तिळवण तेली समाज पुणे वधु वर फॉर्म, 82 भवानी पेठ, श्रीसंत संताजी जगनाडे महाराज पुला जवळ, पुणे 411 002 आयोजित राज्यस्तरीय भव्य वधू - वर पालक परिचय मेळावा मंगळवार दि. 1 मे. रोजी सकाळी 10 ते सायं 5 पर्यंत.
सर्व समाज बंधू-भगिनींनो,
महाराष्ट्राचे केंद्रस्थान, विद्येचे माहेरघर, अखिल महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे या ऐतिहासिक शहरामध्ये भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा होत आहे. यानिमित्ताने आपले स्वागत करण्यास पुणे तिळवण तेली समाज उत्सुक आहे. तरी आपण आपल्या मुला-मुलींची नावनोंदणी करावी.
फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना १) फॉर्मसोबत रु.७००/- (रु. सातशे) रोख / मनिऑर्डर/ डी.डी. तिळवण तेली समाज, पुणे या नावाने पाठवावा. या रकमेमध्ये आपणास वधू
वरांची माहिती व फोटो असलेली रंगीत पुस्तिका व वधू/वरासोबत दोन व्यक्तींना मोफत प्रवेश दिला जाईल. वधू-वरांची उपस्थिती आवश्यक. तसेच संस्थेच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठविण्यासाठी संस्थेचा बँक खाते नंबर खाली नमूद केला आहे. 2) समाजबांधव व वधू-वरांसोबत आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी रु. १००/-ची प्रवेशिका समाजहितार्थ घेऊनच प्रवेश करावा, ही विनंती. ३) सुंदर छपाई होण्यासाठी फॉर्ममध्ये सुवाच्य अक्षरात संपूर्ण नाव लिहावे. तसेच २ पासपोर्ट साईझ फोटो प्लॅस्टिक पाकिटामध्ये टाकून पाठवावेत. पिशवीला स्टेपल करावे, फोटोला स्टेपल करू नये. फॉर्मसोबत फोटो न आल्यास फॉर्म स्वीकारला जाणार नाही. दि.२०/४/२०१८ नंतर आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. फॉर्म कमी पडल्यास या फॉर्मची झेरॉक्स काढून भरून पाठविली तरी चालेल. ४) वधू-वर सूची पुस्तिकेत दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक यांनी आपली जाहिरात दि.२०/४/२०१८ पर्यंत पाठवावी/समक्ष आणून द्यावी. ५) आपल्याकडे यावर्षी वधू-वर नसतील तर आपल्या नातेवाईकांमधील इच्छुक वधू-वरांसाठी फॉर्म उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे. ६) नोंदणी करण्यासाठी वधूचे वय १८ वर्षे पूर्ण व वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. ७) ज्या पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना रु.५००/- भरून ती घेता येईल. त्यांना प्रवेश मोफत दिला जाईल. ८) फक्त पुस्तिका नोंदणीविरहित पोस्टाने हवी असल्यास रु. ५००/- अधिक रु. १००/- पोस्टेज खर्च द्यावा लागेल.