महाराष्ट्र पद्मवंशी राठौर तेली समाज सामुहिक विवाह सोहळा 24 एप्रील 2018 जामनेर .सर्व पदाधीकारी,कार्यकर्ता,समाजबाधंव बैठक दिनांक 11 जानेवारी रोजी पदंमवंशी राठौर तेली समाज राज्य कमिटी व सर्व गावांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची सामूहिक विवाह सोहळा नियोजन संदर्भात जामनेर येथे बैठक संपन्न झाली. बैठकीत खालील विषयावर एकमत होऊन नियोजन करण्यात आले. (1) महाराष्ट्रात होणारे समाजाचे सर्व कार्यक्रम यापुढे पदंमवंशी राठौर तेली या बॅनर खाली घ्यावे. (2) सामुहिक विवाह सोहळासाठी सर्व गावांनी भरभरून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. (3) विविध समित्या लवकरच तयार करून कामकाज वाटप केल्या जाईल. (4 )वधू वर फी ठरविण्यात आली. वधू साठी 5100रुपये तर वर साठी 7100 रुपये ठरविले. (5) सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम प्रबोधन साठी प्रत्येक गावाला जाऊन जागृती करावी. (6) समाज बांधव यांनी आपल्या कडे होत असलेले विवाह हे विवाह सोहळ्यात करावे असे आवाहन करण्यात आले. (7) विशेष निवड झालेल्या समाज बांधव(प्रा श्री प्रभुलाल जी झेलवार भा ज पा सरचिटणीस संभाजीनगर,श्री राजू भाऊ अजमेरे उपसरपंच रांजनी,श्री धनलालजी मंडावरे Human Rights, ) यांचा सत्कार करण्यात आला. (8) बैठकीत dr श्री झेलवार साहेब,श्री प्रदीपभाऊ ढाकरे,dr श्री विशालजी ढाकरे ,श्री नामदेव भाऊ मंगरुळे यांनी मार्गदर्शन केले. (9) आजच्या कार्यक्रमचे सर्व नियोजन भोजन व इतर जबाबदारी खर्च सर्व श्री रतन भाऊ दसरे यांनी केले. (10) सर्व उपस्थित समाज बांधव यांचे आभारानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.