मालेगांव, नाशिक :- तालुका व महानगर अध्यक्ष श्री. रमेश उचित यांच्या उपस्थीतीत तेली महासभेची पदाधीकार्यांची सहविचार सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी श्री. रमेश उचित होते. ३५ पदाधीकार्यातील २४ पदाधिकारी उपस्थीत होते. मध्यवर्ती संस्थेच्या आदेशा प्रमाणे खाने सुमारी करण्याविषयी पदाधीकार्यांनी आपले विचार मांडले. समाजाची संख्या मोजण्या बरोबरच रक्तगट आर्थीक सर्वेक्षण करावे. यानुसार मध्यवर्ती संघटनेच्या फॉर्म प्रमाणे फॉर्म करून गावे व घरे वाटुन घेऊन कार्यवाही सुरू झाली या वेळी जेष्ठ पत्रकार श्री. भगवान बागुल तेली गल्लीचे संपादक श्री. मोहन देशमाने यांनी मार्गदर्शन केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade