित होते.
आपल्या भावी वाटचाली विषयी सांगताना श्री. काळे म्हणाले फक्त वधु-वर मेळावे व फक्त वधु-वर मेळावे या परिघा बाहेर जाऊन मला वाटचाल करावयाची आहे. यासाठी आर्थीक सामाजीक युवकांचे प्रश्न प्रथम सोडविण्यास मी प्राधान्य देणार आहे. या साठी श्री. संदिप चिलेकर यांच्या मार्गदर्शना खाली व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे आयोजित करणे शासकीय सवलती मिळवून देणे. ओबीसी विकास महामंडळ ही शासनाची संस्था असुन येथे ज्या जाचक अटी आहेत. त्या सौम्य करण्यास प्रयत्न करणे नोकरी व व्यवसाय या साठी महाराष्ट्रातील युवकांना वेबसाईट द्वारे माहिती देणे ही माझी पहिली वाटचाल असेल. असे काळे यांनी निवड झाल्या नंतर मोबाईल द्वारे मनोगत स्पष्ट केले. त्यांच्या निवडी विषयी सर्वश्री विजय रत्नपारखी, रमेश भोज, संदिप चिलेकर, प्रदिप सायकर, दिलीप शिंदे, पी.टी. चौधरी निंबा चौधरी यांनी अभिनंदन व्यक्त केले.