पनवेल : धुळे जिल्ह्यातील दोंडाई शहरातील नूतन माध्यमिक विद्यालयात काही दिवसांपूर्वी एका तेली समाजातील ५ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केलेल्या नमाधरास कठोर शिक्षा व्हावी, याकरीता कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि पनवेल तेली समाज विचार मंच यांच्या वतीने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. काही महिन्यांपूर्वी या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळेला या नराधमाला योग्य शासन झाले असते तर हा प्रकार पुन्हा घडला नसता असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून याकरीता प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता योग्य ते पाऊल उचलण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. या घटनेचा निषेध जिल्ह्यातील तेली समाज बांधव करीत असून समाजात घडलेल्या घटनेविषयी संतप्त भावना आहे. कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि पनवेल तेली समाज विचार मंच यांच्या वतीने निवेदन देताना कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष सतीश वैरागी पनवेल तेली समाज विचार मंचचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, कोकण विभागीय कार्याध्यक्ष गणेश धोत्रे ,उपाध्यक्ष गजानन । शेलार ,खजिनदार तुकाराम किर्वे ,तालुका उपाध्यक्ष अनिल खोंड आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.