कली धर्मा बाबत मागे संतांनी सांगितले आचार सांडणारे ब्राह्मण आहेत - संत तुकाराम

     ज्यांना आपण संत म्हणुन पुजतो. त्या संत संताजींनी जीवापाड जपलेला हा एक संत तुकारामांचा अभंग. या विषयी आज का बोलायचे तर आपले  हाय कमांड व आपण आज ब्राह्मणी धर्माकडे फरफटत निघालोत. भुतकाळाला लाथाडून जुनीच पण नवी गुलामगीरी अनंदाने स्विकारत आहोत याबदद्ल हे विचार मांडून फार मोठा बदल जरूर होणार नाही. परंतु प्रकाशाचा चांगला दिवस म्हणुन काळ्या क्रुर अंधार वाटेवर हा काजवा जरूर असेल. कारण दिप स्तंभाचे नाव घेऊन अंधार वाट तुडवत असताना कुठे तरी जाणीव जरूर होणार आहे. कारण हे तुकारामांचे विचार संताजींनी ब्राह्मणी पणाच्या छताडावर नाचुन जपलेत. हा त्याचा वारसा फक्त समोर ठेवणे हे कर्तव्य आहे. म्हणुन हे लेखन.

 तुका म्हणे कैंचे ब्रम्ह | अवघा भ्रम विषयांचा ॥

     विषमते पासुन सुटका होण्यासाठी संत संताजींनी पंढरपुरचा विठ्ठल आपला मानला. नुसता आपला मानला नाही तर माय बाप म्हणुन संत तुकारामांच्या खांद्याला खादा देऊन उभ्या महाराष्ट्राला सांगितले. एवढी विषमता त्या काळी धर्माच्या ठेकेदारांनी निर्माण केलेली होती. ही विषमता, ही दहशत हा अतंकवाद धर्म पुस्तकातुन सांगतीले की हे देव कार्य आहे. तात्पर्य देवाचा धाक दाखवून त्यांनी अधर्म माजवला होता. या अधर्माची सुरूवात या ब्राम्हणानी संत नामदेवरांच्या कुटूंबातील सर्वांना जलसमाधी दिल्या पासुन सुरू झाली त्या ही पुर्वी शेकडो वर्षा पुर्वी असाच अतंकवादाची सुरूवात ब्राह्मणीपणाने सुरू केली होती. देशाच्या व महाराष्ट्राच्या घरा घरात मना मनात समता सांगणारा बौद्ध सुखात नांदत होता. दु:खात होते ब्राह्मणपण याच मंडळींनी कपट नितीने सम्राट अशोकाच्या नातवाचा खुन केला. आता तुम्ही म्हणाल. या बुद्धाचा आमचा काय संबध ? बिहार मध्ये आज प्राचिन अवशेषात तेली समाजाचा बौद्ध धर्मातील अद्वीतीय कर्तव्य जपले आहे. सिलोन सारख्या देशात बौद्ध धर्म घेऊन जाणारे जे कोण होते ते तेलीच बहुसंख्य होते. हा या देशाचा इतिहास आहे. याच्या ही पुर्वी जेंव्हा परकीय आर्यानी जेंव्हा या देशात अक्रमण केले तेंव्हा कपट दगा बाजी करून इथे पाय रोवले. बळी राजा हा मुळ निवासी लोकांचा राजा होता. त्याला कपटनितीने मारणारे ब्राह्मण्यच होते. याच बळी राजाचा नाते वंश पंडु म्हणून पंढरपुरात राज्य करित होते. याच घराण्यात विठ्ठल नावाचा पराक्रमी समतावादी राजा होऊन गेला असणार. आशा महान व्यक्तीला आपले माणनारे हे मुळनिवासी होते. त्यांचा हा विठ्ठल समतेच्या विटेवर उभा होता. म्हणून संत संताजींनी आपले माय बाप मानले. विठ्ठलाला समोर ठेऊन समतेला समोर ठेऊन नुसते टाळकुटी नाहीत गंध लावुन भजन केले नाही तर ब्राह्मणी पणाचा खोटा ब्रम्ह, खोटी माहिती त्यांनी पुराव्यानिशी मांडली तुमचा हा सर्व मुखवटा आहे. सत्य काय असेल तर पैसा, सत्ता व सर्व प्रकारचे भोग. हे असले धर्म शास्त्र नाही धर्मशास्त्र म्हणत असाल तर ते समतेचे आहे. कारण त्या काळी पोळणार्‍या वर्गाचा वैदिक धर्म व पिळल्या गेलेल्या वर्गाचा अवैदिक धर्म चार हात अंतर ठेवून होता. परंतू अवैदिक वर ब्राह्मणी पणाने आपलाअत्याचारी धर्म लादला होता तो नष्ट करण्याचे काम संत संताजींनी केले. हे या पुरूषाचे एैतिहासिक कार्य आपन विसरलोत. म्हणजे आपलेच आपली ओळख विसरलोत. ज्याला स्वत:ची ओळख नसते. त्याला इतिहास क्षम्य करीत नाही. त्याला गुलामगीरी शिवाय पर्याय नसतो. का तर आपण भ्रमाच्या मागे पळत निघालोत.

 ॥संत निंदा ज्याचे घरीं ॥नव्हे घर ते यमपुरी ॥

     दारा हा औरंगजेबाचा मोठा भाऊ तो हिंदू व मुसलीम समान मानत होता. परंतु औरंगजेबाने त्याला नष्ट करून अधर्म माजवला असा बादशाहा विषमतेकडे जाणारा तो काळ होता. महाराष्ट्रात मुसलीम सत्ता सुखात होती. त्यांच्या दरबारात अनेक ब्राह्मण सरदार उच्चपदावर होते. त्यांच्या आश्रयाने ब्राह्मणी धर्म कर्मठपणात उभा होता. संत कोणाला म्हणावे तर जो रंजल्या गांजल्या व्यक्तींना आपले म्हणतो. त्यांच्या साठी झटतो. कष्ट घेतो त्याला संत म्हणावे. हे पवित्र कार्य देवाचंच आसते ते ही संत मंडळी करित असतात. संत संताजींनी संत तुकारामांनी जे आयुष्यभर केले ते हेच की पिळलेल्या पिचलेल्या दडपलेल्या समाजाला माणुस म्हणुन उभे केले. परंतु त्यांच्या विरोधात जो दावा दाखल केला. तो करताना धर्म शास्त्राचा आधार घेऊन. त्याचा आशय असा तुकाराम वेदावर भाष्य करतात. तुकारामांना ब्राह्मण शिष्य करण्याचा अधीकार नाही. ब्राह्मणारकडून पाया पडून घेण्याचा अधीकार नाही याच आधारावर त्यांना शिक्षा सुनवली याचा अर्थ एकच विषमता नाकारू नका, गुलामगीरी झटकू नका, सत्य सांगू नका , खेरे काय खोटे काय यावर मत प्रकट करू नका. यातूनच त्यांच्या विचार स्वातंत्र्याला थांबवू पाहिले तुकाराम महाराजांच्या खुनी हल्यातुन अंत झाल्या नंतर काही दशकात पेशव्यांच्या रूपाने ब्राह्मणशाही सत्तेत होती या वेळी किर्तनाच्या फडावर संत तुकारामांचे अभंग म्हणत असत. या वेळी सत्य सांगणार्‍या संत तुकारामांच्या अभंगावर बंदी आली. आता आपण या पुर्वीची व्यथा पाहू. काही ब्राह्मण तंबुतून आरोळी दिली जाते संतांनी संघर्ष संपवला काही जन तर त्यांना संताळे ही म्हणतात . परंतू ते जाणीव पुर्वक एैतिहासिक कार्य दडवून ठेवतात. बोपदेव, हेमांड यांच्या अतंकवादाच्या चिंद्या झाले. दडपलेले समाज मुसलीम धर्मातील काही तत्त्वाकडे अकर्षीत होत होते. नेमंके या वेळी पिचलेल्या समाजातील अनेक जन संत नामदेवांच्या नेतृत्वा खाली एकत्र येऊन त्यांनी पंडू राजांच्या पंढरपूरात विठ्ठलाच्या समतेत उभे राहिले. संतांनी काय केले असेल तर त्यांनी मुसलीम धर्माचा प्रभाव रोखला त्यांनी हिंदू धर्मात ही विठ्ठल जवळ समता हे पटवुन दिले. हे संतांनी काम केले म्हणुन संत हे रंजल्या गांजलेल्या समाजाची सेवा करीत हे समोर येते. ते नुसते टाळकुटी, भजन करणे आपली दु:खे देवा समोर मांउून पिचलेल्या नव्हे तर पिचवणार्‍यांचे कर्दन काळ ठरले.  या सर्व संत नामदेव, संत जोगा, संत मिराबाई, संत गोरबा, संत सेना संत सावता, संत भोजलिंग काका, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत संताजी ही सर्व पिळलेल्या जात समुहातील होते परंतु आज या संतावर असा ही पंढरपुरात वास्त्व्य करणारी मंडळी पडद्या मागुन निंदा चेष्टा करित असतील आणि या मंडळीचा अतील डाव आपण ओळखत नसु तर संतांचे घर व निंदकांचे घर नक्की कोणते हे आपण समजु शकलो नाही हे समोर येते.

 ॥तुका म्हणे चुकले वर्म |  केला अवघा चि अधर्म ॥

     धर्म व अधर्म या बाबत संत संतांजींनी जीवनभर संघर्ष केला. संत तुकाराांचे शिष्य, लेखनिक म्हणने हेच मुळात त्यांच्या जीवीत कार्याला संकोचित करण्यासारखे आहे. कारण की खोटा धर्म सांगुन लोकांना लुटणे त्यांना धर्माच्या नावा खाली दडपुन ठेवणे. त्यांच्या विचारशक्ती कोंडित पकडणे. त्यांच्या दु:खाचे तारणकर्ते  आम्हीच आहोत. ते दूर करण्याचे वर्म आमच्याकडे आहे. जे सुख आहे. ते देेवा मुळे म्हणजे आमच्या मुळे आहे. हे वर्म जवळ ठेऊन सुख ओरबडणे हा अधर्म आहेे. हे सांगणे त्या वेळी पाय होते कारण ब्राह्मणाच्या वर्मावर तो आघात होता. अगदी बळी राजा ते आज पर्यंत ब्राम्हण्याचा आढावा घेतला तर या मंडळींनी आपल्या वर्मावर हाल्ले करणार्‍याना वेग वेगळ्या मार्गाने संपवुन त्या महान व्यक्तीमधील चांगले पणाचा फायदा उठविण्यासाठी हीच मंडळी पुढे सरसवतात धर्म व अधर्म इतका हुशारीने वापरतात की सर्व सामान्य माणुस अधर्मालाच धर्म समजुन गुलाम गीरीचा पाईक होतो. खरा धर्म कोणता या साठी संत तुकारामांनी हजारो अभंग तयार करून जनमानसात दिले ते रूजवण्याचे त्यासाठी संघर्ष करण्याचे काम संत संताजींनी केले. अधर्म नष्ट केला. तो करताना त्यांनी देवकार्य केले नव्हते. ते देव नव्हते तर रंजल्या गांजल्या समुहाची सेवा करणारे संत होते संत हे माणसातुन निर्माण होतात. संत नामदेव ते संतगाडगे बाबा यांच्या कडे पहिल्या नंतर लक्षात येते. त्यांनी अवघाची अधर्म चव्ह्याट्यावर आणला.

 संत नामदेव, संत तुकाराम ते महात्मा फुले

     संत नामदेवांच्या बरोबरचे सर्व संत हे सर्व सामान्य जात समुहातील होते. संत ज्ञानेर्‍वर हे संत भोजलिंग काका मुळे संत नामदेवाकडे आले. संत तुकाराम हे कुठे मी मराठा आहे सांगत नाहीत. ते अभिमानाने सांगतात मी कोण आहे तर एक कुणबी. मी कुणबी आहे याचा मला आनंद वाटतो. महात्मा फुले हे जन्माने माळी होते. त्यांनी सुद्धा रंजल्या गांजल्या जात समुहा साठी संघर्ष केला. संत गाडगे बाबा, संत तुकडोजी ही महान माणसे साध्या जातीतुन आली. ही मंडळी बाधीत जातीत जन्मलेली होती. त्यांच्यावर होणार्‍या समाजीक अन्यायाची त्यांना खरी जान होती. धर्म व अधर्म याची नक्की व्याख्या त्यांच्या जवळ होती. जगण्याचे प्रश्न जटील करणार्‍या विरोधात ती उभी राहिली अगदी बळीराजा पासुनचा इतिहास आपण तपासला तर रंजल्या गांजल्या समुहा साठी जो जो म्हणुन झटु लागतो त्या त्या व्यक्तींला विरोध करणारे नेमके ब्राह्मण्याच कसे समोर आसते हे ब्राह्मण्य त्या त्या प्रसंगी वेगवेगळी सोंगे घेऊन या सोंगा द्वारे ब्राह्मणी व्यवस्था.रंजल्या गांजल्या लोकांची सेेवा करणार्‍या या संतांची आमानुष वागणुक संपवुन टाकते. परंतु लोक मानसात असलेली प्रतिमा पाहुन या महान व्यक्तींना काळानरूप बदलुन त्यांना माणनारा एक वर्ग आपला बनवतो. धर्माच्या नावा खाली हा अधर्म सुरू आसतो. संत नामदेवांची जलसमाधी व त्यानंतर त्यांच्या नावावर खपवलेले हजारो अभंग तसेच संत तुकारामांच्या अभंगावरील पेशवाईतली बंदी व इंग्रजी राजवटीत इंग्रज अधीकार्‍या मुळे मोडीतले अभंग देवनागरी करताना पंडीताच्या हातून शेकडो वर्ष जपलेल्या अभंगाच्या वह्या हरवणे पाटभेद करताना काय केले. याचे पुरावे नष्ट करणे. यातील एका समुहाने तुकोबांवर असंसारी, वाणी, अव्यवहारी म्हणुन लेखने व यातील एका समुहाने गोडवे गाऊन तुकोबांचे अभंग म्हणुन बिंबवणे हाच अधर्म आहे. महात्माफुले ह ब्राह्मण व्यतिरिक्त इतर समाजाला शिक्षण मिळावे यासाठी झटत होते. ते विषमता दुर करित होते. स्त्रियांना गुलामगीरीतुन बाहेर काढीत होते. हे काम करून ते रंगजल्या गांजल्या समुहला मानवता देत होते. परंतु महादेव कंभाराला मारेकरी पाठविले. फुल्यांनी त्या कुंभाराला  सत्य सांगीतले एवढ्यावर फुले गप्प बसले नाहीत तर फुल्यांनी त्यांना संस्कृतीचे ज्ञान देण्याची सोय केली. हेेच महादेव कुंभार नंतर स्वत:ला धर्माचे ठेकदार म्हणुन समजत होते. त्यांना समोरा समोर खरा धर्म कोणता हेे पटवुन दिले. परंतु याच विकृतीने संत नामदेवांना त्यांच्या कुटुंबा सहित जलसमिधी दिली. संत तुकारामांना धुलवडीच्या दिवशी संपवुन टाकुन विकृती खर्‍या धर्माच्या आडोशाला उभी राहुन अधर्म माजवते. ही परंपरा आज ही राबवत आहेत. नरेंद्र दाभोळकर कॉ. पानसरे यांना मारून ब्राह्मण पण समोर येते तेंव्हा हे विसरून चालणार नाही.

दिनांक 06-03-2015 21:29:58
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in