चासकमान धरणाचा पायाही खोदला नव्हता तशी ही त्याकाळची घटना पावसाळ्यात दुथडी वहाणारी भिमा नदी एप्रिल मे महिन्यात कोरडी ठणठणीत. त्या कोरड्या नदीच्या काठावरचे इतिहास साठवून ठेवलेले खेड गाव. या गावातही कहाणे घराणी आगदी संत संताजींच्या नात्या गोत्यातील समाजीक धार्मीक लढाईत संतांजींना साथ देणारी त्यांची पत्नी याच घराण्यातील. याच खेडच्या बाजार पेठेत, स्टँडवर कधी कधी गावात हातगाडी ढकलत जाऊन अांबे विकणारे, आंबे, केळी, बोरे, द्राक्ष आशी सिजनेबल फळे विकणारा हा मुलगा खेड वाशियांना आपलाच होऊन गेला होता.
खेडच्या तेली आळीतील जगन्नाथ कहाणे यांच घराणे एक वेळ सुखात भाकरी खाल्ली होती. परंतु पिड्यान पिड्यांचा व्यवसाय बसला. घरात लहान मुले, थोरला अनिल ते गावातल्या शाळेत चौथी पर्यंत गेला पंरतु भाकरीचा प्रश्न दिवसे दिवस मोठा होऊ लागला. या प्रश्नासाठी वडिला बरोबर चने फुटाणे विकु लागले. शाळेचा गणवेश घालुन जाणारी समवयस्क मुले पाहुन वाईट वाटे. आपन ही असेच शिकलो तर पुढे मोठे होऊ त्या मोठे पणा साठी शिक्षण पाहिजे. या चौथी शिक्षणाच्या बळावर चणे, फुटाणे, शेंगदाणेच विकत बसु. वडील आधार देत. हा उन्हाळा संपुन पावसाळा येईल. उन्हाळा लांबत होता. या चने फुटाणे विक्रीत रोजची भाकरी नीट भाजत नव्हती. श्री. अनिल यांना मिसरूड फटू लागले आता कुठ तरी काम बघावे हा विचार मनात रूजला ४ थी शिक्षणाला काम मिळणार कोणते ? चार ठिकाणी चौकशी केली कोणच आसरा देत नव्हते. शेवटी कै. नारायणशेठ कहाणे यांनी त्यांच्या ऑईल मिलवर कामाला ठेवले. मिल साधारणत: वर्षातुन ७ ते ८ महिने सुरू आसे. या वेळात ४ रूपये रोज. इतर वेळी हॉटेल मध्ये काम करणे. हॉटेल मध्ये दिवसभर काम केले तर २ रूपये मिळत हे दोन रूपये घराला पुरवून पुरवून द्यावे लागत. आशाच काळात दि. १३/७/७९ रोजी किरकोळ आजारने वडील वारले. वडिलांचे निधन समजताच गावातील आळीतील बरेच गोळा झाले. अनिल यांनी वडिलांची मान आपल्या मांडीवर घेतली होती. डोळ्यातील पाणी आटत नव्हते. वडिलांचे निधन झाले. एक आधार तुटला. घरचा कर्ता म्हणुन आता सर्व पेलावे लागणार. प्रचंड असा तनाव डोक्यात संचारला होता. चैकटी बाहेर दोन जानते बांधव उभे होते. त्यांची चर्चा एैकू आली. घरावर आभाळ कोसळले हाताशी आलेली पोरं उघडी पडली. आता ही मयत करावी कशी मयतीचा खर्च आपण करू ही पण जेवणाचा प्रर्न या पोरांना आसताना. मयतीचा खर्च कधी देतील ? आशा घरासाठी समाजाने निधी वेगळा ठेवावा. आसे बोल श्री. अनिल यांनी एैकले. आणि उद्याच्या क्रांतीची पहिली ठिणगी पडली. ही ठिणागी पडली. ही ठिणगी पडली नसती हे संभाषण झालेच नसते तर आज ही श्री. अनिल जगन्नाथ कहाणे हे कुठेतरी मोलमजुरी नाहीतर चणे फुटाणे विकत बसले आसते. हे वास्तव ते प्रांजळ पणाने कबुल करतात. या मंडळींना ते गुरूस्थानही मांाडतात. कारन फिनिक्स पक्षा सारखे ते राखेतुन झेप घेऊ शकले ते या बोलण्याने.
वडिलांचा अंतविधी उरकल्यानंतर खर्च समजुन घेतला. आता नोकरी नाही या उघड्या जगात उभे रहावयाचे भेळीची गाडी चौकात लावली. माणसे समजुन घेऊ लागले. व्यवहार समजुन घेऊ लागले. आठवडे बाजारात माणसांच्या जगात शिक्षण घेऊ. लागले. हे एक मार्केटींग होते. हा एक उघड व्यवहार होता. या बाजारात जो मार्केटिंग करू शकतो तोच खरा व्यवसायीक. या भेळीच्या गाडीवर चार पैसे साठवून वडिलांच्या मयतीचे पैसे देऊन टाकले. प्रथम पैसे खर्च करून जो विश्वास दाखवला त्या समाज बांधवांचे आभार मानले नाहीत तर ही माणसे म्हणजे मला घडविणारे शिल्पकार आहेत. कारण या प्रसंगातून अनिलचे अनिलशेठ झाले. आठवडे बाजार कधी स्टँड कधी चौकात भेळ विकता विकता काही फळे विक्रते भेटले. आणि अनिलशेठ फ्रुटच्या व्यवसायात गेले. गावात दुसर्याकडून फळे विकत घेऊन व्यवसाय करता करता जाणीव झाली आपणच स्वत: मार्केटमधुन फळे आणु हात गाडीवर शे दिडशे फळे ठेवणारा टेम्पा किंवा ट्रकने माल आणने ही जिद्द व झेप वेगळीच होती. पुण्याच्या मार्क्रेट मध्ये ज्या ज्या सिझन मध्ये फळे मिळत ती ती फळे ट्रकने राजगुरू नगरला आणत भांडवल थोडेच आसे पण दिलेला शब्द सांगितलेली तारिख ही कधीही चुकू दिली नाही. या साठी उन्हा पाऊस थंडी यांच्या सह ते फिरत होते, या फिरण्यातून ते पुणे येथील मालाचे पैसे देऊन सुखात भाकरी खात होते.
शिक्षण म्हणजे तिसरा डोळा. हे शिक्षण चार भिंतींच्या आत मिळते. हे शिक्षण विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कागदावर मिळते. हे पदवीचे शिक्षण नोकरी देते हे शिक्षण भरमसाठ पगार देते. हे शिक्षण धनदांडगे बनवते या शिक्षणासाठी मेहनत ध्यावी लागते. यातुनच जीवन दैदिप्यमान होते. हे अगदी सत्य आहे. पण या वेळी आपण एक विसरतो. माणसाच्या जगण्या मरण्याचा श्रद्धा, अंधश्रद्धां सत्य व असत्य यावर भाष्य करणारे संत तुकाराम व संत संताजी कोणत्या शाळेत शिक्षण मिळाले होते ? त्यांनी कोणत्या विद्यापीठाची पदवी घेतली होती ? म्हणुन ते आपल्या शब्दासह व कार्यासह अमर ठरले ? याचे एकच उत्तर ते शिक्षण पुर्ण करू शकले. चार भिंतीच्या बाहेर ते माणूस वाचू शकले ते माणुस पाहु शकले. जीवनात खरे शिक्षण हेच आसते. अनुभव ही शाळा आसते. या शाळेत अनुभवातुन शिकवयाचे आसते. ४ थी शिकलेले अनिल कहाणे वडिलांच्या अंतविधी दिवशी एक रूपया ही जवळ शिल्लक नसलेले होते. हॉटेलात काम करणार्याला कसली पत नसते. परंतु त्या प्रसंगातुन ते जे शिकले तिच वाट त्यांना यशस्वी व्यापारी बनवू शकली फ्रुटवाले अनिलशेठ ही प्रतिमा खेडच्या बाजार पेठेत नावाजली गेली. यातुनच एक दिवस श्री. पांडे साहेब भेटले पांडे माणूस वाचावयास हुशार होते. त्यांना माणसांची पारख होती. त्यांना नक्की माहित. मार्केटींग ची पदवी नुसती असुन उपयोगी नसते तर प्रत्यक्ष अनुभव म्हत्त्वाचे आसतात या पदव्यांना मागे सारणारी व्यसायीक गणिते श्री. अनिलशशेठ यांच्याकडे दिसली आण ते मार्केटिंग क्षेत्रात सामील झाले.
शिक्षण फक्त ४ थी या बळावर ते सिन्ट्रेल चेकींग लि. या कंपनीचे ते एक घटक बनले. बरोबर एक मोटार सायकल वर स्वार होऊन महाराष्ट्रभर फिरू लागले. प्रत्येक कस्टमरला ध्येय वाटचाल पटवून देऊ लागले हे त्यांना शक्य झाले. चणे फुटाणे विकणे, हॉटेलात काम करणे, हातगाडीवर फळे विकताना समोरच्या कस्टमरला कोणती भाषा पटू शकते. ही कला त्यांना अवगत होती. आगदी याचा उपयोग त्यांना या ठिकाणी केला. यातून कंपनीला कस्टमरांची मालिका निर्माण करून दिली. यासाठी येणार्या अनेक प्रसंगाला ते सामोरे गेले. या सामोर पणातून घराची आर्थिक प्रगती होऊ लागली कंपनीच्या अनेक कार्यक्रमात ते विचार पीठावर सन्मानीय म्हणुन बसु लागले. समोरिील जन समुदायाला मार्केटींग कसे करावे याचे विचार देऊ लागले. स्वत:ची एक टिम बनवली या टिमने कंपनीला फार मोठा हात भार लावला. यातुनच टिमचे सदस्य ही आपले सुखकर जीवन अनुभवू लागले. संस्कारक्षम वयात गरिबीचे चटके सहन करणारे श्री. अनिल शेठ यांच्या टिम मध्ये आज ५५०० जन सहभागी आहेत ही ५५०० कुटूंबे सुखी होण्यात त्याचा शिल्पकार होत नव्हे तर मार्केटींगचा विचार महत्वाचे आहे.
कराड जवळील कुसूर हे गाव स्वातंत्र सैनिकांचे गाव या गावातील क्षिरसागर नोकरी निमित्त पुण्यात आलेले वखार महाममंडळात क्षिरसागर कामास होते त्यांची कन्या सुमन त्या सौ. सुमन अनिल कहाणे झाल्या आपल्या जुन्या घरात संसार चालवू लागल्या, हातगाडेी वर सुरूवातीस चुल पेटणे कधी कधी शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी शिलाई मशीन घेतली. ओळखी पाळखी वाढवून त्या शिलाई काम करू लागल्या त्यांची ही विचारसरणी ही श्री. अनिलशेठ सारखी बनू लागली. पण मुळ स्वभाव हा खंबीर पणाचा. कोणतीही गोष्ट समजुन घेण्याची तयारी. त्यात पुर्ण ज्ञान घेऊन उभे रहाण्याची तयारी. मुळात स्पष्ट वक्ते पणा व शिस्त या मुळे श्री. अनिलशेठ यांच्या संसराच्या त्या एक खंबीर चाक तयार झाल्या मार्केटींग या क्षेत्रात त्या श्री. अनिलशेठ यांच्या बरोबर उतरल्या आणि संसाराला गती देऊ शकल्या यामुळे प्रगती करू शकल्या आज या व्यवसायात मोठे चि. जगदिश हे उच्चशिक्षित होताच मोठ्या पगाराच्या नोकरीवर रूजुझाले. परंतु त्यांना ही मार्केटींग क्षेत्र विशाल दिसू लागेले. ते ही नोकरी सोडून आज या क्षेत्रात आपले टीम वर्क विकसीत करीत आहेत. दुसर चिरंजीव चि. महेश हे एम. फॉर्म असुन सध्या नोकरी करतात.
आज दक्षिण टोका कडून उत्तर टोका कडे आलेले श्री. अनिल कहाणे यांचा प्रवास सहज सोपा जरूर नाही. पण अशक्य नाहीच स्वत:च स्वत:चे नशीब बदलु शकतो हा आदर्श जरूर घेतला पाहिजे. राजगुरू नगर येथील तेली समाजात सक्रीय राहुन सामाजीक प्रश्न सोडविण्यात त्यांना आनंद वाटतो तेली महासभे तर्फे काम सुरू होताच खेड तालुका उपाध्यक्ष म्हणुन काम करू लागले. समाजाची खाने सुमारी करिताना अर्थिक प्रश्न समजुन आले. डोकी नुसती मोजण्या पेक्षा प्रश्न सोडविणे महत्वाचे ते मानतात आर्थिक दुर्बल घटकातील होतकरूंना मार्केटींग क्षेत्रात आणुन आर्थीक उन्नती देण्याचा माणस ही त्यांनी व्यक्त केला.