तेली समाज चिंतन शिबीर, मुंबई

     रविवार दि. १५ फेब्रुवारी  २०१५ -  महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व समस्त तेली समाज संस्था, मुंबई व उपनगरे च्या वतीने महाचिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले. महा ह्यासाठीच म्हणावयाचे कारण म्हणजे १५००० स्वेकर फुटाचा मंडप तो पण लग्ना सारखा. शंभर फुट लांब भव्य स्टेज व त्यावर श्री संत संताजी महाराजांची आठ फुट भव्य मुर्ती, जी स्वत: प्रांतिक अध्यक्ष श्री विलासराव त्रिंबककर ह्यांनी बनविलेला चलत चित्रासकट बनविलेला श्री संत संताजी महाराजांचा तेलाचा घाणा सर्वांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

teli samaj chintan shibir Mumbai

     सर्वप्रथम सकाळी १० वाजता कार्यक्रमात श्री दत्तगुरू भजनी मंडळ ह्यांचा भजनाचा कार्यक्रम खरोखरच अप्रतिम होता. ह्यासाठी श्री राजेंद्र सावंत व सुनिल झगडे ह्यांचे सहकार्य मोलाचे होते. त्यानंतर प्रांतिक महिला मांचाच्या अध्यक्षा श्रीमती अनिला चौधरी, सौ. दर्शना नामदे (कार्याध्यक्ष) व सचिव सौ. कल्पना तळमळले ह्यांनी अति उत्तम समाज प्रबोधन केले.

     श्री. त्रिंबककरांनी ह्या कार्यक्रमात शाल-श्रीफळ, पुष्पहार ह्याला पुर्ण कातर लावून कार्यक्रमाचा वेळ व पैसा वाचविला.

     ह्या समारंभात आमदार श्री. राम कदम ह्यांची मुख्य अतिथि म्हणून हजेरी लागली. श्री. त्रिंबककरांना आम्ही श्री राम कदम ह्यांच्या आमंत्रणाविषयी विचारले असता श्री त्रिंबकरांनी खुलासा केला कि मला घाटकोपर मध्ये श्री संताजी महाराजांचा चौक हवा आहे आणि  असाच प्रयत्न आपल्या समाजातील प्रत्येक  अध्यंक्षांनी  स्थानिक खासदार/आमदार/नगरसेवक ह्यांना घेऊन जर चौक बनविण्यास सुरू केले तर निश्‍चितच श्री संत संताजी महाराजांचे महत्व व समस्त तेली बांधवांचे नांव मुंबईतच नव्हे संपुर्ण महाराष्ट्रात होईल व माझ्या तेली बांवधासभोवतीली एक अद्वतिय तजोवलय निर्माण होईल.

     ह्या चिंतन शिबीरात दल्लेखनीय बाब म्हणजे हे चितन शिबीर दुपारच्या भोजनानंतरही संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहिले. ह्यात महत्वाचे विशेष म्हणजे.

 १) तरूण - तरूणींसाठी नोकरी विषयक रिक्रुटमेंट समिती बनविणे

२) मुंबईतील समाजाच्या सर्व संघटनांचे अस्तित्व कायम ठेवुन त्यांचे एकत्रीकरण करून समाजातील शक्ति वाढविण्याबाबत विचार विनिमय झाले.

३) मुंबईतील जनगणाना व सर्वात महत्वाची मंबई व उपनगरे ह्या सर्व समाज संस्थांना एकत्र घेऊन एकच भव्य दिव्य वधु-वर परिचय मेळावा घ्यावा व योग्य उपस्थिती मिळाल्यास समुह विवाह घेऊन आपल्या समाजाची विचार क्षमता वाढवावी.

     ह्या चिंतन शिबीरात प्रांतिक कोषाध्यक्ष श्री गजुनाना शेलार, प्रांतिक महासचिव श्री. भुषण कर्डीले, कार्याध्यक्ष श्री. अशोक काका व्यवहारे, ह्यांची बोधपरत्वे व समाजपयोगी भाषणे झाली.

   ह्या सर्वात महत्वाच्या ज्या व्यक्ति होत्या त्या सर्वश्री अँड. नाना पवार - बोरीवली, श्री. शशिकांत पाटकर - पार्ले, माजी नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे- मलाड, माजी नगरसेवक श्री. खुरसंगे - बोरीवले, नगरसेवक श्री विक्रांत नांदवडकर नरशिक, सुर्यवंशी गुरूजी, कल्याण ह्यांचे मोलाचे विचार समाजास मिळाले.

     चिंतन शिबीराचे आयोजक व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे मुंबई विभागीय अध्यक्ष श्री. विलास त्रिंबककर ह्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला तो पण कुणाचाही एकही पैसा न घेता व तो पण एक कार्पोरेट चिंतन मेळावा झाला. तर ह्यांचे श्रेय आपण कुणाला द्याल तर ! श्री. विलास त्रिंबकरांनी खुलासा केला.

    पैश्याने कार्यकर्ता विकत घेता येत नाही. त्यांत तुमची प्रतिमा व समाजविषयी कळकळ ह्या जोरावर हा चिंतन मेळावा यशस्वी झाला. जर आज मंबईतील सर्व समाज संस्था व उपनगरातील इतर संस्था ह्यांनी जर का सहकार्यांचा हात दिला नसता. तर मी काहिच करू शकलो नसतो. ह्यात श्री. बाळा भागवत, श्री. सुनिल विभुते श्री. जयवंत काळे, श्री. यशवंत महाडीक व सर्वस्व झोकल्यासारखे ज्यांनी काम केले ते संताजी सहाय्यक, संघ, ठाणे श्री. कमलाकर शेलार, तेली सेवा समाजाचे श्री. चंद्रकांत कामतेकर व अंधेरीचे श्री. मारूती खेडस्कर ह्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मी माझे उरलेले आयुष्य ह समाजसाठी वाहिलेले आहे फक्त समाजाने उत्तम साथ द्यावी आणि हो ! चूक झाल्यास समाजाने माझे कान धरण्याचे अधिकार त्यांना आहेत.  

   श्री. विलास त्रिंबककरांचे विचार उच्च आहेत ह्यांत शंकाच नाही. आणि अगदी महत्वाचे अन्नदाता सुखी भव उक्तीप्रमाणे श्री. त्रिंबककरांनी यजमानांचे स्वागत पंचपक्वान्नांचे जेवण देऊन सर्वांचे मन जिंकले ते म्हणततच असतात जर हृदयापर्यंत पोहचवायचे असेल तर त्याचा मार्ग पोटापासुन सुरू होतो.

     ह्या चिंतन शिबीरात प्रसिद्धी माध्यम सांभाळून प्रत्रकार श्री श्याम घोडके व पत्रकार श्री. सुरेश पडवळकरांचे व चर्चासत्राचे संपूर्ण संचालन यवतमाळवरून आलेले श्री. विलास काळे ह्यांचे विशेष आभार श्री. त्रिंबककर व समस्त तेली समाजाने मानले.

     श्री. सतिष वैरागी (पनवेल), श्री. शरद तेली (बदलापुर), श्री. केसरीया (घांची समाज,), श्री. पुविणभाई मेहता, मोढ समाज मंबई श्री. लल्लनजी गुप्ता- आपन तेली समाज, श्री. लालजी गुप्त एच. ए.स. के. गुप्त -  साहू समाज, भरत श्री. सुरेश कर्पे - बदलापूर समाज ह्या मुंबई बाहेरील संस्थांच्या अध्यक्षांनी विशेष उपस्थिती नोंदविली.

    आपणास असे नाही वाटत का की समाजाने एकजुटीने श्री त्रिंबककरांच्या सोबतीने उभे रहावे !

त्रिंबककर जी आप आगे बढो, हम अपको साथ है |

  श्री. सुरेश पडवळकर,
संपादक कोकण स्नेही,  
 श्री. श्याम घोडके,
पत्रकार, ठाणे, - मो. नं. ८६५५४७३९३६

दिनांक 24-02-2015 21:50:59
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in