पश्चिम पुणे जिल्हा तेली समाज महासभा कुटुंब परिचय पुस्तिका २०१५ या पुस्तिकेचे प्रकाशन आखिल भारतीय तैलिक साहु महासभेचे अध्यक्ष,माजी मंत्री मा.श्री.जयदत्तअण्णा क्षीरसागर (विध्यमान आमदार बीड)यांचे शुभहस्ते आळेफाटा येथिल साईलीला गार्डन मंगल कार्यालयात रविवार दि.१८/०१/२०१५ रोजी संपन्न झाले. अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष मा.श्री.रामदासजी तडस साहेब(खासदार देवळी) होते. मा. श्री. भरतशेठ भिकुशेठ कर्डिले (अध्यक्ष तेली समाज ओतुर) हे होतेे .व्यासपीठावर मा. श्री. शरददादा सोनवणे (आमदार जुन्नर), मा. सुरेशभाऊ गोरे (आमदार खेड) मा. अशोककाका व्यवहारे (कार्याध्यक्ष महा. प्रां .तेली महासभा) मा.गजानन शेलार (कोषाध्यक्ष महा.प्रां.तेली महासभा) मा. भुषणजी कर्डिले(महासचिव महा. प्रां. तेली महासभा) पै. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी मा. दिलीप चौधरी, मा. सुभाष पन्हाळे, मा. दशरथ गाडेकर, भिकाजी भोज, मा. सौ. प्रियाताई महिंद्रे (प्रदेशाध्यक्षा, महिला आघाडी महा. प्रां.तेली महासभा) मा. सौ. जयश्रीताई देशमाने (महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा) मा. श्री. वसंतराव कर्डिले सर, मा. श्री. प्रसन्न कर्डिले (स्वामी समर्थ आँफसेट) मा. संजय पाटील (पोलीस उपायुक्त) मा. विजयशेठ रत्नपारखी (पुणे विभागीय अध्यक्ष) मा.जनार्दन जगनाडे (सुदुंबरे संस्था अध्यक्ष) मा. चंद्रकांतशेठ वाव्हळ (जिल्हाध्यक्ष पश्चिम पुणे) हे उपस्थित होते
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रां. तेली महासभेचे प्रदेश पदाधिकारी, विभाग,जिल्हा,तालुका,प्रभाग पदाधिकारी वमुंबई,नासिक,नगर,व इतर जिल्ह्यातुन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुस्तिका तयार करण्यासाठी माहिती गोळा करणे ते छपाईपर्यंत सर्व कामे माझे सहकारी जिल्हाउपाध्यक्ष सत्यवान कहाणे, सतिश दळवी, दिलीप शिंदे, राजेश राऊत, गणेश शेडगे, सोमनाथ फल्ले, महिला जिल्हाध्यक्षा सुनिताताई वाव्हळ,उपाध्यक्षा जयश्रीताई देशमाने, तालुकाध्यक्ष उल्हास वालझाडे, प्रदिप कर्पे, मारुती फल्ले, गणपत लोखंडे, ज्ञानेश्वर दुर्गुडे, गणेश पवार, कार्याध्यक्ष अनिल शेलार, वासुदेव कर्पे, नंदकुमार घाटकर, विठ्ठलअप्पा कर्पे, राजेंद्र तेली, अबासाहेब राऊत,ता.उपाध्यक्ष सोमनाथ काळे, उमेश शिंदे, भरत फल्ले, अनिल कहाणे, गजानन घाटकर, बळीराम धोत्रे, शेखर शेजवळ, अशोक केदारी, हरिभाऊ किर्वे, योगेश शेडगे, महिला ता. अध्यक्षा सुमनताई कसाबे, विध्याताई पन्हाळे, मीराताई फल्ले, संघटक शैलेश मखामले, सुनिल शेडगे व येथे नामोल्लेख न झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असे प्रास्तविकात जिल्हाध्यक्ष चंद्रकांतशेठ वाव्हळ यांनी सांगितलेे
जिल्ह्यातील सहा तालुके आणि मुळशी तालुक्यातील कासारसई गांवातील समाजबांधव कार्यकर्ते यांचे सहकार्याने कुटुंब परिचय पुस्तिका तयार झालेली आहे.समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजबांधवांचे ऋण व्यक्त करुन यापुढेही समाजसेवेसाठीशनीमहाराजांची व संताजी महाराजांची क्रुपा लाभावी असे विचार मा. श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ पुणे जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविकातुन मांडले.
याप्रसंगी मा.शरददादा सोनवणे(आमदार जुन्नर) मा.अशोककाका व्यवहारे, मा.गजानन(नाना शेलार, मा.भुषणजी कर्डिले (महासचिव) यांनी आपले विचार व्यक्त केले.
सुदुंबरे येथील संताजी महाराजांच्या तीर्थक्षेत्राच्या विकासआराखडा तयार करुन त्याचा विकास व्हावाअसे मत माजी मंत्री मा.जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी व्यक्त केले सध्याच्या युगात पालकवर्गाने पाल्यांना अधुनिक शिक्षण द्यावे असेही त्यांनी सांगितले. चंद्रकांतशेठ वाव्हळ यांनी पुणे जिल्ह्यात सहा तालुक्यात समाजबांधवांचे संघटन चांगले करुन समाजाची कुटुंबपुस्तिका समाजाला उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन . खासदार मा. रामदासजी तडस यांनी केले.
वधु वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळुन मेळाव्यात पांचशे वधु वर नोंदणी झाली. राजगुरुनगर तेली समाज बाल युवक ढोल पथकाने विनामुल्य सेवा देऊन अतिथींचे उत्क्रुष्ठ स्वागत केले. त्याकामी व्यवस्था संदिप दिवटे,प्रकाश गिधे ,चक्रधर खळदकर,गजानन घाटकर यांनी पाहिली. श्री. राजेश रत्नपारखी, श्री.संजय फल्ले, नारायणगांव यांनी विनामोबदला आर्केष्ट्रा सेवा सादर करुन समाजाचे मनोरंजन केले.त्याकामी व्यवस्था विष्णुमामा दळवी, राजेश जगनाडे यांनी पाहिली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आळे, राजुरी, ओतुर, पिंपळवंडी, नारायणगांव, जुन्नर, परिसरातील समाजबांधव, कार्यकर्ते, खेड, आंबेगांव, शिरुर, मावळ, भोर तालुक्यातील समाजबांधव व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. संयोजन समिती अध्यक्ष श्री. प्रदिप द. कर्पे (खेड ता. अध्यक्ष म प्रां तेली महासभा) योगोश खेत्री सर ,दत्ता कर्डिले यांनी कमिट्यांचे य श स्वी नियोजन केले. कार्यक्रमासाठी अल्पदरात कार्यालय दिल्याबद्दल श्री. कुर्हाडे यांचे ,मान्यवर अतिथी,समाजबांधवांचे मा.श्री.चंद्रकांतशेठ वाव्हळ,पुणे जिल्हाध्यक्ष यांनी आभार मानले.