नाशिक :- २१ व्या शतकातील भारताच्या भवितव्याबद्दलचा दृष्टिकोन मांडतांना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम व मा. पंतप्रान नरेंद्रजी मोदी यांनी सांगीतले की २०२० ते २०३० मध्ये भारतदेश वयाने २८ वर्षाचा होणार आहे. तर लंडन अमेरीका आर्यलंड व युरोपियन देश ४५ वयाचे होणार आहेत. या क्रातीकारी दशकात सुसंस्कृत उच्च विद्याविभुषीत पिढी भारतात येत आहे. आपल्याला ट्रान्सफर व्हायचे आहे. या क्रांतीमध्ये जायचे आहे. म्हणुननच इंग्रजीवर प्रभुत्व असणारी पिढी घडवायची आहे. आपल्या देशाला जगात स्थान मिळवायचे असेल तर २०२० ते २०३० च्या क्रांतीकारी दशकाच्या योग्यतेची आपली मुले घडली पाहिजेत. उच्च मानांकीत शिक्षणामुळे राष्ट्र राज्य समाज गाव कुटूंब घडली पाहिजेत. उच्च मानांकीत शिक्षणामुळे राष्ट्र राज्य समाज गाव, कुटूंब मजबुत होणार आहे. असे प्रतिपादन ना. आ. चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री यांनी केले.
नाशिक शहर व जिल्हा तेली समाजातील विविध संस्थांच्या वतीने आयोजीत जाहीर सत्कार समारंभात सत्कारमुर्ती ना. आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. शालीमार चौकातील आयएमए हॉलमध्ये हा समारंभ पार पडला.
सर्वश्री आ. बाळासाहेब सालप, आ. डॉ. राहुल आहेर , श्री. सुरेश पाटील, लख्मण सावजी, गजानन (नाना) शेलार, प्रा. वसंतराव कर्डिले, डॉ. शरद महाले, भानुदास चौधरी, सदुभाऊ वालझाडे , विक्रांत चांदवडकर, अशोक कर्पे, जी. एम. जाधव, निलीनाताई आमटे, शौला नेरकर, योगीता क्षिरसागर इ. मान्यवर उपस्थीत होते.
अध्यक्ष स्थानी ज्ञानमहर्षी प्रा. वसंतराव कर्डीले यांनी केले यावेळी त्यांनी केले या वेळी त्यांनी समाजाच्या वतीने देन मागण्या मांडल्या.
कार्यकमात डॉ. शरद महाले, जी. एम. जाधव, गजानन शेलार यांची यथोचित भाषणे झाली.
नाशिक शहर व जिल्ह्यातील संस्था मंडळे व कार्यकर्ते यांनी मा. चंद्रशेखरजींचा सत्कार केला. आभार प्रविण चांदवडकर ने मानले व सुत्रसंचालन तेजस शिरसाठने केले . कार्यक्रमासाठी जर्नादन बेलगावकर सुनिल शिरसाठ, हरिश्चंद्र देसाई , पंढरीनाथ सोनवणे, शकुंतला शिरसाठ, सुमनताई बागले, राजेंद्र चौधरी उपस्थीत होते.