मध्यवर्ती संघटनेचे पद हवे असेल किंवा असलेले पद टिकवायचे असेल, पदावरून बढती हवी असेल. कुचकामी पदाधीकारी म्हणुन हाकलपट्टी टाळावयाची असेल एकमेकावर कुरघोडी करावयाची असेल तर वधु वर मेळावा हा गरजेचा आहे. नुसता गरजेचा नसून त्या मेळाव्याच्या डोक्यावर एक वेळ संताजी प्रतिमा नसेल तरी चालेल परंतू फक्त महाराष्ट्रभर वाजत गाजत गुंतत अडकलेल्या संघटनेचे नाव गरजेचे आहे. असले मेळावे मध्यवर्ती संस्थेच्या अंतर्गत भरवावेत हा अलिखीत आदेश. आसे अनेक अलिखीत आदेश आसतात त्यापैकी हा एक तर आशा भव्य दिवय मेळाव्यासाठी हाय कमांडला बोलवणे त्यांच्या सोईनुसार कार्यक्रम पत्रिका बनविणे. मुला मुलींच्या साठी जमलेले उपस्थीत बांधव या हायकमांडचे नेहमीचेच बोल एैकून कंटाळले तरी गप्प बसून आसतात. कारण हे गुर्हाळ संपले तरच पुढे वधु-वर पहाता येतात. हे मध्यवर्ती संस्थेचे लोडणे गळ्यात आडकवून भव्यदिव्य मेळावे साजरे होतात. परंतू हायकमांड गावात जेंव्हा जेंव्हा भव्य दिव्य मेळावे साजरे करते तेंव्हा तेंव्हा ते आपल्या डोक्यावर मध्यवर्ती संस्थेचे हे आसले सौभाग्याचे कपाळ भर कुंकू लावत नसते. हिंदू धर्म शास्त्रात ब्राह्मण चुकला तर त्याला शिक्षा नसते. आणि जर असेल तर अती सौम्य तर भव्य दिव्य मेळाव्याची ही सत्यकथा. सत्य म्हंटले की सख्या आईला ही राग येतो. तर अशी काही मंडळी मध्यवर्ती संस्थेच्या दारात उभी आसतात. त्यंाना सांगीतले आसते तेवढेच काम करावे लागते. ते त्यांनी करावे ती ही दारातली मंडळी कधी भुंकत आसतत ती भुंकली नाही तर माझ्या सारख्यांना समाधान वाटत नाही. त्यांनी मध्यवर्ती संस्थेच्या दारातून आपले नेहमीचे काम पुर्ण करावे.
माझे मित्र व जेष्ठ पत्रकार भगवान बागुल यांच्या विषयी भगवान स्तुतीचा मोह न आवरता मांडतो. तो आसा की महाराष्ट्र ब्राह्मण समाज साडेतीन टक्के असताना २२ टक्के आमदारकीची तिकीटे भाजपपा तर्फे आणतो आम्ही १३ टक्के आसताना ४/५ तिकीटे आणतो. आसे मत बागुल सरांनी व्यक्त केले. सर्वश्री वसंतराव कर्डिले, मोहन देशमाने बागुल व छगन मुळे या सारखी मंडळी आम्ही मागे का हे मांडतो. हे मांडतो म्हणुन काही फुकट फोजदारांना आशिर्वाद देऊन पाठवले जाते. आमच्या मतावर खरे चिंतन व्हावे. यासाठी चिंतन शिबराचे बुजगावणे कामाचे नाही. या साठी खरे चिंतन हवे. एक खाजदार, एक मंत्री सहा आमदार ही आमची प्रगती का ? या साठी समाज संघटनेने काय केले हे ही कुठे संघटनेने स्पष्ट मांडले नाही. सहा आमदार निवडूण येण्यास हाय कमांडने काय केले ? तर केले आसेल तर त्याचा सारांश तरी समाजा पर्यंत जावू द्या. समाजाला विश्वास द्या. पुन्हा नव्या जोमाने किमान ३० आमदारा पर्यंत मजल मारू. कॉंग्रेसने हेच दिले. भाजपा हेच देणार असे, देत असेल तर माझ्या सहित भगवान बागुल जे मांडतात त्याला नाक मुरडणे, विरोधक ठरविणे, कुणाला तरी आशीर्वाद देऊन फुकट फौजदार म्हएून वापरून घेणे. हे रास्ता नाही रास्त आहे. आत्म परिक्षण हे आत्मपरीक्षण वधु-वर मेळाव्या पासून सुरू व्हावे. कारण समाजाच्या अधोगतीस जी काही कारणे आहेत त्या पैकी भव्यदिव्य वधु वर मेळावे हे आहेत. मंडल आयोगानंतर समाज जागा झाला. घटनेने जे दिले होते ते देत नव्हते यासाठी कोणी साधा ब्रही काढला नव्हता. तो मंडल नेमला तेंव्हा किंवा देऊ नये यासाठी आडवाटा शोधली गेली तेंव्हा कोणी कसला संघर्ष केला नव्हता. परंतु मंडलने जे थोडे दिले त्यावर समाधानी राहुन आम्ही वधु-वर मेळाव्याच्या भव्य दिव्य पणात गुंतलो. ज्यांना आज हायकमांड म्हणुन संबोधले जाते. तेथे भव्य दिव्याला आकार आला. यातील चांगल्या बाबी आहेत. त्याबद्दल माझे दुमत नाही. आणि नसावे. परंतु या भव्य दिव्य पणातुन ज्या आधार वाटा जावून अंधार वाटा निर्माण झाल्यात या अंधार वाटावर आमचा हाल्ला आहे. त्या अंधार वाटा प्रकाश मय आसाव्यात हा आमचा संघर्ष. हा संघर्ष व्यक्तीगत संस्थेवर वा कोणा संघटणे बरोबर नाही हा संघर्ष परिवर्तना साठी आहे.
भव्यदिव्य मेळावे ही एक स्पर्धा सुरू झाली. हायकमांडच्या भव्य दिव्य मेळाव्यात जावून आपली ज्योत पेटवुन हाच भव्य दिव्य पणा उभा करण्यात लाखो जन जेंव्हा आपला व्यवसाय, आपले कुटूंब विसरून झटतात तेंव्हा त्यांच्या जिद्दी ची त्यांच्या त्यागाची स्तुती नव्हे तर त्या धडपडी समोर अनेक वेळा नतमस्तक व्हावे वाटते. हा आनंद क्षणभर आसतो. कारण या समाज कारणात पैसे देणारा हा केंद्र स्थानी आसतो. पैसे वाला हा प्रकाशात आसतो. आसनावर बसलेला व वधुवर पुस्तकात प्रसिद् झालेला बांधव मागीतले तेवढे देऊ शकलेला आसतो. मुळात याचा आर्थ एकच जसा पैसा तशी पात्रता ही या भव्य दिव्या खालील अंधार वाट, विषमता, भेदभाव याच ठिकाणी सुरू होतो. भव्य दिव्यचे मार्केटिंग जोरात सुरू आसते. समाजाला चांगले दिवस आले म्हणुन खोटेच पण खरे म्हणुन बिंबवले जाते. आशा वेळी मोल मजुरी करणारा वडापाव विकणारा, हाळीपाटी करणारा कोपर्यातली किराणा मालाची टपरी चालवणारा आठवडे बाजारात उन्हाळे पावसाळे झेलणारा समाज बांधव आपला आहे. या बांधवाची नक्की गरज काय ? याच्या साठी समाजाची ताकद काय वाटते. याचया जगण्याचे प्रर्न सोडव्यिासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून समाजाची संघटना लढली का ? हाय कमांडचा आदर्श घेऊन उभी राहिलेली ही मंडळी या भव्य दिव्य आदर्शा पुरते धडपडतात. भव्य दिव्य साजरे करणे हे हाय कमांडला जमुन गेले. पण आम्ही जमवता जमवता नाकी नऊ येतो. आणि यातुन यशस्वी झालो तर पुन्हा एक नवा सुंघर्ष आम्ही जन्माला धालतो. हे मोठे पण त्याला का मला का नको. कधी आरोप प्रत्यारोप तर कधी यातून २/४ भव्य दिव्य मेळाव्याची सुरूवात पुर्वी मेळावे होत. आज पिंपरी चिंचवड येथे एकाच्या दोन दोनाच्या अनेक संघटना भव्यदिव्य मेळावे साजरे करू लागलेत हे एक उदाहरण आहे. पुणे मुंबई किंवा इतर ठिकाणी या पेक्षा अधीक काय चालले आहे ? यातुन कार्यकर्ते संघटित होता होता. त्यांच्या सह समाज असंघटीत होतोय. समाजाचे जगण्याचे प्रश्न तसेच राहिलेत. कारण पैसा देणारा केंद्रस्थानी ठेवल्या मुळे ही अंधार वाट गडद अंधाराची बनत चालली.
माझ्या कडे अनेक पुरावे आहेत हे पहावयाचे असेल तर कधीही आपण फोन करून येऊ शकता पुरावे पाहू शकता. मी म्हणजे मोहन देशमाने नव्हें तर तेली गल्ली (गावकूस) मासिकाने सन १९९२ पासुन सन २००६ पर्यंत ५ वेळा समाजाच्या घरा घरात जावुन समाज सर्वे केला. घरातील डोकी, फोन नंबर न मोजता त्या सह आर्थिक परिक्षण केले. ते केले म्हणुन नक्की प्रर्न समजले. ते सोडवायचे असतील तर संघटन गरजेचे या देशाचे कॉंग्रूेस किंवा भाजपा हे शासन ब्राह्मण व क्षत्रिय जातींचे आहे. पक्षाचे सरकार बदलते पण या जाती बदलत नाही या शासन चालवता चालवता इतरांना शोसक जमाती फार करतात. या देशाच्या घटनेनुसार ओबीसी जीतींची जणगणना करूण या देशाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी त्यांना त्यांचा विकासाचा वाटा मिळाला पाहजे. ग्रामपंचायत ते लोकसभा पर्यंत त्यांना त्यांच्या संख्ये नुसार प्रतिनिधत्व मिळाले पाहिजे. ही जाणीव मला खाणे सुमारी करताना झाली. म्हणुन मी या सदरात ब्राह्मण व क्षत्रिय जातीवर भडीमार करतो. समाजाची ४/५ वेळा खानेसुमारी करताना हे समजले. याबद्दल मध्यवर्ती संस्थेचे मी आभार मानतो. त्यांनी सुज्ञ निर्णय घेतला कारण १९९० च्या दरम्यान मुंबई येथील शनैश्वर फौंडेशन व नाशिक शहर व जिल्हास्तरावर आशी खाने सुमारी झाली होती. कदाचित हा आदर्श ठेवून मध्यवर्ती संघटनेच्या हायकमांडने आदेश दिला महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जावा. घरातली डोकी मोजा त्यांची खाने सुमारी करा आणि तो रिपोर्ट जमा करा. हायकमांडची धारणा असावी हे करिताना कार्यकर्ते तयार होतील समाज संघटीत करतील. घरा घरात जाताना त्या घराचे पुर्ण अर्थिक, सामाजिक, राजकीय निरिक्षण करून हा आपला समाज नक्की मागे का ? गाव गाड्यातील, शहरातील बकाल जागेत जगणारा आपला बांधव कोणत्या प्रश्नात आडकलाय याचा ही रिर्पोट प्रत्येक जिल्हा देईल. खानेसुामरी बर्याच ठिकाणी पुर्ण झाली काही करतात ही काही जिल्हा अध्यक्ष आहेत किमान ४/५ की त्यांनी पद मिळून ४/५ वर्षात आपली तालुका, जिल्हा कार्यकारणी सुद्धा तयार केली नाही. मग खानेसुमारी येेण्यास किती वेळ लागणार ? हे प्रश्न सोडविण्यापेक्षा संघटनेचे काही फुकट फौजदार वतनदार समजुन नको तेथे म्हणजे अधीकार तर नसताना डोकावतात. खाने सुमारी नंतर काय तर ---- काहीच नाही. नाहीतर संधटनेच्या नावाचे कुंकू वधू वर मेळाव्याच्या कपाळावर लावून भव्य दिव्य मेळावे भरवुन हाय कमांडची शब्बासकी मिळवत आहेत. हे अनेक स्तरावर महाराष्ट्रात सुरू आहे म्हणुन जेष्ठ पत्रकार भागवान बागुल यांची मते विचारात घ्यावीत.
भव्यदिव्य मेळावा संपन्न करण्यास कमाल ७० लाख ते ७ लाख रूपये आज खर्च करावे लागतात. महाराष्ट्र भर साजरे होणारे जे मेळावे आहेत त्या सर्वांचा किमान खर्च हा १० ते १२ कोट रूपयांचा असावा. तो गोळा करण्यास लागणारी मानव शक्ती ही अफाट खर्च होत आसते. परंतु वधु -वर मेळावा ही संकल्पना समाज बांधवांनी न सांगता न ठरविता राबवली असेल तर ती श्री संत संताजींच्या समाधी स्थळी. सुदूंबरे येथे. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे ही संस्था मुळात समजाची मातृृसंस्था. एक शतकाची वाटचाल असलेली संस्था लाखो बांधवांच्या त्यागावर निष्ठेवर उभी असलेली या ठिकाणी उत्सव प्रसंगी ५ ते ७ हजार बांधव उपस्थीत असतात. मी स्वत: ३५ वर्ष तेथे उपस्थीत आहे. तेंव्हा प्रथम वर्गवारी करतो संताजी दर्शना साठी येणारे ६० टक्के बांधव असतात १० टक्के हौसे आसतात ३० टक्के बांधव जे आसतात. आपल्या ओळखी होतील. या ओळखीतून आपल्या मुला मुलींचे लग्न जमेल. सोबत आणलेलीमुलगा किंवा मुलगी दाखवता येर्ईल संताजी दर्शाना नंतर हा आघोषीत कार्यक्रम समाज बांधव अनेक दशके राबवतात यासाठी फी नसते या साठी देणगी नसते. तर ही मोफत वधुवराची परंपरा भव्य दिव्य वधू वरांच्या मार्केटींग पुर्वीची इथे आज पर्यंत हजारो लग्न समाजातील आर्थिक दुर्बल घटकांची जमलीत. पुर्वी येथे दरवर्षी स्मृती दिनी ४/५ लग्ने सामुदाईक पणे लावली जात असत. यासाठी संस्था सर्व आर्थिक भार सहन करीत आसे. सुरूवातीस मी पाहिल्या नंतर मोफत वधुवरांना प्रसिद्धी ही संकल्पना ३० वर्ष राबवली स्वखर्चांने घरो घरी जावून फी न घेता लाखो बांधवांना प्रसिद्धी दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. भव्यदिव्य मेळाव्याचे सोनेरी दिवस असताना हेटाळणी तिरस्कार अवहेलनेचे वाटेकरी आनंदाने राहून मी भव्य दिव्यपणाच्या संस्कृतीतील विकृतीवर हाल्ले करित होतो. दम बाजी, वाळीत टाकण्याची भाषा बहिष्काराचा प्रयत्न याला ही समोर जावुन हाल्ले पचवले. यातूनच वधूवरांना मोफत प्रसिद्धी मोफत प्रवेश मोफत भोजन देणारी श्री. आर. टी. आण्णा चौधरी यांच्या नेतृत्वा खालील जळगाव जिल्हा शिक्षण संस्थेच्या सहकार्यानी प्रथम जळगाव येथे मोफत संकल्पना राबवली. नाव नोंदवलेल्या वधुवरांना २८०० वधु वरांची पुस्तीका मोफत दिली गेली कोथरूड (पुणे) येथील समाज संस्थेने साधारणत: ७०० वधु वरांचा मोफत वधु-वर मेळावा यशस्वी केला. प्रत्येकला मोफत प्रवेश, मोफत भोजन व नोंदणी केलेल्या व उपस्थीत वधुवरांना मोफत पुस्तक. ही आलेली मोफतची गोंडस फळे.
मोफत वधु-वर मेळाव्याला पुणे जिल्हा प. ने. दिली दिशा
पुणे जिल्हा प. तेली महासभेने महाराष्ट्र समाज कार्याला वेगळी वाट निर्माण केली. ही वेगळी वाटा १८ जानेवारी २०१५ रोजी किमान ६००० हजार बांधवांनी स्वत: अनुभवली जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, शिरूर, भोर, हे सहा तालुके मुळात भौगोलीक बाबत समतोल नाही. तरी परंतू ही जबाबदारी अध्यक्ष म्हणून श्री. चंद्रकांत शेठ वाव्हळ यांच्याकडे आली. सर्वाना एकत्र आणने ही तारेवरची कसरत होती. ती सावरली मध्यवर्ती संघटनेने आदेश देताच खाने सुमारी सुरू केली. मोलमजुरी गाव गाड्यात भाकरीचा प्रश्न अडकलेली घरे, हाळी पाटी, आठवडे बाजार भांडवलाने ओस पडलेली किराणा दुकान आशा घरात जावुन सर्वे करता करता. समाजाचे प्रश्न समोर आले डोकी मोजता मोजता डोकी जगतात कशी हे समोर आले. समाजाता देान प्रवाह आहेत एक आहेरे वाल्यांचा पण त्या पेक्षा मोठा नाही रे वाल्यांचा यांचा सुवर्ण मध्य साधुन कुटूंब परिचय पुस्तक प्रकाशनासाठी निधी संकलन केले. मानव शक्तीचा योग्य वापर करून पुस्तीका मुद्रीत होवू लागली कार्यकर्ते घरा घरात गेले होते. डोकी मोजता मोजता प्रश्न समजुन घेत होते भव्य दिव्य वधुवर मेळावा हे पैसे केंद्रित झाल्याने प्रचंड आसा समाज या भव्य दिव्यात सामील होत नाही. या ही समाजाचा हा एक प्रश्न आहेच. तो प्रश्न आपन मोफत सोडवला तर ? या विचार प्रवाहाला गती मिळाली. तेली महासभेच्या हायकमांडला पुर्व कल्पना देऊन मोफत वधु वर परिचय मेळावा ही संकल्पना राबवु लागले. समाजाच्या घरा घरात संदेश गेला. भव्य दिव्य पण मोफत यासाठी हजारो बांधवांनी आळे फाट्यावर धाव घेतली. काही फक्त काही दिवसात प्रचार करता आला तरी शेकडो वधु वर पालक या ठिकाणी उपस्थीत राहिले. मोफत प्रवेश मोफत नोंदणी मोफत जेवण व अल्प पैशात वधु-वर पुस्तीका.
वधु -वर मेळावे ही समाजाची गरज परंतु अधीक ज्या गरजा आहेत त्या गरजाकडे पाठ करून कार्यकर्ते फक्त एकाच प्रश्ना साठी लढतात ही समाजाची वेदना या वेदनेवर लेखन करणे हे माझे कर्तव्य. भव्य दिव्याच्या नादी लागुन आपन विसरलोत आपल्यातील दुर्बल घटकाला. त्याच्या सर्वांगीण विकासाचे नुसते चिंतन नको तर आघाडी व युतीच्या भोगळ्या कारभारावर रस्त्यावर येऊन उत्तर दिणारे नेते व कार्यकर्ते तयार व्हावेत. आपली १३ टक्के मते घेऊन कॉंग्रेस सत्तेवर होती. त्यांच्या कडून लोकशाही मार्गाने मराठा - कुणबी ही जात ओबीसीतून दूर करावयास लावने. ओबीसी विकास महामंडळा तर्फे जे कर्ज दिले जाते ते घेण्यासाठी ज्या जाचक आटी आहेत त्या दुर करणे संताजी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे. या सामाजिक विकासाच्या मागण्या साठी मध्यवर्ती संस्था कार्यरत राहुन माईक व भोजनावळी व फकट फौजदारांच्या फुकट सल्ला दूर करून रस्त्यावर जर आली तर श्री. वसंतराव कर्डीले, श्री. मोहन देशमाने, भगवान बागुल, छगन मुळे यांना सत्य मांडण्याची संधी मिळणार नाही.