दोंडाईचा येथे तेली समाजाच्या 5 वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व शाखीय तेली समाज कृती समितीच्या वतीने अकोला येथे जनआक्रोश मूक मोर्चाचे आयोजन शुक्रवार दि 23/03/2018 सकाळी 10 वा करण्यात आले होते. या मोर्चाचे स्थळ क्रिकेट क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोला असे होते मोर्चासाठी तेली समाज कृति समितिला सर्व समाजाचा,महिला संघटना आणि इतर ही सामाजिक संघटनाचा पाठिंबा मिळला. तेली समाज कृति समिति द्वारे अकोला शहर, अकोट शहर अकोट तालुका, बोरगांव मंजू, कोलम्बी, मूर्तिजापुर, बाबुळगाव, वाडेगाव, तेल्हारा, हाता, पंचगवान, महान, बार्शीटाकली, देवधरी, शेगाव, जलंब, नांदुरा, खामगांव, मलकापुर, निमकर्दा, रिधोरा, पारस, पातुर, बालापुर, किनखेड, दही हांडा केळीवेळी अश्या असंख्य गावांमधे सर्व समाजाच्या लोकांच्या बैठकी सुरु असून या बैठकी मधे असंख्य लोक आणि विशेषतः माता भागिनीं यांची उपस्थिति लक्षणीय होती.
सदरहु मोर्चाला विजयभाऊ अग्रवाल महापौर अकोला, डॉ. अभयदादा पाटिल, गुलाबरावजी गावंडे, संग्राम भैय्या गावंडे, राष्ट्रवादी विदर्भ सवयक, गोपालभाऊ दातकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना, विठ्ठलभाऊ सरप युवासेना जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख, राहुलभाऊ कराळे, मोनुभाऊ ठाकूर युवासेना, अविनाश भाऊ देशमुख काँग्रेस, सचिनभाऊ वाकोडे, बळीराजा पार्टी महेंद्रजी धावडे, आणि मराठा समाज संघटना, कुणबी समाज युवा संघटना माणिकभाऊ शेळके, दिलीपभाऊ सावरकर, अखिल भारतीय छावा संघटना रणजीतदादा पाटिल काळे, माळी युवा संघटना संतोषजी रहाटे, जय तपे हनुमान पातूर-बालूभाऊ बगाडे, डेबूजी युथ संघटना राहुलभाऊ वरणकर, प्रहार संघटना श्यामभाऊ राऊत, शिवसंग्राम संघटना अक्षय भाऊ झटाले, निखिलभाऊ बोरीकर, शेतकरी जागर मंच प्रशांतभाऊ गावंडे, विजयभाऊ देशमुख, झुंज संघटना - प्रशांतभाऊ भारसकाळे, सुहासभाऊ साबे, विदर्भ विकास परिषद शहर अध्यक्ष डॉ. धनंजय नालट, ग्रामीण अध्यक्ष विजय उजवणे, चर्मकार संघटना शिवलाल इंगळे महानगर अध्यक्ष छत्रपती शासन - श्रेयशभाऊ भिरड, माधवभाऊ घोगरे, शुभमभाऊ थिटे, बिट्टूभाऊ रोडे, वैभवभाऊ चोरे, श्रीकांतभाऊ पाटिल,