भंडारा : धुळे जिल्ह्यातील दौडाईच्या शहरात पाच वर्षाच्या बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तेली समाज व संताजी युवा सेना भंडारा शहर शाखा पदाधिका-यांनी जिल्हाधिकायांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या घटनेचा संताजी युवा सेने तर्फे निषेध करण्यात आला.
याबाबत असे की, धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात नूतन माध्यमिक विद्यालयात ५ वर्षाच्या बालिकेवर अमानुष बलात्कार करण्यात आली. याप्रकरणी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये पीड़ितच्या आईवडीलांनी दोषी विरुद्ध गुन्हा दाखल केला व जळगाव सिव्हील हॉस्पीटल येथे तपासणी व उपचाराकरिता दाखल करण्यात आलले आहे. तेली समाजाच्या बालिकेवर झालेला हा अन्याय संपूर्ण भारतातील तेली समाजाने खपवून घ्यायचा का ? असा सवाल करुन फाशीची शिक्षा जर आरोपीस मिळाली नाही तर, तेली समाजातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी समाजात अशाप्रकारची घ्ाटना घडू नये, याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे. शिष्टमंडळात मंगेश पंजारी, अमित बिसने, शिशोर पावनकुळे, योगश पड़ाळे, प्रशांत गभणे, अमित मेहर, आदित्य मोटघरे, रोशन फेसलर, आकाश यापनकुळे, कमल साठवणे, तसेच महाराष्ट्र प्रांतीक तेली संघटनेने देवीदास लांजेवार, पिपराय सायणे, फुदा पैरा, शोभा धान, प्रमिला डोरले, धागा गभणे, अपां नपसरे, अखिल भारतीय तैलीक साहू महाभाचे सुभाष पाटे, दिनेश मस्के, राकेश ईखार, आपण नागुलवार आदींचा समावेश होता.