अकोला तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील ५-६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाच्या नराधमांना पाठीशी घालण्याची भूमिका संस्थाध्यक्षांनी घेतली आहे. आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक न झाल्यास महाराष्ट्र तैलिक महासभेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकान्यांना निवेदनातून देण्यात आला.
सामाजिक नितीमत्तेची पायमल्ली करणारी घटना दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात घडली आहे. याप्रकरणी नराधमावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचे प्रयल संस्थाध्यक्ष हेमंत देशमुख यांच्याकडून सुरू आहेत. त्यासाठी आधी संपूर्ण प्रकरणच दाबण्याचाही प्रयल झाला. याप्रकरणी प्रथम तपासणी अहवालात नमूद असलेल्या नराधमांवर कठोर कारवाई करावी, पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्यावा, महिला व बालिकांवरील अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी सुरक्षेचे उपाय करावे, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष दीपक इचे, दिलिप क्षीरसागर, एस.आर.लगड, रामचंद्र धनभर, गजानन घुसे, शशिकांत चोपडे, अनिल बोकडे, संजय बोराडे, दीपक भिरड, राजेश मुळे, श्रीकृष्ण चाटी, प्रमोद चोपडे, सुरेंद्र मेहरे, विशाल गमे, डॉ. राजेंद्र वानखडे, भास्कर पारस्कर, राजू शाहू, कैलास फाटे, विलास मालगे, भूषण इचे, अतुल फाटे, भारत चुनडे, आनंद फाटे, नितेश शाहू, राजू वानखडे, दीपक वानखडे, विष्णू मेहरे, डॉ. योगेश साह यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.