एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 6 - मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
मला आठवते सन 2000 च्या दरम्यान संत संताजी पुण्यतीथी साठी ते चिपळूण ते सुदूंबर प्रवास करीत आले. त्यांनी संताजी चरित्र घेतले प्रथम संताजी समजुन घेतले संत नामदेव ते संत तुकाराम ही संत परपरा समजुन घेतली. आणि शब्द शोधु लागले. स्थानिक पातळीवर ते कविता वाचन करू लागले. शब्दांना दाद मिळू लागली. जेंव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन चिपळुन येथे आयोजित केले होते. त्या संम्मेलनाच्या अयोजन कमिटीचे ते सचिव होते. पण हा शब्दांचा ईश्वर साहित्य संम्मेलन यशस्वी करिताना मी सुद्धा एक कवि आहे हे कुणाला न सांगता संम्मेलन यशस्वी केले. कविता लिहीने त्या प्रसिद्धीस पाठविणे. त्या कविता वाचताच प्रसिद्ध होत होत्या. आणि तम्माम मराठी साहित्याला एक समर्थ कवी मिळाल्याची जाणीव झाली. त्यांचा पहिला काव्यसंग्रह या पुर्वीच एक प्रसिद्ध झाला होता. या नवोदित कवी ताकद यातून दिसून आली. आणी आता न चाचपडता ते कविता करू लागले. कोणत्याही कला क्षेत्रात अनुकरण हे घातक आसते. श्रेष्ठत्व त्या केलेला हवे असेल तर त्या कलाकाराने आपली वेगळी दिशा मांडणी व रचना निर्माण करावी लागते. इथे श्री अरूण इंगवले यांनी आपली रचना आशय व मांडणी वेगळी निर्माण केली. ती सुद्धा संत संताजी विचार धारेची म्हणून मी अभमानाने सांगतो श्री अरूण इंगवले हे संत संताजींचे विचार वंश आहेत याचा त्यांना ही अभिमान आहे. म्हणून त्यांच्या सौभाग्यवती व ते स्वत: पाडा कोंड व वस्त्यावर रहाणार्या समाज बांधवांना जागे करून संघटीत केले. या द्वारे ते सामाजिक बैठक निर्माण करून समाज संघटीत करतात. आशा संत संताजी विचार वंशाला भावी वाटचालीस शुभेच्छा.