मराठ्यांचे मराठा पण व ना. राणे कमिटीचे बुजगावणे.

-: मोहन देशमाने, उपाध्यक्ष   ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र.  

    मराठ्यांना ओबीसीत प्रवेश देण्याविषयी ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. नारायण राणे म्हणून महाराष्ट्रात वावरणारी ही कमिटी म्हणजे एक बुजगावणे उभे केले आहे. या बुजगावण्याकडे धावणार्‍या तमाम मराठा समाजाच्या संघटना व ओबीसी संघटना आज विरोधात व समर्थनात धावत आहेत. आणि बुजगावणे कमीटीकडे आशाळभुत पहाणारे तमाम समाज दिसतात तेंव्हा काही प्रश्न मांडावे लागतात.

आरक्षण देऊ पहाणार्‍यांचे बहुजन पण कधी संपले.

     मराठा समाज हा राजकीय, सामाजीक आर्थिक आघाडीवर सक्षम समाज आहे. शेकडो वर्ष यांच्या ताब्यात या सर्व बाबी आहेत. मोंगल, पेशवाई इंग्रज या राजवटीत बर्‍याच गोष्टी याच समाजाच्या ताब्यात होत्या. त्या आज ही आहेत. गावचा कारभार हा मराठा व ब्राह्मण खाांद्याला खांदा लावून चालवत होता. गाव गाड्यात पाटील व कुलकर्णी हेच समाज होते. परंतू शाहू महाराजांना फुल्यांच्या विचार सरणी मुळे ब्राह्मणांचा डाव समजला. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाला राजाश्रय मिळाला. दुर्देव असे शाहूंच्या नंतर सत्यशोधक विचार प्रणालीला ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर हे वळण मिळाले. या वेळी फक्त मराठा व ब्राह्मण हा वाद पेटला. पण या वादात बहुजन असलेला इतर मागास या चळवळी पासून दूर होता किंवा तेंव्हा ही तो मराठा समाजाच्या विषयी साशंक होता म्हणून तो या पासून दुर राहिला. कदाचित दुसरे ही कारण असावे. कारण सत्यशोधक समाजाच्या पहिल्या कालखंडात इतर मागासवर्ग सामील होता. हा जो ब्राह्मण व ब्राह्मण्येत्तर वाद होता तो तेंव्हा ही चांगला पेटला होता. जवळकर, जेधे या मंडळींनी समोरा समोरची लढाई केली. पण चळवळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षात विलीन करून सत्यशोधक प्रणालीच संपवून टाकून भविष्यातली बहुजनांची क्षितीजे नष्ट केली. सत्यशोधक विचाराने उभे राहिलेल्या या मंडळीत ब्राह्मण राग तसाच काही काळ धुमसत होता. या धुमसण्याचा अनुभव थोडासा महात्मा गांधीच्या खुना नंतर आला. खेडो पाड्यातील ब्राह्मण समाजाची घरे सामुदाईकपणे जाळण्यात आली. ही जाळताना एक जबरदस्त कारण ही या समाजाकडे होते. गावचा पाटील मराठा जरूर होता. पण बर्‍याच लिखापडी गावचा कुलकर्णी म्हणून ब्राह्मण समाज करित होता. मंडळींनी बर्‍याच बाबत मराठ्यांना दगा दिला होता. घरे जाळताना माणसासहीत न जाळता बहुतेक ठिकाणी कागदपत्रासहीत जाळली. आणि गावगावच्या शेकडो एकर  जमिनी मराठ्यांच्या मालकीच्या सहज झाल्या. हे वास्तव विसरता येणार नाही. स्वतंत्र्याच्या सुरूवाती पासून या मंडळींनी बहुजन हि एक वाटचाल दाखवली. ही वाटचाल फसवी आहे याचा अनुभव त्यावेळी इतर समाजाला येत होता. परंतू गावगाड्यात असलेला अलुतेदार बलुतेदार समाज हा हातावर पोट असलेला असल्याने त्याच्या घरात भाजली जाणारी भाकरी ही पाटलाच्या वाड्याला सांगून येत होती. आपल्या तोंडातील नव्हे तर चार भिंती आतील आवाज सुद्धा ही भाकरी हिसकावून घेतली जाऊ शकते. आपल्या पोरा बाळांना देशोधडीस लावू शकतात तेंव्हा जे आहे. जे जगने हाच जगण्याचा मार्ग बहुतेकांनी स्विकारला. इतर मागास स्वातंत्र्य मिळण्यासाठी शेकडो हुतात्मा झाले. हजारो  शिक्षा भोगून आले. स्वातंत्र्य, समता मिळाली म्हणून काही हाक्क शोधू लागले. पण यांना जातीचे लेबल लावून जातीतच जगा नव्हे तर राजकारण हा भाग तेली, माळी, कुंभार, सुतार शिंपी यांचा नाही हे खडे बोल सुनावुन घरात ठेवले. बहुजन हा मुखवटा मात्र चढवायला विसरले नाहीत. या स्वातंत्र्याच्या पहिल्या खंडात कॉंग्रेस मध्ये मराठा समाज एकवटला तद्वत विरोधी पक्षात ही शे.का.प. या सारख्या विरोधी पक्षात ही तो जरी होता. तरी सुद्धा काही प्रमाणात या पक्षातील मराठे विचाराने समानतावादी होते. हे ही नमुद करावे लागेल. परंतु कॉंग्रेस पक्षाला याचा जबर फटका बसताच. बरेच मराठे कॉंग्रेसला आपली मानुन सामिल झाले. मग पुर्वीच्या मराठे पणाला गती आली. पक्षांतर्गत किंव इतर ठिकाणी सुद्धा विरोधक व सत्ताधीश  मराठेच राहिले. त्योंच्या भावकीची त्यांच्या गावकीची. त्यांच्या मोठेपणाची लढाई एक तर दुर राहुण पहाणे किंवा कातडी वाचवत जगणे. त्यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय पणातला बहुजन हा शब्द मुखवटा होता. हे कळते पण ?

 इतरांचे अहित व मराठ्यांचे सुखाय पण

     कॉंग्रेस स्थापन्या मागचा सुरवातीचा हेतू स्वातंत्र हा नव्हता कारण ती स्थापन झाली ब्राह्मण जपण्यााठी आणि उच्च हिंदू मधील मराठा किंवा इतर राज्यातील उच्च जाती जस जश्या सामील झाल्या. तस तश्या हेडगेवार यांनी आर.एस.एस. ही ब्राह्मण्य जपणारी संघटना नेमकी त्यावेळी स्थापन केली. तद्वत कॉंग्रेस मध्ये जावून बहुजन हिताय ही वाट सुरू करणारे राज्यकर्ते हे मराठे होते. गावची पाटिलकी, ग्रामपंचायत, पंचायतसमिती, जिल्हा परिषद, आमदारकी खासदारकी व गल्ली बोळातील सहकारी संस्था याच समाजाच्या ताब्यात. कुळकायदा, सहकाराचे जाळे, शासनाच्या विविध योजना याच समाजाचे राज्यकर्ते राबवत होते. कर्मवीर अण्णा, डॉ. बापूजी साळुखे या सारखी मराठा किंंवा इतर समाजातील मंडळी शिक्षण क्षेत्रात होती. पण थोड्याच दिवसात शिक्षण सम्राटाचे जे पेव फुटले ते शिक्षण सम्राट बहुतेक मराठा समाजातील आहेत. उघड्या बोडक्या माळावर सहकार तत्वावर साखर कारखाने उभे करणारे मराठेच होते व आहेत. या साठी गोरगरिब मराठा शेतकर्‍यांचे शेअर्स जमा ही केले मोजता येणार नाही इतका पैसा महाराष्ट्र शासनाचा या कारखान्याला वेग वेगळ्या तर्‍हेने मिळत गेला. मदत करणारे शासन कर्ती जमात ही मराठा होती. यातीलच बरेच जन सहकार सम्राट होते. सहकारात पैसा दिसतो किंवा शासनाच्या निधिवर कारखाने चालतात दिसताच इथे मलीदा दिसला सत्तेची लढाई लढणारे विरोधक व सत्ताधीश मराठेच होते. एवढेच नव्हे सख्खे भाऊ लढाई लढून कारखाना स्वत:च्या घरात ठेवणार मराठेच होते आहेत. हरित क्रांती व दुधाचा महापूर याच राजकर्त्या जमाती गरिब शेतकरी समृद्ध करण्यासाठी राबवला. ह्या सर्व योजनात शासनाच्या कोट्यावधीचा निधी यांच्या हातात असताना श्रीमंत कोण झाले हे ही गुपीत रहात नाही. शासनकर्ते मंडळी देश ते गल्ली पयंत असताना भिंती आडचा गरिब मराठा राहिल कसा ? तुमच्या सत्तेच्या लढाईत होरपळणारा तेली, माळी, धनगर सुतार, शिंपी आशा जातीतील मंडळी यांना मता साठी हवी होती यांच्या घरात चुल कशी पेटती हे कधी समजेल का ?

 मराठ्यांच्या तापल्या तव्यावर मराठ्यांची भाकरी करपु देणे ?

     स्वातंत्र्यात बहुसंख्य असलेल्या शे.का.प. मधील मंडळी ही सर्व जातीची होती. परंतू मराठा पण सिद्ध करण्यासाठी फोडा व झोडा या नितीचा अवलंब करून बरेच मराठे कॉंग्रेसवाशी झाले. इथे कॉंग्रेस म्हणजेे मराठा हे समीकरण झाले. नावा पुरता मुख्यमंत्री काही काळ इतर समाजाचा ठेवला. त्या बदल्यात विकास कुणाचा केला हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बंजाराचा का यावर त्यावेळी आकाशपातळ एक करणारी जी मंडळी होती. ती सुद्धा त्याकाळातील सत्ताधीश मराठाच होते. स्वातंत्र्यासाठी यशवंतराव चव्हाणाबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे किसनवीर शिंपी समाजातील होते. यशावंतराव उपपंतप्रधान झाले. किसनवीर यशवंतरावा साठी मतदारसंघ संभाळत राहिले. ते आमदार ही होऊ शकलेे नाहीत. उलट एक शिंपी म्हणून अवहेलनेच मालक ठरले. का तर ते मराठा समाजातील नव्हते ते जर आसते तर ते सुद्धा मंत्री मंडळात गेले आसते. याच दरम्यान आणिबाणी जाहीर झाली. केंद्रात फार मोठा बदल झाला. तो महाराष्ट्रात हवा तसा झाला नाही. पण या भुकंपात मराठा समाजाला फार मोठा धक्का बसला. कारण दावणीला आंसलेली ओबीसींचे तांडे सुटू लागतील याची प्रचिती समोर आली. स्वातंत्र्या नंतर प्रथमच उच्च जातींच्या विरोधातील बहुसंख्य जातींचे सरकार सत्तेत आले होते. जाती नजरेच्या टापूत होत्या ज्या जाती शब्दा बाहेर नव्हत्या त्या जातीत उमटू पहाणारा स्वर अंधार देणारा आहे. याची  जाणीव शासन कर्ती म्हणून ती मराठा समाजातील होती त्यांना झाली आणि पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग एका बाजूला जसा उभा राहिला. तद्वत याच दरम्यान मराठा समाजाची वेगळी संघटना उदयाला आली. हा योगा योग नसुन भविष्याची रणनीती ही होती. कारण बहुसंख्य निवडून गेलेल्या खासदारांच्या गोदामाचे कुलूप उघडले होते. याला विरोध म्हणुन उच्च वर्णीय जागे झाले. कारण सत्तेची भाकरी  आपल्या तव्यावरच भाजली पाहिजे ती आपल्या स्वैपांक घरातच वाटली पाहिजे. ती आपल्यातच भाकरी पचली पाहिजे हा विचार होता. ती आपल्यातच फिरली पाहिजे. ती करपू दिली नाही पाहिजे. यातुनच मंडलला प्रखर विरोध करणारी मंडळी उभी राहिली. मंडल आयोग आमलात आल्यानंतर तो महाराष्ट्रात आम्हीच राबवीला सांगणारे सत्तेतील मराठाच होते. फुले, शाहु, आंबेडकरा नंतर पुरोगामी महाराष्ट्रात काटेवाडीचा सुपुत्राचा नंबर म्हणून ढोल बडवणारे बिनडोक ओबीसी होते.

 बिनडोक ओबीसी नेते व मराठ्यांची अनिती.

     शिवसेना ही मराठी माणसासाठी पण या भरवश्यावर आपण उभे राहू शकलो. पण सत्तेजवळ जावू शकणार नाही. याची खुणगाठ समजली कूँग्रेसच्या मराठा करणात होरपळलेले बहुतेक समाज हे शिवसेना व भाजपाने जवळ केले होते. त्या त्या समुहातील  युवक निवडून त्यांना घडविले होते. तयार केले होते. कॉंग्रेस बहुजन सांगत होती तर ही मंडळी झिडकारलेल्या समाजातून आले होते. त्या समाजाच्या वेदनांना हिंदूत्वाची फुंकर घालून त्यांना लढावयास लावले. आगदी नगण्य असलेले हे दोन पक्ष महाराष्ट्रात खोलवर रूजवण्यात ओबीसीतील ठरावीक मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. शे.का.प. मोडीत काढल्या नंतर मराठा समाजाविषयी असलेला राग व्यक्त करण्यास अनेक जन आपला समाज घेऊन गेले. आणि कॉंग्रेस मधील मराठ्यांची सत्ता उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आली. देशामधील कॉंग्रेस नितीने त्या त्या राज्यातील प्रबळ जात गट जवळ ठेऊन. एक हाती सत्ता ठेवली होती. परंतु लोहिया वादातून तयार झालेल्या इतर  जातींनी या प्रबळ जातींची दादागीरी जी मातीत मिसळली. त्यातूनच अनेक जात समुह त्या त्या राज्यात सत्ेतेचे वाटेकरी ठरले. महाराष्ट्रात असे का घडले नाहीतर कॉंग्रेस मध्ये असलेल्या मराठा समाजाचा बहुजनवादी मुखवटा की जो शे.का. पक्षाच्या अस्तानंतर प्रभावी ठरला होता. त्यांनी भविष्यातले धोके ओळखून फुले, शाहु, आंबेडकर ही समता प्रणाली चा मुखवटा प्रभावी पणे समोर अणण्यासाठी आंबेडकरांचे नाव विद्यापीठास देण्याचे यंत्रणा राबवली. तरी ही सेेना, भाजपा सत्तेच्या जवळ  गेले. सत्ेत ही गेले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण झाला तोही प्रबळ मराठा लॉबीचे सहकार्य न घेता. उद्या माळी, तेली, वंजारी यांचा ही होवू शकतो. जी प्रक्रिया आज उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान या मध्ये घडली आहे. म्हणून फुले, शाहु आंबेडकरांची पुरोगामी महाराष्ट्रात ही टिमकी वाजवू लागले. मात्र प्रत्यक्षात काय. सेना, भाजपा सारख्या पक्षात या मंडळींनी शिरकाव सुरू केला . आणि तेथील ओबीसी नेतृत्व दूर होण्याची वाट पाहू लागले. आज महाराष्ट्रात कॉंग्रेस संस्कृती फोफवली आहे त्याची पाळे मुळे वाडा संस्कृतीला धक्के देऊन ना. भुजबळांनी उध्वस्त केली. एक माळी तुम्हाला उध्वस्त करतो ही किमया करून दाखवली. शिवसेनेतील कलहातून जरी भुजबळ बाहेर पडले किंवा पवारांची राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेस उभारताना याच ओबीसींचा खरा आधार त्यांना होता. याच जोरावर राष्ट्रवादी (मराठावादी) उभे राहिली. बीडचे क्षिरसागर, भुजबळ या सारख्या ओबीसींनी पवारांना आपली ताकद दिली. मराठा प्रबळ नसलेल्या परिसरातून आशा भागातील ओबीसींनी राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेस आपली मानली. या वेळी पवार साहेबांनी मंडल आणला. फुले शाहू आबेडकर नंतर चौथे पवार साहेब ही प्रतिमा मुखवटे रचुन तयार केली. भुजबळ कालचे आजचे व उद्याचे आसे तिन टप्पे होतील. कारण भुजबळ हे ओबीसींतील एक नंबरचे नेते. मग आज कुठे आहेत.

 सत्तेतील दलाल भुजबळ, क्षिरसागर, होऊ शकतात का ?

     या प्रश्नाची उत्तरे शोधणे हे महत्वाचे.या ओबीसी नेत्यांची वेगवेगळी कार्यकर्त्यांची फळी आहे. प्रत्येकाा दावणीला बांधलेले प्रत्येकाला हा पश्न आवडणार नाही. यातील  बरेच जन हा प्रश्न विचारणे म्हणजे ओबीसी नेत्यावर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उभा करण्यासारखा आहे. हा प्रश्न विचारणे हाच गुन्हा आहे. कारण या प्रश्ना बद्दल मी मागे त्रोटक लिखान करताच ते प्रसिद्ध लेखन घेऊन एक महाभाग दारो दारी फिरू लागले. निष्ठा जरूर असावी पण अंध निष्ठा नसावी. सत्याला सामोरे जाताना सत्य नाकरण्याची मानसिकता नसावी. कॉंग्रेसच्या झालेल्या मराठा करणात ओबीसी जाती झिडकारल्या होत्या. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सोनाजीराव क्षिरसागरांना तु तेली आहेस राजकारण हे मराठ्यांनी करावे तेल्यानी नव्हे. याच इर्षे साठी क्षिरसागर घराणे राजकारणात उतरले. भुजबळ व मुंडे यांच्या जातीची मते मिळतील म्हणून सेना व भाजपाने जवळ केले. आज जी शिवसेना किंवा भाजप उभी आहेत. त्यांना उभे करण्यात याच भुजबळ व मुंडे यांची भुमीका ही पाया भरण्याची आहे. प्रथम सत्ता दिसताच शिवसेनेत भुजबळांचे माळी पण दिसू लागले. बाळासाहेबांच्या गडाला खिंडार पाडताना भुजबळ सांगत होते. ओबीसींच्या मंडल आयोगाला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला. आमचे हाक्क देत नाहीत म्हणून शिवसेना सोडली आणि फुले, शाहू अंबेडकरांचा मुखवटा धारण केलेल्या पवारांच्या कडे आले. पुढे काय ते सविस्तर मी मांडत आहेच. मुंडे हे वंजारी समाजातील वंजारी समाजातील वंजारा बहुसंख्य मतदार संघात कॉंग्रेस आयात उमेदवार मागवून खासदार व आमदार मराठाच कसा असेल यांची काळजी घेतली होती. राजकारणाच्या परिघा बाहेर वंजारी ठेवण्याचा मराठा लॉबीने जाणीव पुर्वक प्रयत्न केले होते. याचा अभ्यास ब्राह्मणी प्रणालीने करून मुंड्यांना घडविले. प्रमोद महाजनांच्या नंतर काय ? याचा आढावा जर घेतला तर हे प्रस्थापीत ओबीसी नेते. ओबीसींचे नेते होऊ शकतात का ? जर होऊ शकतात तर आज ही जी ओबीसींची लांडगे तोड होत आहे. या बद्दल त्यांची स्पष्ट जाणीव पूर्वक भुमीका ओबीसींना पोषक असा नाही  जर ती असेल तर मराठ्यांच्या दादागीरीला ते रस्त्यावर येऊन का उत्तर देत नाहीत. किंवा बोगस ओबीसींना बाद करण्यासाठी शासन दरबारी किंवा न्याय प्रक्रियेत का न्याय मिळवून देत नाहीत. याला कारण एक जर त्यांनी मराठा समाजाच्या दादागीराला उत्तर दिले तर निवडून जाने आवघड वाटते ? या ही बाबत अवघड नाही कारण महाराष्ट्रात खरे ओबीसी ५२ टक्के आहे. ओबीसी प्रश्ना साठी लढले तर ओबीसी मतांची व्होट बँक त्यांच्या बाजूला झुकेल. पण यासाठी लागणारी धडपड त्यांना आज नकोय. नुसत्या ओबीसीं विषयी केलेल्या मागण्यांना ओबीसी आशोने पहातो. याच भरवश्यावर तिकीट मिळवणे निवडून जाने. मग सत्तेत किंवा विरोधात समाजाच्या विकासा पेक्षा स्वत:चा विकास साधने ही वाटचाल जेंव्हा मळलेली तयार होते तेंव्हा मराठा आरक्षण किंवा २३ हजार मराठ्यांनी ओबीसी आरक्षणात सत्ता मिळवणे म्हणजे नेत्यांची ओबीसी निष्ठा का ? हा प्रश्न आज ओबीसींना पडला आसेल तर चुक कुणाची.

 मराठा - कुणबी - मराठा ही कपट निती कोणाची

     स्वातंत्र्याच्या पुर्वी ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर वादात सत्यशोधक समाज ही प्रणाली त्या वेळच्या मराठ्यांच्या हातात होती. याच दरम्यान कॉंग्रेस मधील समाजवादी ब्राह्मणी प्रणालीने राहिलेल्या हिंदू उच्च जातींना आपल्यात समावून घेतले. या वेळी मराठा समाजातील अनेक पोटजाती की जाती अंतरगत कमी किंवा उच्च होत्या. त्या मराठा म्हणून एकत्र आल्या. स्वातंत्र्या नंतर त्या अधीक एकजीव झाल्या. नात्या गोत्यात सोयरीक करतील. रक्ताच्या नात्यात मुली देतील करतील पण राजकारण किंवा सत्ता कारण यात मात्र एक असतील हा एकोपाच खरा आजपर्यंत सत्ता स्थानी रहाण्यास मराठा समाजास उपयोगी पडला. हाच एक जीव पणा ओबीसींना सातत्याने मारक ठरला आहे. शेती हा उद्योग बहुसंख्य मराठ्यांचा त्याचा विकासाच्या नद्या इथेच गेल्या पाहिजेत हे वास्तव ही आहे. पण या वेळी अधुनिकता आवतरली जशी अधुनीकता आली तस तसे शेतीवर अवलंबलेले बलुतेदार ओबीसी उध्वस्त झाले. यांच्यासाठी खादी ग्रामोद्योग हे बुजगावणे उभे केले. विकास ओबीसींचा पण करणारे मंडळ. यावेळी तालुका ते राज्य पातळीवर नाड्या पुन्हा मराठा समाजाच्या हातात. आणि ओबीसींच्या तोंउाला पाने पुसण्याचे काम सत्तेत राहुन केले गेले. जय प्रकाशांच्या क्रांती नंतर जी पडझड झाली त्यातून मंडल आयोग नेमला. या मंडल समोर कोणताच मराठा किंवा मराठा संघटना आम्ही गरिब आहोत सांगण्यास गेले नाहीत. कारण आपण कसे आहोत याची पुर्ण जाणीव त्यांना होती. उलट भविष्यात आपल्या ताटातच आपण जमवून ठेवले ते कायद्याने जाईल. या जाणीवेने काही मराठा संघटना त्या आरक्षणाच्या विरोधात  ही उतरल्या रस्त्यावरची लढाई सुरू झाली. याच वेळी बामसेफ किंवा भारतमुक्ती मोर्चा यासारख्या पुरोगामी विचाराच्या संघटनांच्या संपर्कात काहीजन आले. इथे बरेच जन शिक्षित झाले. ब्राह्मणशाहीची लढाई सुरू झाली. ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर लढाई पुन्हा शंभर वर्षानी महाराष्ट्रात उभी राहिली. पुरोगामी ओबीसी मराठा  समाजातील या परिवर्तनाला खांद्याला खांदा लावून लढू लागले. भांडारकर इंस्टुट किंवा दादोजी कोंडदेव प्रकरणारत ओबीसी बांधवांनी मराठा समाजाच्या या संघर्षाला सोबत दिली ही फक्त ब्राह्मण हे ध्येय ठरवून काही दलित संघटना, ओबीसी संघटना मराठ्यांच्या सोबतीला होत्या. यातून मराठ्यांच्या काही संघटना उग्र रूप घेऊन समोर आल्या. जशया त्या आल्या त्या गरिब मराठ्यांच्या हितासाठी. गरिब मराठा कोण ! गाव पातळीवरील दोन मराठा  समाजातील सत्ता संघर्षात गरिब मराठ्यांना बरोबर घेऊन लढणारे कोण ! त्यांच्या वर आपलाच बांधव अन्याय करीताना दुसर्‍याने सत्ता मिळवणे किंवा टिकवणे यासाठी यांचा वापर करून वार्‍यावर सोडणारे. याचे उत्तर सुर्यप्रकाश इतके सत्य की  स्वातंत्र्यात देश ते गाव पातळीवर सत्तेत किंवा विरोधात असलेल्या मराठा समाजाजील मंडळींनी आपल्याच भावबंधवानांच विकास होऊ दिला नाही. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मक्तेदारी याच समाजाची सहकारा शिवाय विकास नाही याची जाणीव लोणीच्या विखे पाटलांना झाली त्यांनी सहकार प्रणाली राबवली. शासनाने मोजता येणार नाहीत इतकी मदत या ठिकाणी ओतली तरी यातून मराठे गरिब ठेवणारे कोण ? मलिदा लाटणारे कोण ? हे उत्तर आज का देत नाहीत. शाहु महाराजांनी शिक्षणाची जाणीव ठेवली. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबूराव जगताप, डॉ. बापूजी साळुंखे अशी मंडळी शोधली तर यातील कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठा नाहीत बाकी उरलेले मराठा समाजातील मंडळींनी ध्येयाने शिक्षण संस्था काढल्या. परंतू गेल्या ३० ते ३५ वर्षात जे शिक्षणाचे गाजर गवत उगवले आहे. या गवताचे मालक बहुतांश मराठाच मंडळी आहेत. अनुदानीत किंवा विना अनुदानीत शाळा कॉलेज मध्ये आज शिक्षण हे पवित्र न ठेवणारे कोण ? विना अनुदानीत क्षेत्रात आज सम्राट असलेल्या मंडळीचे एजंट देशभर फिरून डोनेशन गोळा करणारे हे शिक्षणसम्राट आपल्या गरिब मराठ्याना अल्प फी मध्ये का प्रवेश देऊ शकत नाहीत ? कारण पुर्वीच्या शिक्षण सम्राटांनी अगदी गुरे राखणारा चुन चुनित गरिब मराठा हुडकून त्याला मोठे बनवले आहे. उदा. बॉरिस्टर पी. जी. पाटील सारखे विद्वान असलेले परंतु सत्ता, संपत्ती यात गुंतेलेले हे सम्राट जेंव्हा गरिब मराठा समाजा विषयी पुळका दाखवतात तेंव्हा त्यांच्या खरे पणा विषयी शंका उत्पन होतात. मी पुन्हा मांडतो ओबीसींना आरक्षण म्हणताच महाराष्ट्रातील ब्राह्मण व मराठा समाजाने वेग वेगळ्या पद्धतीने आपला विरोध प्रकट केला होता. हे आज आरक्षण मागणारे मराठा समाजातील संघटनांचे प्रतिनीधी कबूल ही करतात. मग आसे काय घडले की एकाएकी गरिब मराठा यांची यांना आठवण झाली. आणि मराठा कुणबी ही अस्तीत्वात नसेलेली मराठा - कुणबी ही नवी जात महाराष्ट्रात अस्तीवात आली. याला आपल्या सत्तेते वाटेकरी इतर समाज आले. ते सुद्धा कायदेशीर ही बाबच मुळात नको होती. गावच्या बलुत्याला गावच्या अलुतेदाराला, गावच्या कष्टकरी समाजाला खुर्चीत बसवणे व त्याच्या हातात सत्ता जाने ही बाब अनेकांना सहन होत नव्हती. आण्णा हजारे यांच्या अंदोलनात एका गावातील एक पाटील व चांभार समाजातील बांधव होते. पण गावचा सरपंच चांभार होताच त्या पाटलांना हे सहन झाले नाही ही खंत त्यांनी आपले सहकारी चिंचकर यांच्या समक्ष आण्णा हजारे यांच्या समोर व्यक्त केली. चळवळीत खांद्याला खांदा लावून लढणार्‍याची ही तर्‍हा तर बाकीच्यांची काय असणार.? ओबीसींसाठी ५२ % आरक्षण परंतू ओबीसींना २७ टक्के हा म्हणजे दिलेली ही चतकोर भाकरी सुद्धा त्यांना जावु नये ही धडपड.

 आम आदमी व हिंदूत्व जपणारे ओबीसींचे शत्रु आहेत.

     या वरील विधानात आजचे मराठा समाजाची अतिरेकी घुसघोरी दडली आहे. याचा स्पष्ट पुरावा पाहु. आम आदमीचा मुखवटा धारण करणारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेस व हिंदुत्वाची जपमाळ जपणारे भाजपा, शिवसेना यांचा ही मुखवटा आपण टरा टरा फाडला तर दिसून येईल यांना ओबीसी विषयी आस्था, निष्ठा व प्रेम आहे का ? हि युती व आघाडी सत्ेत किंवा विरोधात आसते तीच मुळात ओबीसी मतावर यांच्यासाठी ओबीसी लढतात तुकडा नव्हे तर एखादा घास टाकतात. या घास साठी धावतात कधी कधी आपल्यातच एकमेकाचे पाय तोडतात. एका घासासाठी फितूर होतात. प्रत्यक्ष समाजाला दाढेला देऊन काही काळ सुखात रहातात. समाजाशी बेइ्रमान झालेल्या आशा बेईमानाला समाज ओळखून आसतो त्याच्या पाठीमागे कोणच नसते. आणि आपण बेईमान आहोत याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा सर्व रसातळाला गेले आसते. असली ढिग मंडळी व आघाडीच्या सत्ता संघर्षात लढत आसतात. परंतु या दोघांचे प्रमुख हे एक तर उच्च हिंदू आहोत. हे उच्च हिंदू सत्तेसाठी लढतात. सत्ता कोणाची येवो फार मोठा फरक या उच्च हिंदूत पडत नाही. तो फरक पडत आसतो. त्यांच्यासाठी लढणार्‍या ओबीसीत कॉंग्रेस संस्कृतीला ओबीसी आरक्षण नकोच होते पण देण्याची वेळ आली तेव्हा अनेक वेळ वाकडी वाट तयार केली. जे दिले ते सुद्धा देऊ नये एवढी माणसीकता होती. पण घटनेला बगल देता येत नव्हती. आशा वेळी जे मिळाले ते घटनेने नव्हे तर आपल्या पक्षाच्या साहेबानी दिले. या बावळ्या श्रद्धे पायी निष्ठा मराठा समाजातील नेत्या समोर ठेवल्या. या निष्ठाच यांच्या हितास करणीभूत ठरल्या. डॉ. बाबासाहेबांच्या मुळे गावकूसा बाहेरचे ना. सुशीलकुमार शिंदे गावकूसाच्या आत आले. परंतू या शिंदे साहेबांनी आपली वर्णी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर लावून घेतली. एक दलित मुख्यमंत्री महाराष्ट्राने दिला म्हणून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने ढोल वाजवले फुले, शाहु, अंबेडकरांचा जागर महाराष्ट्रात मांडला परंतू वस्तूस्थीती वेगळीच आहे. याच सुशिलकुमार शिंदेच्या सहीने की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा-कुणबी ही सोय करून दिली. त्यांच्या सहीने आदेश निघाला या घुसघोरीला मागासवर्गीय आयोगाची मान्यता ही नव्हती आणि आज ही नाही. मराठा - कुणबी जात काल व आज ही अस्तीत्वात नाही. ही सोय आम आदमी सांगणार्‍या कॉंग्रेस संस्कृतीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसने साधली. आणि महाराष्ट्रात किमान २३ हजार जागा स्थानिक संस्थेत मराठ्यांनी बळकवल्या. हजारो नोकर्‍या व लाखो शैक्षणिक सवलती आज खुले आम मराठा समाज बळकावत आहे. पण या बाबत ना. भुजबळ ना. क्षिरसागर साधा ब्र ही काढत नाहीत. ओबीसी संघटना वास्तव मांडत आहेत ही आम आदमी म्हणून मागणार्‍याची विकृती तर हिंदूत्व सांगणारे राजकीय पक्ष हे प्रथम पासून ओबीसी आरक्षणाला उघड विरोध करीत आल्यात तयांनी रामाचा प्रश्न उभा करून मंडल आयोग गोठवला आहे. मतासाठी ओबीसी पाहिजे. वाटा म्हणताच आपण सारे हिंदू ही हाक देवून त्यांच्या स्वार्थासाठी भांडावयास लावतात.

 याच साठी राणे कमिटी व मराठा आरक्षण.

     आपले सत्तेसाठी विकलेले नेते. हे आपल्या आरक्षणाला धोके ठरले आहेत. हे जसे सत्य आहे. तेवढेच महाराष्ट्राच्या स्थापने पासून सत्तेत व विरोधात हाच मराठा समाज आहे. फुले, शाहू, अंबेडकरांचे नाव सांगून त्यांची समता, स्वातंत्र्य व त्याग आज मलिन केला गेला आहे. प्रथम जाती पाहून तिकीट वाटप व सामदाम, दंड फोडा व झोडा आशा तंत्रांचा वापर करून विजयाची घोडदौड. मते हवीत पण यांच्या विकासाचा मुद्दा येताच या मंडळीनी आपल्या हितासाठी खेडोपाड्यातील गरिब मराठा व ओबीसी यांच्या मध्ये कलगी तुरा आसा सामना लावून गरिब मराठ्यासाठी लढतो हे बुजगावणे उभे केले. ना यांना गरिब मराठ्यांचे प्रेम ना ओबीसी अस्था. कारण घटने नुसार आरक्षण देता येत नाही हे सिद्ध झालेच आहे. पण लढाई जुंपुन तोंडाला पाने पुसण्याचा हा सर्व प्रकार महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूकी दरम्यान सुरू आसतो. मराठा समाजातील काही राजकीय व्यक्ती आमदार खासदार होण्यसाठी मराठा हा मुद्दा घेऊन वाजवत ठेवतात . कारण याच बळावर मराठा सत्तेत जास्त येतो हे गणित मांडले जाते यासाठी ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. कमिटी या देशाच्या संविधानाला बांधील नसते तर बांधील आसतो आयोग म्हणून आयोग कायदेशीर व कमिटी ही दांडगाई.

 नचिप्पन रिपोर्ट - मराठा आरक्षण

     मराठा समाजातील वाडा संस्कृतीने गरिब शेतकर्‍यांचे, गरिब मराठ्यांचे हित साधण्यासाठी अनेक योजना, सहकार, शिक्षण क्षेत्र आपल्या जवळ ठेवले. तरी सुद्धा ही मंडळी आपल्या भावकीतला, गावकीतला मराठा गरिब ठेवण्यास यशस्वी झाले. हा गरिब मराठा ओबीसींच्या जगण्या मरण्याचा सोबतीला आहे. त्याला  विकासाचा वाटा मिळावा  याच हिंदूतील उच्चवर्णींयाना नव्हे तर या देशातील प्रत्येक जातीला, धर्माला व त्यातील गरिबांना न्याय मिळावा. याच साठी केंद्र शासनाने मा. नच्चिप्पन यांच्या नेतृत्वा खाली कमिटी नव्हे तर आयोग नेमला. या आयोाने अभ्यास करून केंद्र शासनाला आपला रिपोर्ट सादर केला. या रिपोर्ट प्रमाणे देशातील प्रत्येक जातीला आपला वाटा ग्रा. पं. ते खासदारकी पर्यंत मिळणार आहे. शैक्षणिक सामाजीक, राजकीय हिस्सा मिळू शकतो. पण हे आम आदमी संस्कृती व हिंदू निष्ठ बडबड वाल्यांना नको आहे. याचा सरळ अर्थ असायांना खर्‍या भारतीयाचा विकास नको. तुम्ही भांडत रहा आम्ही आरामशीर सत्तेत जावू मुळात मराठा समाजाने नचिअप्पन रिपोर्टचा आग्रह धरून ओबीसींच्या खांद्याला खांदा लावून समतेची लढाई लढावी यातच मराठा व ओबीसींचे हित आहेे.

     जय जोती जय शाहु जय अंबेडकर

दिनांक 14-02-2015 23:51:24
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in