झी वाहिनीवरील सायंकाळी ७.३० वा. कन्यादान ही मालिका सुरू झाली आहे. दिनांक १०/३/२०१५ ते १२/०३/२०१५ रोजी या मालिकेतील नावे कलाकार श्री. सदाशिव किर्तने व नंदकुमार तेली यांच्यामध्ये संवादात श्री. नंदकुमार तेली हा भ्रष्टाचारी आहे व मी त्याच्या हाताखाली काम मुळीच करणार नाही हे वाक्य श्री. सदाशिव किर्तने बोलण्यात आले आहे. सदर मालिकेचे दिग्दर्शक श्री.गौतम कोळी आहेत. खरे पाहता कन्यादान या मालिकेत वरील संवाद हे तेली समाजाबद्दल बोलण्याचे दाखविण्यात आल्यामुळे दिनांक १७/०३/२०१५ रोजी श्री. विलास त्रिंबककर (अध्यक्ष मुंबई विभाग, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज), श्री. सतिश वैरागी (अध्यक्ष कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज), श्री. सुनिल खळदे (अध्यक्ष रायगड जिल्हा, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज), श्री. सुभाष पन्हाळे (कार्याध्यक्ष, सेवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, पुणे), श्री. चंद्रकांत भागवत (महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, मुंबई), श्री. अनंत देशमाने (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, पुणे), श्री. सुरेश पडवळकर (संपादक कोकण स्नेही, मुंबई), श्री. शाम घोडके (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, ठाणे तथा पत्रकार), श्री. भगवान बोरसे (अध्यक्ष, संताजी तेली समाज विरार वसई), सौ. दर्शना नामदे (अध्यक्ष, अण्णा हजारे न्याय, पालघर), श्रीमती. अनिला चौधरी (महिला अध्यक्षा, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा), श्री. नान तळमळे व सौ. कल्पना तळमळे (महिला अध्यक्षा, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, ठाणे) आदी मान्यंवरानी झी मराठी वरळी येथील कार्यालयात जाऊन याबाबत निषेधाचे निवेदन देण्यात आले व त्यावेळेस तेथील प्रतिनिधी भावेश जानवेलकर (झी मराठी व्यापारी प्रमुख) सकारात्मक प्रतिसाद देवून तो संवाद काढून पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली तसेच पनवेल येथील श्री. अमोल क्षिरसागर (युवा नेते), सौ. प्रिया डिंगोरकर, शुभांगी खळदे, प्रज्ञेश डिंगोरकर, कुणाल चौधरी व शार्दुल यांनी कोकण प्रदेश अध्यक्ष श्री. सतिश वैरागी यांचे अभिनंदन केले.