वर्धा: महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेची राज्य कार्यकारणी मिटिंग वर्धा येथे दि. २६ जानेवारी रविवारी रोजी सेवाग्राम येथील बापू कुटी मध्ये खा.रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला व युवा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. प्रथम सत्रामध्ये तैलीक महासभेची मार्गदर्शक तत्वे व विस्तार या विषयावर मा. अशोक काका व्यवहारे कार्यध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संजीव शेलार सहसचिव यांनी प्रझेन्टेशन द्वारे व प्रश्न उत्तरच्या सरावातुन मांडणी केली त्यास सर्व उपस्थिततांनी दुजोरा दिला. प्रथम सत्र अल्पोपहार व चहा पानाने सुरु झाले होते. बापू कुटी मध्ये भारतीय पध्दतीच्या भोजनाने सकाळी १० वाजता सुरु झालेले प्रथम सत्र १२-३० वाजता संपन्न झाले. बरोबर १-00 वाजता द्वितीय सत्राला सुरुवात करण्यात आली. बळवंत मोरघडे सहसचिव यांनी शब्दसुमनांनी सर्वांचे स्वागत केले डॉ.भुषण कर्डिले महासचिव यांनी प्रस्तावना सादर केली व खा.रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली संघटनेसाठी सुचना व कार्याचा अहवाल या माध्यमातून विभागध्यक्ष जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, महिला, युवा यांनी सहभाग नोंदविला त्यानंतर खा.रामदासजी तडस मा. गजानन नाना शेलार डॉ.भुषण कर्डिले यांनी मार्गदर्शन केले सर्व उपस्थितांना सुताचा हार व चरखा हे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. सर्वांनी सेवाग्राम बापू कुटीचे दर्शन घेतले व मिटिंग संपन्न झाली.
येणाच्या काळात निवडणुका निर्णायक व्हाव्यात यासाठी आपला उपयोग राजकारण व्हायला पहिजे त्यासाठी आपण विभागात महामेळावे व जिल्ह्यात बैठका घेण्याचे ठरविले आहे. कारण आपला समाज मागे आहे आणि आपण प्रसिध्दी मध्ये मागे आहोत परंतु मी खासदार म्हणुन देशात १२ क्रंमाकावर असुन प्रसिध्दीसाठी परिचित आहे. त्यामुळे समोरच्याला धास्ती बसली पाहिजे गाव तिथे संताजी महाराज पुतळा असला पहिजे. ओबीसी लोन वाढले पाहिजे ओबीसी मधुन संधी मिळाली तर त्यात पुढाकार घ्या आपण अल्पसंख्याक नाही दबाव गट निर्माण केला पाहिजे असे भकिन व्यक्त केले. ।
समाजाला संघटन बांधण्यासाठी व समाजाला वैचारिकता उभी राहण्यासाठी नाशिकात तीन दिवसाचे शिबीर घेण्यात येईल असे सुतोवाच करतांना त्यांनी ख़ान सुमारी ही व्यावसायीकांना व गरिब बाधवापर्यंत जाण्यासाठी करण्यात आली होती. समाजाचा उध्दार कसा होईल ही धडपड झाली पहिजे, असेल त्यांचे संगे नसेल त्यांच्या शिवाय संघटन करणार तरच यश येईल जनगनना मध्ये व्यापक अर्थ होता. निर्जीवात आपणास जीव आणणे म्हणजे संघटन होय असा आशावाद व्यक्त केला.
ओबीसी मागास आयोगावर काम करताना ओबीसी मुलांना हॉस्टेलवर सोय व्हावी यासाठी आग्रही होतो आणि ती सवलत ओबीसीच्या मुलांना मिळेल हा मनस्वी आनंद आहे दिल्लीत तेली समाजाचा महामेळावा व्हावा व रामदासजी तडस यांच्या नेतृत्वाखाली व्हावा असे संघटनेचे उद्दिष्ट असेल पाहिजे याच बरोबर डॉ. आघाडी, वकील आघाडी किसान आघाडी, व्यापार आघाडी, शिक्षण आघाडी, उद्योग आघाडी, व्यापार आघाडी अशा अनेक आघाडी स्थापन करण्यात येतील असे सुतोवाच केले.