श्री साई बाबा यांच्या पाद स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी नगरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच "डॉ. मेघनाद साहा" यांची पुण्यतीथी अ. नगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी साजरी करण्यात आली. या प्रसंगी श्री संताजी महाराज व डॉ मेघनाद साहा यांचे प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पुण्यतिथिनिमित्त तेली समाजाची कार्यकारिणी बैठक, चिंतन शिबीर, कार्यशाळा पार पडली.
या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सुधाकर चौधरी यांनी स्व. डॉ. मेघनाद साहा याचे जीवन परिचय, कार्य यांची सखोल शास्र शुद्ध माहिती उपस्थितांना दिली. “मेघनाद साहा हे आधुनिक पदार्थ विज्ञान शास्रातील अग्रेसर भारतीय शास्रण्य होते त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. "डॉ. मेघनाद साहा" हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ, लोकसभा सदस्य, प्रकाश दाब मोजमाप यंत्राचे जनक, साहा सिद्धांताचे जनक, नियोजन मंडलाचे सदस्य, साहा नुअक्लिअर फिजिक्स संस्थेचे संस्थापक, भारतीय सौर पंचागाचे जनक, भारतीय विज्ञान मंडळाचे सदस्य, रॉयल सोसायटी लंडन सदस्य, भारतीय विज्ञान कांग्रेस अध्यक्ष (१९३४), स्वातंत्र सेनानी, अलाहाबाद विद्यापीठ प्राध्यापक व डीन असे परीपूर्ण व्यक्तिमत्व, अष्टपैलू कामगीरी असलेले शास्त्रज्ञ होते. त्यांचे पोस्टाचेतिकीट भारत सरकारने १९९३ साली जन्म शताब्दी वर्षी काढले. बदलती समाज व्यवस्था, दूरचित्रवाणी माध्यमाचे मुलांवर होणारे परीणाम आणि वाचन संस्कृती व मराठी भाषेचा होणारा ऱ्हास, नीतिमूल्यांचा होणारा ऱ्हास या साठी थोरा मोठ्यांचे, साधुसंतांचे, वीर पुरुषांचे तसेच महान संशोधक यांचे जीवन कार्य /चरित्र नेहमीच तरुणांना प्रेरणादाई ठरलेले आहे, त्या साठी अश्या महान पुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी साजऱ्या करण्याच्या प्रथा प्रचलित आहेत. संतानी आचार विचार नीती-मूल्याचे धडे दिले तर थोर शास्रज्ञ यांनी विज्ञान व तंत्रज्ञान दिले, जीवन सुखकर केले. असे थोर शास्रज्ञ यांच्या कामगिरीमुळे सर्व समाजाच्या गरजा भागविल्या जातात नवनवीन शोधामुळे आपल्याला नवीन साधने वापरण्यास मिळतात”. आशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले, “या कार्यक्रमाची संकल्पना डॉ चौधरी सर यांनी मांडली , डॉ मेघनाथ साहा यांची पुण्यतिथी आपण आज या ठिकाणी साजरी केली. आपण चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे. आपसामध्ये विचारांची देवाण घेवाण करावी . एकत्र आल्याने सर्वाची साथ सर्वांचा विकास होण्यास मदत होते.” या प्रसंगी जिल्हा सचीव विजय दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश साळुंके, बाळासाहेब लुटे (शिर्डी), उद्योगपती व जिल्हा उपाध्यक्ष संभाजी जाधव (काष्टी), अ. नगर शहर अध्यक्ष विजय काळे, राहता तालुका अध्यक्ष भागवत लुटे, राहुरी तालुका अध्यक्ष दत्तात्रय सोनावणे, पाथर्डी तालुका अध्यक्ष प्रमोद भांडकर, जामखेडचे तालुका अध्यक्ष छगनराव क्षिरसागर, कर्जत तालुका अध्यक्ष शशिकांत राउत, यशवंतराव वाकचौरे(शिर्डी शहर अध्यक्ष), काष्टी चे समाज कार्यकर्ते माजी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राउत, संगमनेरचे श्याम करपे, करपे महाराज, राहुरी शहर अध्यक्ष संजय पन्हाळे, उपाध्यक्ष श्रीराम इंगळे, सुरेश दादा धोत्रे(राहुरी), मदन गडवे (श्रीगोंदा), जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व संताजी सेवा मंडळ ट्रष्ट नगरचे समाज कार्यकर्ते कृष्णकांत साळुंके,दिलीप साळुंके, अरविंद दारुणकर, सुरेश देवकर, क्षीरसागर महाराज, राहता तालुका चांगदेव कसबे, विठ्ठलराव लुटे,बद्रीशेठ लोखंडे, शंकरराव हाडके, प्रभाकर लुटे, विठ्ठलराव जाधव, नंदू व्यवहारे, राजेश लुटे , बबनराव वालझाडे, सुरेंद्र महाले, दीपक लुटे, दीपक चौधरी, अनिल लुटे, डॉ. धनंजय लुटे (राजुरी), भारत दिवटे(लोणी) व इतर समाज बांधव उपस्थित होते
डॉ सुधाकर चौधरी यांनी डॉ मेघनाथ साहा यांचे जीवनावर एक तास व्याखान दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थितीत तालुका व जिल्हा पदाधिकार्यांना डॉ मेघनाद साहा यांचा फोटो व माहिती पुस्तिका त्याच्या मार्फत वाटले व पुढच्या वर्षापासून डॉ मेघनाथ साहा यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचे सर्व पदाधिकार्यांना आवाहन केले.
या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सुधाकर चौधरी यांनी स्व. डॉ. मेघनाद साहा पारितोषिक पदवीत्तर (एम एस्सी ) परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रु १०००/- मात्र जाहीर केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना पवार सर व सूत्रसंचालन विजय दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी भागवत लुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या पुण्यतिथी साठी महाराष्ट्र प्रांतिक तेलीसमाज विभागीय अध्यक्ष आर टी आण्णा चौधरी यांनी शुभेच्छा संदेश पाठविला.