दोंडाईचा नूतन विद्यालयात बालिकेवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली. या घटनेचा पिंपळनेर येथे तेली समाजातर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. नराधमास व दबाव तंत्र वापरणा-यांना त्वरीत अटक करून कठोर शासन होईल, अशी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानिमित्ताने मूक मोर्चा काढण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास विशेष पधकाकडे देऊन पोसो कायद्यातंर्गत तपास होऊन खटला शीघ्र न्यायालयात चालवावा, अशी मागणी येथील तेली समाजाच्या वतीने अपर तहसिलदार सूर्यवंशी यांना लेखी निवेदन देण्यात आले. याप्रकरणी संस्थाचालक व इतरांनी पिडीत बालिकेच्या पालकाला धमकावून दबाव आणला. परंतु पिडीत मुलीच्या पालकांनी पोलीसात गुन्हा नोदविला. यापूर्वी अशा स्वरूपाच्या तीन चार घटना घडल्या, नराधमास कठोर शासन करून फाशीची शिक्षा द्यावी. शासकीय धोरणानुसार आर्थिक मदत तातडीने व्हावी, विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावा संस्थाचालक, विद्यालयातील कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. निवेदनावर पिंपळनेर तैलिक समाज अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, वसंतराव चौधरी, प्रशांत चौधरी, संजय बागुल, देविदास नेरकर, विजय आनंदा चौधरी, हर्षल बोरसे, अतुल चौधरी, रमेश बागुल, भाईदास महाले, संजय चौधरी, चेतन चौधरी, मधुकर चौधरी, भालचंद्र चौधरी, प्रमोद वाघ,सागर चौधरी, चंद्रकांत चौधरी, सुभाष चौधरी, भरत बागुल, दीपक चौधरी, महेश चौधरी, निलेश चौधरी, किशोर चौधरी, गणेश चौधरी, बाळकृष्ण चौधरी, प्रशांत बागुल, संजय चौधरी, मयुर नेरकर, पंकज चौधरी, राजेन्द्र चौधरी, दिनेश बागुल, योगेश चौधरी, पुष्पक चौधरी, दीपक सूर्यवंशी, धनंजय नेरकर, बबलू चौधरी, शुभम सूर्यवंशी, यशवंत महाले, अविनाश चौधरी आदी मूकमोर्चात सहभागी होते.