अर्धवट पिकलेली फळे गोड कधी लागत नाहीत. अर्धवट ज्ञान उपयोगात कधी येत नाही स्वत:ला बादशाहा समजनारे मरणाच्या भितीपोटी कधी कुठली लढाई स्वत: लढत नाहीत बर्याच ठिकाणी काम करणार्या कार्यकर्त्यांचाच बळी जातो बिचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्या पासुन यश दुर राहुच शकत नाही शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील, जन्मात देखील, उपयोगी पडतात बाकी सारे नश्वर आहे म्हणुन या नविन वर्षाच्या प्रांतीक तेली महासभा पुणे जिल्ह्याच्या वतीने अगदी मनापासुन तुम्हाला व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!! .....
आपल्या सर्वांना माहितच आहे की गेली कित्येक वर्षे प्रांतिक तेली महासभा आपल्या समाज हितासाठी सामाजिक बांधीलकी म्हणुन झटत आहे. कित्येक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आपआपला व्यवसाय नोकरी सांभाळून या कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. कुठल्याही कार्याचे श्रेय लाटण्यासाठी प्रातिक चे कार्यकर्ते काम करित नाहीत. अगदी निस्वार्थीपणे समाजहित जोपासण्याचे काम हार तुरे फोटो, शाल श्रीफळ याची अपेक्षा न ठेवता अगदी महिला आघाडीपासुन सर्वच जणांनी समाजासाठी समाजहिता साठी सामाजिक बांधिलकी म्हणुन विडाच उचलला आहे प्रांतिक तेली महासभा हा एक मोठा सागर आहे. झाल्याशिवाय रहाणार नाही हे ही तेवढेच खरे आहे. कारण प्रांतिक तेली महासभेच कामच अस चालणार आहे.
आजच्या २१ व्या शतकात आपला समाज फार पुढे गेलेला आहे सर्व क्षेत्रात आपले , समाज बांधव / भगिनी नाव कमवित आहे. याच मुळ कारण म्हणजे प्रातिक तेली महासभेची चालेली वादळी वाटचाल, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रर्न दिवसेंदिवस कठिण होत चालला आहे. हा प्रश्न सोडविण्याचे अतिशय अवघड काम सध्या प्रांतिक तेली महासभेने हाती घेतले आहे २०१५ हे वर्षे अतिशय महत्वाचे वर्ष आहे समाजाच्या अडचणी सोडविण्यात व समाज बांधवांना मदत करण्यात आज प्रांतिक तेली महासभेचा पहिला नंबर आहे. पुढचा प्रवास हा डोंगर चढण्यासारखा आहे. प्रांतिक तेली महासभेने खुप मोठा परिवर्तन वादी बदल करण्यापर्यंतचा प्रवास केलेला आहे. कारण प्रातिक तेली महासभेचे सर्वच कार्यकर्ते सर्वगुण संपन्न व परिपुर्ण झालेले आहेत. सतत कार्यरत रहाणे हि तर त्यांची ख्याती आहे. प्रत्येक समाज बांधवांना प्रांतीक तेली महासभेतुन चांगलाच अनुभव मिळेल, हेच आमचे ध्येय आहे. आणि ते आमच्या रक्तात भिनले आहे. प्रांतिक तेली महासभेची ही अप्रतिम जिद्द सध्या आम्ही अमलात आणित आहोत आमची वाटचाल, योग्य दिशेने चालली आहे आम्ही जेवढे जास्तीत जास्त काम करू तेवढ्याच अपेक्षा सर्व समाज बांधवांच्या वाढणार आहेत. आमचा फायदा हा आहे की आमच्यापाशी भक्कम असा घरचा पाया आहे. स्वत:ला झोकुन देणारे व मनापासुन काम करणारे असे कार्यकर्ते आहेत म्हणुन प्रातिक तेली महासभेचे नाव सर्व महाराष्ट्रतुन आज घेतले जात आहे. आज सर्व ठिकणी संताजी महाराजांच्या नावाने बर्याच संघटना काम करित आहेत परंतु महाराजांच्या समाधी स्थळी सुंदुंबरे या ठिकाणी कोणी लक्ष द्यायला तयार नाही तेथील, बांधकाम अर्धवट स्थीतीत आहे पुरेसा निधी उपलब्ध होत नाही त्यासाठी सर्व छोट्या मोठ्या संघटना एकाच छताखाली आणायच्या आणि सर्वांच्या मदतीने मार्गदर्शनाने अनुभवाने हे काम पुर्ण करावयचे आसेही मत प्रांतिक चे आहे आणि तेही तेवढेच महत्वाचे आहे. राज्यात एक कोटी तर देशात तेरा कोटीच्या आसपास लोकसंख्या आपल्या तेली समाजाची आहे. त्यासाठी विभागनिहाय खाणेसुमारी करणे गरजेचे आहे आणि ते काम प्रातिक तेली महासभेशिवाय कोणी करूच शकत नाही.
मॅरेज ब्युरो च्या नावाखाली आपल्याच काही वधु/वर संस्था भरपुर पैसे आपल्याच समाज बांधवांना लुबाडत आहे. त्यावरही प्रांतिकची नजर राहणार आहे. बिचारे पालक आपल्या मुलांचे लग्न वेळेत व्हावे म्हणुन अगोदरच चितेंत असतात. आणि त्या हे फसवणुकीचे प्रकार घडतात याला कुठे तरी आवर घालायला हवा हाही आमच्या वाटचालीचा भाग आहे. आपण आपला तेली समाज एवढा मोठा केला पाहिजे की त्याला इतर समाजाची नजर लागली पाहिजे. त्यासाठी चांगला समाज घडविणे गरजेचे असुन त्याला प्रगतीपथावर घेवुन जाणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी कमीत कमी पैशात वधु-वर मेळावे भरवुन समाजास त्याचा फायदा मिळवून देणे हे ही आमच्या समोरील आवाहनच आहे. आणि ती काळची गरज पण आहे. आदर्श माता पुरस्कार विद्यार्थ्यांचा गुणगौरव आरोग्य शिबीरे महिला दिन. संक्रातीचे हळदी कुंकू समारंभ, कौंटुबीक सहली, शैक्षणिक, सामाजीक क्रिंडा क्षेत्रांतील समाज बांधवांचा सत्कार सन्मान सोहळा पंधरा ऑगष्ट, २६ जानेवारी आसे राष्ट्रीय उत्सव जेणे करून समाज हा एकमेकांशी जोडला जाईल ओळख खर्च आणि त्यातुनच समाज कार्याची आवड निर्माण होवून प्रोत्साहन मिळेल, १० वी १२ वी नंतरच्या शैक्षणिक वाटा हे सदर फार महत्वाचे आहे त्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेणे जेणे करून आपला समाज सुशिक्षीत व संघटित होईल आणि समाज बांधवांशी असलेले जिव्हाळ्याचे अतुट नात निर्माण होईल ज्या समाजाचे आपण आहोत ज्या समाजात आपण जन्मलो, वाढलो त्या समाजाचे नाव सागण्यात आपण न लाजता त्या समाजाचा आपण काही तरी देण लागतो हे विसरता कामा नये कितीही पैसे वाला असला तरी त्याला समाजाची गरज हि लागतेच हे तेवढेच खरे आहे.
नविन कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा आदर ठेवला पाहिजे त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे. जुन्या पदाधिकार्यांनी ही नविन आलेल्या पदाधिकार्यांच्या भावनांची कदर केली पाहिजे. त्यंाच्या ज्ञानाचा फायदा संस्थेसाठी करून घेतला पाहिजे. त्यांच्या योग्यतेनुसार त्याला समाज कार्य करण्याची संधी मिळचवुन दिली पाहिजे. नाहीतर वाद-विवाद गटबाजी नवे जुणे नदिच्या पलीकडचे अलिकडचे स्थानिक की बाहेर गावाहून स्थानिक झालेला लहान मोठा असे झाले तर चांगल्या संस्थेचा देखिल र्हास व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी सामाजिक बांधीलकीच भान आपण ठेवल पाहिजे. हा सुद्धा आपल्या वाटचालीचाच भाग आहे.
आम्हाला नको राजकारण अर्थकारण हवे केवळ समाज कारण या हेतुने आम्ही सक्रिय सहभाग घेवुन सर्व समाज बांधवांना एकत्र आणणाराच आणि एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी भविष्यात आपण एकत्र यायलाही पाहिजे तरच समाजाचे भले होईल, आणि बांधवांचा प्रातिक वरील विश्वास ही वाढेल आपला समाज एवढा मोठा झाला पाहिजे की त्याला इतर समाजाची नजर लागली पाहिजे. हे स्वप्न प्रांतीक तेली महासभेच आहे. आणि ते स्वप्न तुमचही असल पाहिजे. आपल्या सर्वांच असल पाहिजे. जोपर्यंत सर्व समाज बांधव एकत्र येत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला समाज अस म्हणता येणार नाही. त्यासाठी समाजाला विखरू द्यायच नाही सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम तेली महासभेने हाती घेतले आहे. आणि हे शक्य होणार आहे ते सर्व समाज बंधू भगिनी यांच्या आशिर्वादामुळे.
समाजातील घटस्फोटाचे प्रमाण कमी करून दोन्ही परिवारामध्ये समेट घडवून आणण्याचे काम, स्त्रिभुण हात्या, बेरोजगारी, खाणेसुमारी या संदर्भात जे आतापर्यंत कोणी केले नाही असे काम प्रांतिक तेली महासभा करणार आहे. तेही तुमच्या सर्व समाजबांधवांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने.
भविष्यात व आयुष्यात कोणत्याही समाज बंधु / भगिनींच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही याची मी कार्याध्यक्ष व पदाधिकारी यांच्या वतीने ग्वाहि देतो.
आपल्याला गणेशाची सिद्धी सरस्वतीची बुद्धी, चाणक्याची निती, शारदेच ज्ञान, कर्णाच दान, भिष्माच वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद आणि सर्व समाज गबांधवांचे आशिर्वाद मिळो हिच संताजी चरणी प्रार्थना आपले सहकार्य आपले प्रेम, आपले आशिर्वाद असेच या पुढेही आम्हाला लाभो.
जय हिंद जय तेली समाज जय महाराष्ट्र