संताजी उत्सव छोटा पण वधु -वर मार्केटची भरमसाठ.

    श्री. क्षेत्र सुदुंबरे येथील मातृ संस्थेची गत महिण्यात कार्यकारणी मिटींग झाली. तेंव्हा एक भयान शोकांतीका समोर आली. शोकांतिका अशी श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे ही समाज संस्था शतक महोत्सव साजरी करण्यास काही वर्ष बाकी आहे. परंतु या मातृसंस्थे द्वारे श्री संत संताजी समाधी स्थळी मोठ्या प्रमाणात स्मृती दिन साजरा केला जातो. नेहमी प्रमाणो अध्यक्षांनी संस्था कार्यकारणी समोर फलगांव ता. हवेली जि. पुणे येथे वर्षभराचा हिशोब मांडला. खर्च सात लाखा पर्यंत. देणगी व इतर मार्गाने ४ लाख उत्पन्न आता जी काही कारणे आहेत. त्यात प्रमुख कारण समाज बांधवा तर्फे मिळणारा तुटपुंजा आर्थिक हातभर. यावरच मी विचार मांडत आहे.

 गावोगावी शहरी शहरी लग्न जमवणार्‍या फौजा

     कोणात्याही जातीचा समाज असो त्या समाजाचा एक आदर्शा असावा त्या आदर्शाने जीवन भर समाज प्रबोधान,  समाजाची रचना करून समाज हीता साठी संघर्ष केला आसतो.  आशा आदर्शची वाट पकडून तो महापुरूषाला जेंवहा आपण समोर ठेवतो तेंव्हा त्याची ध्येये व परीपुर्ती हा आदर्शा आसतो|. आणी जर आपण या महापुरूषाला चमत्काराचे रूप देतो. जेंव्हा आपण या महापुरूषाला देवत्वाचे रूप देतो. जेंव्हा हा महापुरूष नवसाला पावतो. जेंव्हा या महापुरूषाची प्रतिमा किंवा मुर्ती ठेवून नमस्कार करतो. पुजा आर्चा करतो. म्हणजे आपण त्याचे महान कार्य विसरून फक्त पुण्याचे जे मृगजळ निर्माणा करूण धावतो तेव्हां या महापुरूषाच्या कार्याची अहोटी सुरू होते. छ. शिवराय, बाबासाहेब आंबेडकर आशा महापुरूषाच्या बाबत हेच घडत आहे. आणि संत संताजी बाबत हेच सुरू आहे. यातूनच कधी लग्न पत्रिकेत संताजींचा फोटो समाज संस्थेच्या नावात व लेटर पॅड वर संताजी फोटो बहुतेक समाज बांधवाच्या घरात संताजी फोटो जमले तर संताजी मंदिर यापेक्षा आम्ही संताजी समजून घेतला नाही. तो न घेतल्या मुळे आज अनेक प्रश्न समोर येतात. संताजीच्या नावे उभे राहिलेल्या गावोगावच्या किंवा शहरो शहरच्या समाज संस्था आज संताजी प्रेमाने उभ्या राहिल्या प्रगत समाजा बरोबर किंवा त्या समाजाला मागे सारून उज्वल इतिहास निर्माण करण्यास निघाल्या पण दुर्देव आसे यातील बहुतेक सर्व संस्था ह्या लग्न जमविणे व जमलेले लग्न यशस्वी करणे. मयतीच्या वेळेस उपस्थीत राहुन दु:खद शब्दात त्या बांधवाचे स्मरण करून समाज संस्थे तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अपर्णा  करणे यातच गुंतल्या आहेत.  आशा समाज संस्था किंवा काही बांधव एकत्र येऊन वधु-वर मेळावा हा एक वधुवरांचा फड यशस्वी पणे साजरा करतात. प्रसंगी घरा दारावर तुळशीपत्र ठेवतात काहीजन पदर मोड करून कर्तुत्व दावतात तर काही फौजा समोरच्या फौजे पेक्षा आपला मेळावा कसा भव्य दिव्य होईल यासाठी सर्वस्व पणाला लावतात. वधुवर मेळावा यशस्वी करणार्‍या फौजा आज महाराष्ट्रात इतक्या कार्यरत आहेत की यांच्या कार्याची नोंद गिर्नीज बुकात नोंद करावी एवढी आहे. लग्न या एका शब्दा साठी ही मंडळी झपाटलेली आहेत.

 चार लाख संताजीला पण भव्य दिव्य मेळाव्यांना ५ ते ६ कोटी रूपये.

     वास्तव हे वास्तव  आसते त्याला बेगड देता येत नाही. सोन्याच्या पाण्यात बुडवले तरी वास्तव थोड्या दिवसात आपले वास्तव पण प्रकट करते. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा ठिकाणी, तालुका पातळीवर सुद्धा , काही भागात फक्त पोटजाती साठी, काही काही शहरात एक दिवसा आड वधु वर मेळावे भरवले जातात. काही व्यवसायीक हे वास्तव आहे. आम्ही समाज सेवा करित नाही. आम्ही स्वच्छ पणे वधुवरांचे मार्केटींग करतो आसे ही काही वधुवर मेळावे साजरे होतात. वरिल सर्व मेळाव्यात किमान फी ३०० ते १५०० रूपये आसते. तो संपन्न करण्यासाठी जो पैसा गोळा होतो तो समाजाचाच आसतो. आज काही गैर मार्ग धुंडाळले जातात त्यावर तुफान हाल्ले मी या पुर्वी केलेत. आज ही पुढे आहे. प्रथम समाजाच्या पैशाकडे वळूया. वधु-वरांच्या किमान ३०० ते १५०० रूपये हे खुशीच्या शक्तीने घेतले जातत. ते नसतील तर समाज सेवा त्या बांधवाला नसते १०० ते ३०० रूपये प्रवेशा फी दिली  नाही तर भव्य दिव्य समाज सेवा तुम्हाला पहाता येत नाही. वधु-वर मेळावा काळाची गरज, वधु-वर मेळावा समाजाची गरज. अशाी गरज न रहाता ती पुढार पणाची गरज हा संशोधनाचा विषय न रहाता सहज जरी  आशा मेळाव्यात फेरफटका मारला तरी समजून येते. हा मेळावा वधुवरांची गरज न रहाता पुढार्‍यांची गरज झाली आहे. महाराष्ट्रातून आशा मेळाव्यातून किमान ५ ते ६ कोटी रूपये गोळा होतात. व तेवढेच खर्च ही होतात. महाराष्ट्रात दहा टक्के तेली बांधव आहेत ही गर्जना करणारी पुढारी मंडळी जेंवहा पावलो पावली भेटतात तेंव्हा त्यंाच्या सिंह गर्जनेकडे पाहून महाराष्ट्र शासन समाजाला ५ ते ६ लाख सुद्धा देत नाही. पण समाजाचा जीर्णउद्धार करावयास निघालेले हे पुुढारी पिचलेला गांजलेल्या व होरपळलेल्या समाज बांधवांची सेवा धुडकावून भव्यदिव्य पणाच्या इर्ष साठी प्रतिष्ठांना अधीक प्रतिष्ठा देतात. ती ही प्रतिष्ठा ते देणगी जहिरात स्वरूपात रोख रक्कम घेऊन देतात पैसा न देणारा सामान्य बांधव प्रेवशा फी अभावी दारात आसते. मध्यमवर्ग गरज म्हणुन आलेला  आसतो ३०० ते १५०० रूपयें देउन आपला स्व्चछ व्यवहार पहात. घरच्या वधु वरांचे जमल्या नंतर मगच तो आशा मार्केटींग करणार्‍या वुधवर मेळाव्यावर तोंड सुख घेतो. वधुवर फॉर्म वरील छोट्या संताजीच्या फोटो कडे पहात म्हणातो. माझ्ये काय झाले मी पैसे देऊन गेलो होतो. समाज सेवा करणारे मला दाखवा. कारण ५ ते ६ कोट रूपये गोळा करून संताजीच्या फोटो लावून संपन्न होणार्‍या मेळाव्यात मार्केटींग हा विषय जास्त आसतो हे त्याचे अनुभवाचे बोल खरे राहिलेले आसतात. ही काही वधु वर मेळाव्याची भव्य दिव्य वाट. श्री संत संताजी महाराज जगनाडे या समाज संस्थेतर्फे विकास आराखाडा व यामध्ये शासन व समाज पुढारी हा भाग मी इथे जाणिव पुर्वक बाजुला ठेवला आहे कारण ही बाब थोडक्यात मांडण्यासारखी नाही पुन्हा कधी तरी सविस्तर मांडू आज फक्त उत्सव पहात आहोत. सात लाख रूपये खर्च ४ लाख जमा. ही कशाची शोकांतिका आहे वधु-वर मेळाव्याला खुशीच्या दबावाने लाखो लाखो रूपये देतो. पण इथे शेकड्यात रूपये देतो. हे शेकड्यातील देणगी म्हणजे संताजी निष्ठा हजारो किंवा लाखो रूपये दिले की वधुवर मेळ्याव्यातील प्रतिष्ठा| आपणास आशा प्रतिष्ठेची हौस सुटते आणि कधी खुशीने कधी दडपणाला बळी पडून मेळावे भव्य दिव्य करण्यास उभे रहातो परंतु संताजी उत्सवाला असा. आकडता हात का ? यावर कोण म्हणेल आमचे त्या पदाधीकार्‍यांचे जमत नाही. आज पर्यंतच्या प्रत्येक उत्सवात जमा खर्चाची ओढाताण आहे. त्या त्या वेळच्या अध्यक्षांना जमे साठी तारेची कसरत करावी लागली आहे. वर्तमान पदाधीकार्‍यांची फक्त अडचन नव्हे तर काल ही असेच होते आजच्या सारखे परंतु वधु -वर मेळाव्याची तुलना करावयाची ही माझी आजची मांडणी जरूर आहे. म्हणून म्हणतो वधु -वर मेळावे काळाची गरज म्हणुन पायाला पाणे बांधुन सुरूवातीला जे कोण होते त्या पैकी मी एक म्हणुन हाक्काने सांगतो फक्त दहा रूपयात वधु -वर मेळावा ही सुरवात होती. आज १५०० रूपये ही मेळाव्या मधील मार्केटींगची भरभराट आहे.

 मोफत वधु वर मेळावे म्हणजे नेमके काय ?

     गत ३२ वर्षात प्रसिद्ध झालेल्या लाखो वधुवरांची प्रसिद्धी देणारी तेली गल्ली (गावकूस) मासिके याची माझ्याकडे आहेत. यातून अगणीत वधूवरांचे सुखी संसार आज नांदत आहेत. या सर्वांना एक स्मरण आहे.  एक ही रूपया न घेता आम्हाला प्रसिद्धी दोन सहकार्य मिळाले. ही आमची वाट चाल मार्केटींग वधुवर मेळाव्यात कुचेष्टेचा विषय होता. अनेक पुढार्‍यांचे स्पष्ट मत होते फोर व्हीलर, टु व्हीलर व मोबाईल फिरताच भव्य दिव्य पणा साजरा करता येतो. समाजाची दारे टिपून काय होणार पण आशी कुचेष्टा पायदळी तुडवत. या विक्रतीवर हाल्ले ही केले. यातूनच जळगाव येथे आर.टी. (आन्ना) चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बँड वाजवून गाजावाजा न करता ३००० हजार वधुवरांची पुस्तका, प्रवेश व भोजन मोफत देउन त्यांनी सुरूवात केली परंतु हे करताना देणग्यांचे वाडगे घेऊन दौरे न करता. आपल्या भक्कम समाज संस्थेचे योगदन हे भरीव दिले. कारण समाज संस्थेकडे आसलेला पैसा हा समाजाच होता. मग समाजासाठी खर्च केला तर वाईट होणार नाही याचा विचार प्रथम केला सन २०१३ मध्ये सुदुंबरे येथिल समाजाच्या मात्र संस्थे तर्फे प्रथम मोफत वधु वर मेळावा अयोजीत केला. तसे पाहिले तर दर वर्षी किमान ७ ते ८ हजार समाज बांधव एकत्र येतात. संताजी दर्शन व महाप्रसाद नंतर परस्पर वधुवर संशोधन करित परंतू या वर्षी संस्थेतर्फे नियोजन पुर्वक प्रयत्न करून मोफत भव्य व दिव्य वधुवर मेळावा यशस्वी केला. या साठी किमान हजार वधु वर अव्हानाला प्रतिसाद देत हाजर होते. आणिमोफत वधुवर मेळावा यशस्वी होतो हीच खरी गरज आहे यात समाजाची समता आहे. पैसे वाला व गरिब हा भेद करून प्रवेशा नाकारला जात नाही. ही वस्तुस्थीती आहे. भोजन, हॉल व प्रसिद्धी यात काटछाट करून वधूवरांना एक रंगमंच निर्माण करून देतो येतो. हा संदेश समाजाच्या मनावर कोरला गेला. हा संदेश कोरला म्हणून काही बाबी येथे मांडाव्या लागतात. पुढील बाबी ह्या मोफत वधुवर मेळावे ही चळवळ बदनाम होउ नये म्हणून मांडत आहे. कोणाला तरी दुखावणे किंवा कुणाला तरी सुखावणे ही वाटचाल माझी नसते हे सर्वांना न्यात आहे म्हणून मांडतो. वधुवर मेळाव्यात गुंतलेला कार्य करणार्‍या समाजाच्या फौजा ह्या वर्तुळा बाहेर नाहीत. या ही पेक्षा मोठी समाज कार्याची भूक ते भूकबळी करतात. पण आज इथे फक्त वधुवर मेळावे ही चर्चा करीत आहोत. म्हणून म्हणतो ज्या बोगस मराठा कुणब्यांनी आपल्या ताटातील भाकरी हिसकावली आहे. आशा जात दांडग्या, धनदांडग्या मराठा समाजातील लबाडांनी देणग्या दिल्या की मोफत वधु वर मेळावे नकोत. लोकसभा, विधानसभा, महापालीका, नगरपालिका निवडणूका दरम्यान उमेदवारां कडून लाखो रूपये घेऊन मोफत वधु-वर मेळावे नकोत.. कारण आपण मोफत मोफत म्हणत समाज विकत आहोत. मोफत मेळावे घेताना निम्मा खर्च हा समाज संस्थेचा ठेवा इतर खर्च स्वच्छ निधीतुन गोळा करा. तरच मोफत वधु-वर मेळावे यशस्वी होतील. आज भव्य दिव्य वधुवर मेळाव्याच्या मार्केटिंग खाली जो फार मोठा आंधार आहे तसाच अंधार भविष्यात येथे ही पसरणार आहे. 

दिनांक 04-03-2015 16:41:48
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in