पुणे :- श्री. संत संताजी जगनाडे तेली समाज संस्था सुदूंबरे या मध्यवर्ती संस्थेेची कार्यकारणी सभा फुलगांव, ता. हवेली, येथील येवले फॉर्म हाऊस मध्ये संपन्न झाली सभेसाठी पुणे, चाकण, तळेगांव, ढमढेरे, आळे लोणावळा, नगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड अशा विविध परिसरातील समाज बांधव उपस्थीत होते. शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभे समोर संस्था अध्यक्षाकडे दिला. त्यांनी शिक्षण समितीला निधीच नाही तर बिन कामाचे पद संभाळण्यात मला आनंद नाही हे स्पष्ट केले. यावर उपस्थीत समाज बांधवानी निधी उपलब्ध कसा करूया यावर आपले विचार व्यक्त केले. त्यापुर्वी सन २०१३ मध्ये संपन्न झालेल्या संताजी पुण्यतिथीला खर्चाचा आढावा श्री. घाटकर यांनी सादर केला. सात लाख रुपये खर्च तर चार लाख रूपये देणग्या वाढविण्या बाबत मागील देणगी पुस्तके सत्वर जमा करण्या बाबत सुचना व त्यांच्याशी संपर्क साधण्याचे ठरले.
समाज संस्था शतक महोत्सवाकडे वाटचाल करित आहे. संस्थेची घटना या पुर्वी दुरूस्त करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तांत्रिक अडचनी मुळे धर्मादाय आयुक्ता पर्यंत घटना पोहचली नाही. जुनी घटना ही त्या वेळच्या काळानरुप आहे. शंभर वर्षात काळ बदलला समाज संसथा वाढली. समाजाच्या व संस्थेच्या गरजा वाढल्या. संस्थेचा विस्तार वाढला यामुळे घटना दुरूस्ती करणे गरजेचे होऊन बसले आहे. या साठी घटना समिती स्थापन करण्यात आली. ऍड. येवले यांच्या अध्यक्ष ते खाली एक कमिटी गठीत केली गेली. समितीचे अध्यक्ष या नात्याने ऍड. यवले यांनी सर्वांना आपल्या सुचना व अपेक्षा लेखी स्वरूपात देण्याची विनंती केली. तसे जाहिर अव्हान त्यांनी केले. समाज संस्थेच्या कार्याची माहिती सर्व समाजात जावी समाजाच्या अपेक्षा कळव्यात समाजाचा सहभाग वाढावा या दृष्टिने या संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. मोहन देशमाने यांची निवड केल्याचे जाहिर करण्यात आले. उपस्थीत समाज बाधवांनी टाळ्यांच्या गजरात या योग्य निवडीचे स्वागत केले.
विविध विषयावर चर्चा झाल्या नंतर संस्था अध्यक्ष जनार्दन शेठ जगनाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वाटचालिचा व आर्थिक आडचणीचा आढावा घेतला. संस्थेला शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. संस्था पुणे, नगर, मुंबई, सातारा, रायगड, ठाणे, नाशीक या परिसरात कार्यरथ आहे. ती प्रत्येक घरात पोहच झाली. त्या रूपाने श्री. संत संताजी महाराज ही पोहचले आहेत. परंतु पुर्ण महाराष्ट्रच्या घरा घरात संताजी पोहचने बाकी आहे. या पुर्वीच्या पदाधीकारी मंडळींनी तसा प्रयत्न ही कलेा होता. परंतु आता द्रुत गतीने आपण पाऊल उचलुन प्रत्येक घरात संताजी पोहच सर्वांच्या सहकार्याने पोहच करीत आहोत. या साठी आपल्या संस्थेचा विस्तार करणार आहोत कार्यकारणी व पदाधीकारी हे ठराविक परिसरांचेचे न रहाता ते संपुर्ण महाराष्ट्राचे असावेत या साठी प्रत्येक जिल्हा प्रतिनिधी. त्यांच्या सोबत तालुका व गाव पातळीवर कमिट्या कार्यरथ करून यातूनच संताजी कार्य व संस्था विस्तार होणार आहे.
सदरच्या सभेत सर्वश्री बाळासोा. कोथुळकर, विजय रत्नपारखी हणामंत फल्ले, सुरेश खळदे, विजय रत्नपारखी, हणमंत फल्ले, सुरेश खळदे, रत्नपारखी गुरूजी, शिवदास उबाळे, भगवान लुटे, भोज, राजेश, शेजवळ, बाळोसोा. शोलार, कहाणे गुरूजी, शंकरराव राऊत, दिलीप फलटणकर, मोहन देशमाने, बारमुख, कुवेसकर, चंद्रकांत दुर्गड अशा विविध बांधवांनी आपली मते मांडली अतिशय खेळी मेळी त झालेल्या सभेचे सुत्र संचालन सचिव श्री नितीन जगनाडे यांनी केले. श्री. घाटकर यांनी हिशोब सांगितला व श्री. अँड. यवले यांनी स्वागत केले.