एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 4 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
सुरवातीस सांगीतले रक्त वंशव विचार वंश सत्याचा विचार करून मनाला जे पटले. सत्याच्या पुढे कुणाची पर्वा न करणारे संताजी, धर्माचे दहशद वादी ठेकेदार, पिळवणूकीलाच धर्मशास्त्र माना म्हणुन सांगणारे पंत व महंत याच्या पुढे मान झुकवली नाहीतर त्यांचे वाभाडे ही काढले. कचेश्वर ब्रम्हे हे चाकणचे ते भक्ती मार्गात आले म्हणून शुद्र कमलाकर लिहीणार्या त्यांच्या चुलत्या सहीत भावकीने जाती बाह्य केले होते. ही गोष्ट चाकणची त्याच चाकण मध्ये सत्य व असत्याशी ग्वाही संताजींनी केली होती. मग त्यांना जे भोगावे लागले ते इतिहासात संपवले जरी असले तरी त्यांनी जे केले. जो विचार महाराष्ट्राला दिला. तो विचार घेऊन आपले शब्द म्हणजे शस्त्र समजून आजच्या किडलेल्या सामाजिक, धर्मीक, राजकीय व्यवस्थेवर तुटून समाज पातळीवर महाराष्ट्राच्या भुमीला सांगतात जे मोजके आहेत त्यात अरूण इंगवले पहिले आहेत. कारण या कवितेत वास्तवाचे भान आहे. नेमके समाज मनावर काय चालले आहे याचे अचुक भान कवितेत मांउतात. त्यांची कविता ही मुळात फक्त तेली समाजावर नाही तर या समाजा सह जे जे जात समुह आहेत. त्या समाजातील शेवटच्या बांधवांची जगण्याची धडपड त्यातून मिळालेली जात, पंथ व गरिबी ते मांडतात. कोकणातील उभा पाऊस व जीव मेटाकुटीस आणनारा उन्हाळा यात वावरणारा सामान्य कसा जगतो हे मनाला कुरतडत रहाते. हे सर्व ते कोकणातील मातीत वावरणार्या व्यक्तींच्या बोली भोषेतील शब्द आहेत. इंगवले किती संवेदनक्षम मनाचे आहेत. याचा जीवंत अनुभव समोर येतो. त्यांनी रेखाटलेली व्यक्ती या कोकणातील जरूर आहेत. पण हे असले मटकून बसणे भेंगाळलेली माणस उभ्या महाराष्ब्रात आज जगत आहेत. हे जगने सुसाह्य व्हावे ही प्राजळ इच्छा इथली राजकीय, धर्मीक संघटन व्यवस्था करू शकत नाही. तर त्यांची दु:ख ही लबाड मंडळी मॉल सारखी दुकाने उभारून विकू पहातात व यातून सत्तेसाठी पैसा व पैसा मिळवीण्या साठी सत्ता वेगळ्या धर्माच्या संघटना या ही अशाच वावरत आहेत. यांच्या वावरण्यात ढेंपाळलेला सामान्य पुन्हा ढेपाळत आहे हे सामान्याचे ढेपाळणे ते कुणाची भीड न ठेवता मांडतात तेंव्हा महाराष्ट्राला एक समर्थ कवी तेली समाजाने दिला आहे. अभिमानाने मांडावे लागते. संत संताजींच्या विचाराची जी वाट आहे या वाटेवर तो विचार वंश आहे. हे विश्वच माझे घर ही या कवीच्या वाटसरूची पताका आहे. दुबळ्यांना नवा जोम देणारी शब्द रचना ही या विचाराची सामर्थ्याची बैठक आहे. ती इंगवले यांनी मिळवली आहे. ते शिक्षण क्षेत्रात नाहीत रोज जीवन जगण्या साठी व्यवसाय ही करतात. घरात असा समर्थ वारसा ही नाही. पण संत संताजींच्या विचाराचा वारसा त्यांनी शोधला.