तेली समाज पारनेर अस्तगाव - संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथा समाजपुढे आणल्या, असे प्रतिपादन पुंडलिक महाराज सोनवणे यांनी केले.
अस्तगाव येथील तेली समाजाच्या पुढाकारने तालुकास्तरीय संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगनाडे महाराज यांच्या सजविलेल्या रथातून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी तेली समाजातील बांधवांसह इतर समाजातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सावता महाराज मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात पुंडलिक महाराज सोनवणे यांचे हरिकिर्तन आयोजित करण्यात आले होते. यापस्रंगी तेली समाजातील सोमनाथ देवकर, उत्तर नगर जिल्हा विभागीय अध्यक्ष भागवतराव लुटे, जिल्हा महिला अध्यक्षा विद्याताई कर्पे, राहुरी, कोपरगाव, दाढ, वांबोरी, दाढ, बाभळेश्वर, कोपरगाव, शिर्डी,ख राहाता, साकुरी, पुणतांबा, राजुरी, प्रवरानगर, अशा ठिकाणाहुन समाज बांधवांनी हजेरी लावली. यावेळी राहाता तालुका तेली समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन कमलाकर कसबे यांनी केले. प्रास्ताविक बद्रीनाथ लोखंडे यांनी केले. तर अभार काशिनाथ गाडेकर यांनी मानल. या वेळी विजय काळे, रमेश गवळी, चंद्रकात शेजुळ, दिलीप सोनवणे, योगेश बनसोडे, तसेच जिल्हा सचिव रवींद्र कर्पे, जिल्हा उपाध्यक्ष बनसोडे, जिल्हा निरीक्षक सुधाकर कावडे, बाळासाहेब लुटे, आदींसह जिल्हाभरातील महिला शेकडो बांधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अस्तगाव अध्यक्ष त्रंबकररारव शेजूळ, उपाध्यक्ष वसंतराव गाडेकर, माधवराव शेजूळ, भास्करराव गाडेकर, सूर्यभान शेजूळ, भागवतराव गाडेकर, जनार्दन गाडेकर, जगन्नाथ गाडेकर, सुभाषराव शेजूळ, एकनाथराव गाडेकर, भागचंद्र गाडेकर, सुरेश गाडेकर, गगन गाडेकर, बाळासाहेब गाडेकर तसेच समाजबांधवांनी केले. अस्तगाव ग्रामस्थ उपस्थित होते.