उस्मानाबाद - धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्यावर कारवाई करण्याबाबत अमरावती जिल्हाधिकारी यांना अमरावती जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती ( तेली समाज ) चे कार्यकारणी चे वतीने आज दिनांक 22/02/2018 रोजी दुपारी 12 वाजता निवेदन देण्यात आले.
दोंडाईच्या येथील घडलेल्या तेली समाजाच्या बालीकेवर झालेल्या अत्याचाराचा तसेच सादर घटना दाबण्यासाठी संबंधित स्थानिक शालेय संस्था ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित संस्था नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संस्थाचालकांनी व राजकारण्यांनी निर्माण केलेल्या दबावाचा तीव्र निषेध करित आहोत पिडीत बालीकेच्या आई वडीलांना धमकवनार्या व आमिष दाखवनार्या संस्था चालकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घृणास्पद असून माणुसकिला काळिंमा फासणारी आहे .तरी बालिकेवर अत्याचार करणार्या व त्यास पाठिशी घालणार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करित आहोत.अत्याचार प्रकरणी बालिकेच्या कुटुंबावर दबाव कायम असून शिक्षण व संस्थाचालकाच्या समर्थकांकडून त्यांना सतत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आहे.त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करीत आहोत.
तसेच पीडित कुटूंबाला शासनाकडून योग्य ती मदत देण्यात यावी व आरोपीस कठोर शिक्षा देऊन तेली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात येत आहे. शासना कडून योग्य न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदना द्वारे देण्यात येत आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती चे पदाधिकारी व सभासद आदि समाज बांधव मोठ्या संख्येने निवेदन देतांना उपस्थित होते.
उपस्थित समाज बांधव सुनीलभाऊ साहू, संजयभाऊ मापले, संजयभाऊ शिरभाते, संजयभाऊ हिंगासपुरे, चांदुभाऊ पिंपळे, अरुणभाऊ गुल्हाणे, मनोहरराव गुल्हाणे, श्रीकृष्णराव माहोरे, विजय शिरभाते, किरणताई गुलवाडे, प्रतिक पिंपळे, प्रविण भस्मे, राजुभाऊ हजारे, नगरसेविका सौ. नीता राऊत, सुनीलभाऊ जावरे, प्रमोदभाऊ राऊत, दीपक गिरोळकर, सुनील चौकडे, पंकज गुल्हाणे, किशोरभाऊ शिरभाते, अरुणभाऊ शिरभाते, राहुल शिरभाते, वैभव बीजवे, राजेश चांडोळे, चंद्रशेखर जावरे, अविनाश मालोदे, आशुतोष गुल्हाणे, संजय ढोले, बाळासाहेब लोहारे, अविनाश देऊळकर, विशाल गोधनकर, देवानंद ईचे, अमोल आगाशे, खुशाल बीजवे, सागर शिरभाते, योगेश मावळे, शुभम माथूरकर