एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 3 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
या मातीत समाजाच्या कामा साठी जाण्या पुर्वीचा एक प्रसंग नमुद करून या महा कवीकडे जावू. जीवनातील वास्तव प्रसंगाला सामोरे जाताना हे सर्वच सोडून मनशांतीच्या शोधात फिरत मालवण मार्गे निघालो. तेंव्हा खिशात पैसे नाहीत सोबतीला मसिकाच्या कर्जाचे डोंगर स्टँडवर झोपून दिवस दोन काढले. मळक्या कपड्यात रत्नागीरीत गेलो. समाजाची विचारपूस केली. तेथे संताजी मंदिर होते. चार दिवसावर आलेला संताजी उत्सव. आंगण सारवणे मंदिराला रंगदेणे काम चालू होते. समाजाचा म्हणून आसरा दिला. आणी या तांबड्या मातीने शब्दांची एक ताकद दिली ती आज ही जपून ठेवली आहे. हे माझे व्यक्तीक सांगण्याची वेळ का आली तर या तांबड्या मातीत मी बराच काळ आसतो तर शब्दांची शस्त्रे अधिक जवळ आसती. हे वास्तव मला ऑक्टोंबर 2017 मध्यें एक कविता संग्रह स्पिड पोष्टने पाठवून दिला तेंव्हा समोर आले. चिपळूणच्या बाजार पेठेत आपला व्यवसाय संभाळणारे श्री. अरूण इंगवले यांचा कविता संग्रह होता तो. मी एक कविता वाचली आणी पूर्वी नारायण सुर्वे यांची कविता वाचून जसा शब्दांच्या ईश्वराकडे पहात होतो. त्या ही पेक्षा अधीक ती कविता मला आपले करून गेली. जेंव्हा सत्य समोर येते ते सत्य आसते. ते आपले खरे रूप घेऊन आलेले आसते. तशी ही कविता माझ्या समोर आली. कामाचे व्याप असून ही कविता संग्रह वाचून काढला आणी संत संताजींचा विचार वंश सापडला.