उमरगा तेली समाज - धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत तहसील कार्यालय उमरगा येथे दि.7/3/2018 रोजी 10-00 वाजता तेली समाज संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचे ठरले. उमरगा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवि कोरे , जिल्हासचिव अँड.विशाल साखरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह उमरगा येथे बैठक संपन्न.
1) धरणे आंदोलन तहसील कार्यालय उमरगा. सदर आंदोलनास तेली समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे ठरले.
दोंडाईच्या येथील घडलेल्या तेली समाजाच्या बालीकेवर झालेल्या अत्याचाराचा तसेच सादर घटना दाबण्यासाठी संबंधित स्थानिक शालेय संस्था ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित संस्था नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संस्थाचालकांनी व राजकारण्यांनी निर्माण केलेल्या दबावाचा तीव्र धरणे आंदोलन करीत आहोत. पिडीत बालीकेच्या आई वडीलांना धमकवनार्या व आमिष दाखवनार्या संस्था चालकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घृणास्पद असून माणुसकिला काळिंबा फासणारी आहे .तरी बालिकेवर अत्याचार करणार्या व त्यास पाठिशी घालणार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी धरणे आंदोलनातून करीत आहोत.अत्याचार प्रकरणी बालिकेच्या कुटुंबावर दबाव कायम असून शिक्षण व संस्थाचालकाच्या समर्थकांकडून त्यांना सतत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आहे.त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी धरणे आंदोलनातून करायची आहे.सर्व तेली समाज बांधव उपस्थित राहावे ही नम्र विनंती.*
2) तेली समाज जनगणना नोंदणी संदर्भात आठवड्यातून कुटुबांना भेट देणे.
3)उमरगा शहराची कार्यकारिणी व उमरगा शहराची जनगणना नोंदणी करण्याचे ठरले.
उमरगा शहराच्या नोंदणीचे उदघाटन श्री सिध्देश्वर विश्वनाथ कलशेट्टी यांच्या कुटुंबियाचे फाँर्म भरून घेण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवि कोरे, सचिव अॅड. विशाल साखरे,उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी , लोहारा तालुकाध्यक्ष भीमाशंकर डोकडे, उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी, कार्याध्यक्ष सिध्देश्वर कलशेट्टी, व बसवराज कलशेट्टी,सचिव शिवानंद साखरे,प्रसिद्धी प्रमुख शिवकुमार दळवी, संपर्क प्रमुख परमेश्वर साखरे,संघटक विजय कलशेट्टी , तालुका मार्गदर्शक विजयकुमार देशमाने ,काशिनाथ निर्मळे ,राजेंद्र घोडके,प्रा.तम्मा रेवते ,सतीष कोरे,दयानंद साखरे ,संदीप राजेंद्र अंबूसे,राजकुमार अंबूसे,संदीप अंबूसे,अंकूश म्हेत्रे ,खंडू कलशेट्टी ,बाबूराव कलशेट्टी,राजू कोरे ,पिंटू रेवते ,बाळू साखरे ,संतोष साखरे,नितीन घोडके,नरेश साखरे ,फोटोग्राफर आप्पू कलशेट्टी आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.