आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या वतीने धुळे दोंडाईचा येथील तेली समाजाच्या 5 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तहसीलदार व राहाता पोलीस यांना जाहीर निवेदन अॅड.विक्रांत वाघचौरे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालय या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीवर आमिष दाखवून संस्थेतील इसमाने अमानुष लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला, सदरील घटनेत पीडित मुलीच्या गरीब कुटुंबियांवर दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील प्रकरण अतिशय निंदनीय असून ,असे प्रकार सबंध महाराष्ट्रात वारंवार घडत आहे, बलात्कारित पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे संस्थापक अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे, जिल्हाध्यक्ष इरफानभाई शेख,गणेश वाघचौरे, रवी कोलकर, संदीप वाघमारे, यांनी पीडित मुलाला योग्य न्याय मिळावा,बलात्काराचा गुन्हा दाखल न व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था चालकांवर सह आरोपी करून गुन्हा दाखल करण्यात यावा ,प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी व संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून खटला विशेष जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद व्हावा यासाठी राहाता पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व राहाता तहसील कार्यालयात सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे सदस्य पदाधिकारी व तेली समाज बांधव यांचे उपस्थितीत जाहीर निवेदन दिले.
यावेळी मोठ्या संख्येने राहाता तालुका तेली समाज बांधव व राहाता शहर ग्रामस्थ उपस्थित होते.