एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 2 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
कोकणचा मातीत नाळ पुरलेला. त्या मातीत लहानपण जावून मोठे झालेल्या संत संताजी वंशाकडे जाणार आहे. आज तोच मुद्दा आहे. परंतू त्या पूर्वी काही बाबी कडे जावू. मी हायस्कूल शिपयाचा शिक्षक झालो त्याच तांबड्या मातीत दापोली मंड रोडवर डोंगराच्या खोबदाडीतील जामगे गावात. या गावा पासून सानेगुरूजींचे गाव पायपीट केली तर एक तासाचे पालगड मंगणगड जवळील डॉ. अंबेडकरांचे गाव अंबाड जवळच. आणि तांबड्या मातीत मला खरा सुर सापडला. इथेच 1983 मध्ये तेंव्हाचे गावकूस मासिक सुरू झाले. साकव नावाचे अनियत कालीक इथेच सुरू केले. बेलोसे कॉलेजच्या त्या वेळच्या उपप्रचार्या सहस्त्रबुद्धे, सांगळे, ला. ही. पवार, वायंदडे यांनी सहकार्य केले. याच मातीत हजारो कविता. व सिंव नावाचे खंड काव्य लिहीले माझे माळरान खंडकाव्य याच मातीत असताना प्रसिद्ध झाले. मला फार मोठे कवी होयचे होते. संत संताजी समाजाचे एवढेच माहित होते. एक ओळ ही वाचली नव्हती. कदाचीत नुस्ता रस्ता सापडला पण या रस्त्यावर नुसता चाचपडत चालेले होतो. कवितेत रस्ता हा त्या कवीने निर्माण करावयाचा असतो. त्याचे संवेदनक्षम मन हे त्या दिशेने वाटचाल करणारे हवे असते. आपल्या शब्दं सामर्थ्यावर तो कवी शब्दांची शस्त्रे बनवतो. ही शस्त्रे जवळ असल्यावर हीच त्याची धन दौलत आसते. यावरच तो यज्ञ करतो. परंतू मी स्वत: या रस्त्यावूर एका प्रसंगा मुळे फार दूर गेलो. एका आणिबाणीच्या प्रसंगी सर्व कविता व सर्व मी रंगवलेली चित्रे फाडली. व त्या क्षणा पासून कविते पासून दूर गेलो. परंतू शब्दांचे ईश्वर होण्याचे भाग्य मला मिळाले नाही ही खंत माझी आज ही आहे. हे दुख: मनाच्या कोपर्यात गाठोडे बांधून ठेवून दिले होते.