श्रीरामपुर तालुका प्रांतिक तैलिक महासभा व युवा महासभा यांच्या वतीने भव्य मेळावा श्रीरामपुर तालुका तेली समाज मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा दिनांक 27/03/2018, मंगळवार रोजी अतिशय सुंदर व थाटामाटात संपन्न झाला. उतर अहमदनगर जिल्हा प्रांतिक जिल्हा पदाधिकार्यांचे, तालुका प्रमुख, समाज प्रतिनिधी हजर होते. आपण सर्वानी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहुन जी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल श्रीरामपुर तालुका तैलिक महासभा आपली खुप खुप आभारी आहे.
आलेल्या सर्व मान्यवरांनी, प्रमुख पाहुन्यांनी, जिल्हा पदाधिकारी व समाज बांधवानी आम्ही केलेल्या कार्याचे कौतुक करुण कौतुकाची थाप आम्हाला दिली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा खालील प्रमाणे संपन्न झाला. प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन - प्रमुख पाहुन्यांच्या शुभहस्ते श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुण दिप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक व पाहुन्यांचे स्वागत - मा. श्री. चंद्रकांतजी शेजुळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिशय मार्मिक भाषेमध्ये करुण पाहुन्यांचे शब्द सुमन्नाने स्वागत केले. अध्यक्ष निवड - कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवाड़ी ची सुचना श्री. राजेंद्र सैंदर यांनी मांडली. अनुमोदन - श्री. प्रकाश काळे यांनी अध्यक्ष निवडी च्या सुचनेला सर्वानुमते अनुमोदन दिले. मान्यवारांचा सत्कार - सर्व मान्यवारांचा, प्रमुख पाहुन्यांचा, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ समाज बांधव यांचा श्रीरामपुर तैलिक महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला. डायरीचा उद्देश - श्री. किरण सोनवणे यांनी डायरी तयार करण्यामागचा उद्देश, डायरीत संकलित असणारी माहिती, आलेल्या अडचणी इत्यादी बाबी समाज बांधवाना सांगितल्या. मनोगत - श्री. निलेश नागले यांनी श्रीरामपुर शहरामध्ये संताजी महाराज यांच्या मंदिर बांधन्यासाठी येत असलेल्या अडचणी विषयी चर्चा केली. मनोगत - श्री. भरतशेठ साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समाज प्रतिनिधी :- श्री. रविंद्र कर्पे यांनी समाज संघटन कसे वाढवले पाहिजेत यासाठी समाजाला संबोधित केले. मार्गदर्शन - मा. श्री. बंडूशेठ शिरसागर मा. श्री. नानासाहेब जाधव मा. श्री. चंद्रकांतजी वाव्हळ या प्रमुख तीन मान्यवरांनी समाज बांधवाना मार्गदर्शन केले. मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा - मान्यवारांच्या शुभहस्ते डायरी चे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत:- मा. श्री. भागवतरावजी लुटे यांनी अध्यक्षीय मनोगतामधे कार्यक्रमाचे कौतुक केले. समाज एकसंघ होण्यासाठी अनेक उपक्रमांची माहिती दिली. आभार प्रदर्शन - श्री. अनिलराव काळे यांनी अतिशय काव्यमय भाषेमध्ये सर्वांचे आभार मानलेत. सूत्रसंचालन - आमोल लोखंडे सर व श्री. रामदास गायकवाड सर यांनी अतिशय सुंदर व अलंकारित भाषेमध्ये सर्व श्रोत्यांची मने जिंकून घेतली.. भोजन - कार्यक्रम संपल्यानंतर समाज बांधवानी जेवणाचा आंनद घेतला.