प्रा. वसंतराव कर्डिले, प्रधान संपादक तेली समाज सेवक
महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे विद्यमान अध्यक्ष असलेले खासदार रामदास तडस ह्याचे नाव प्रकाशात आले तर इस. १९९५ च्या दरम्यान ! तो पर्यंत वर्धा जिल्ह्यातील देवळीचे हे कार्य केवळ विदर्भ केसरी आणि फार तर देवळी नगरपालिकेचे कर्णधार म्हणुन वर्धा जिल्ह्यापलिकडे फारसे कुणाला माहित नव्हते त्यावेळी शरद पवारांचे सबंधी असलेले माजी मंत्री श्री. दत्ता मेघे ह्याना गुरूस्थानी मानुन स्थानिक राजकारणात उलाढाली करणे कै. प्रभा वसु-राव ह्यांच्या राजकारणाला छेद देयाच काम मेघेंच्या आशिर्वादाने ते करीत होते. पण त्याचवेळी १९९५ च्या दरम्यान वर्धा-चंद्रपुर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार सघातुन विधान परीषदेसाठी आमदारपादाची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी देवळी नगरपालिका संपुर्ण वर्चस्वाखाली असलेल्या तडसानी ती जागा स्वत:साठी पक्षाकडे रीतसर तिकीट मागितले पण लोकमतापेक्षा स्वमताला जास्त भाव देणार्या इकॉंने तडसाना नाकारले. प्रभा रावचा वरचष्मा चालला. शरद पवारही ते कॉंग्रेसच्या राजकारणातील प्रभावी नेते असताना काही करता आले नाही आणि इकॉंने तिकीट त्यावेळी विडी कारखानदार असुन ४०० कोटीचे मालक असलेले लक्ष्मीपती अरविंद पोरेड्डीवार याना मिळाले. पण जातिवंत पैलवान असलेले रामदास तडस थोडेच मागे हटणार ? त्यानी आपले अपक्ष उमेदवारी जाहीर केली. धनशक्तीवर जनशक्तीचे प्रचंड पाठबळ असलेल्या तुटपुंज्या तडसानी जेव्हा बाजी मारली तेव्हा सारा महाराष्ट्र अवाक झाला. शरद पवारानी तडसामध्ये असलेले सुप्त सामर्थ्य जोखले. त्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न चालवला एका झटक्यात महाराष्ट्रातील तेली समाजाच्या क्षितीजावर एक नवा तारा आणि तेली समाजाला आपल्या सुप्त शक्तीचा साक्षात्कार झाला. तेली समाजाचे नेतृत्व म्हणुन तडसांची गणना होऊ लागली आणि मग मडसाच्या कर्तृत्वाचा कहाण्या महाराष्ट्रभार ऐकल्या जाऊ लागल्या मलाही तेव्हांच त्यांच्या कार्य व कर्तुत्वाली तेंव्हाच तोंड ओळख झाली.
तरीही इ. स. २००० उलटुन गेले तरी तडसांचा फारसा संपर्क झाला नव्हता १९९० साली इकॉं फुटून राष्ट्रवादी कॉंग्रेस हा वेगळा पक्ष महाराष्ट्रात उदयाला आला. तेव्हा आपले गुरू दत्ता मेघेबरोबर रामदास तडसही त्या पक्षात दाखल झाले आणी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणुन सन्मानाचे पदी राकॉंने तडसाना बसवले आपली६ वर्षांची आमदारकीची कारकिर्द यशस्वीपणे पुर्ण करून तडस पुन्हा पुर्वीच्याच जागेसाठी त्याच मतदारसंघातुन उभे राहिले आणि दणदणीत बहुमताने निवडून आले. त्यावेळी आमदार तडस जसे शरद पवार व मेघेंच्या नेतृत्वाखाली राजकीय कार्य करीत होते तसेचे कै. केशरकाकु क्षीरसागर यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तेली समाजाचे कार्य करीत होते त्यांनी आपले सवंगडी म्हणुन नाशिकचे श्री. अशोककाका व्यवहारे ह्याना राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवडले होते तसेच नाशिकची तेली समाजाची मुलूखमैदान तोफ आसलेल्या श्री. गजुनना शेलाराना उपाध्यक्ष म्हणुन निवडले होते. त्या काळात तेली समाजाचे प्रबोधन करणारे त्यांच्या स्वाभिमानाला फुंकर घालणारे आणि जागृती करणारे माझे लेख मासिकातुन नियमित प्रसिद्ध होत होते. ते अनेकांच्या नजरेस भरत होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबा आढाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते ऍड. प्रकाश आंबेडकर ओबीसींच्या हक्कासाठी जागर करणारे हनुमंत उपरे माझे लेखन आवर्जुन वाचीत तसेच. आपल्या लेखनातुन, भाषणातुन माझा संदर्भ देत होते. नागपूरमध्ये संताजी महाराजांच्या पुतळ्याची एका माथेफिरूने विटंबना केली तेव्हा नाशिक जिल्हतील तेली समाजाने प्रचंड मोठा निषेध मोर्चा काढला होता. त्यातच २००३ साली तेली समाजाच्या ऐक्याचे दर्शन सर्वपक्षीय राजकारण्याना घडावे आणि इ.स. २००४ साली होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षातून तेली उमेदवाराना जास्ती जास्त सधी मिळावी म्हणुन २१ डिसेंबर २००३ रोजी संताजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन सुदूंबरे येथे तेली समाजाचा महामेळावा घेण्याचे निश्चित झाले किमान ५ लाखाचा समाज त्या दिवशी एकत्र झाला पाहिजे असा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तैलिक महासभेचे व मेळव्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणुन माझी नेमणूक करण्याचा निर्णय तडस, अशोककाका, गजुनाना, के झेड शिंदे, इत्यादीनी घेतला समाजाच्या सर्व प्रसिद्धी माधयमातुन ३-४ महिने मेळाव्याची व्यापक प्रसिद्धी करण्याचे नियोजन करण्यात आले. समाजाची सर्व मासिके तुटपुंज्या अर्थिक पुरावठ्यावर जगत होती. लोकशाहीचा आधारस्तंथ असलेला हा चौथा खांब मजबुत राहिला पाहिजे ह्यासाठी जाहिरात, देणग्या, वर्गणीदार ह्याच्या रूपाने सातत्यान त्यांना रसद पुरवली पाहिजे है वैश्विक सत्य आमच्या जातीचे नेतृत्व करणार्या राजकीय सामाजिक पुढार्यांना उमगले नाही त्यांचे शल्य अजुनही आम्हा संपादकाच्या मनाला बोचते आहे. पुढार्याना मासिकाकडून प्रसिद्धी हवी कैतुक, शबासकी हवी पण मासिके टिकुन राहण्यासाठी त्यांची प्रभावी व विकास होण्यासाठी मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे कर्तव्य आहे. ह्याचे पुरेसे भान त्यांना येईल तेव्हा समाजाची प्रसार माध्यमे सशक्त नक्कीच दिसतील हा आमचा आशावाद त्यांनी खोटा होऊ देऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे.
मेळाव्याच्या तयारीसाठी मी गजुनाना, अशोककाकां, डॉ. महाले, गावोगावी हिंडुन जागृती करीत होतो. मधुन मधुन इतर कार्यकर्ते आमची स्वागत करीत होते. सकाळी ७ ला घरून निघायचे आणि रात्री १२ नंतरच परतायचे तहानभुख विसरन दिवसाकाठी ५ - ६ गावी जाऊन समाज एकत्र करून मेळाव्यात भाग घेण्यासाठी प्रेरणा देत होतो. माझे व गजुनानाची भाषणे म्हणजे समाजाची चेतना जागविणारी तर अशोककाक व डॉ. महाले यांची भाषणे लोकाना नियोजन शिकवणारी होती तेवढ्यात तडसांना निरोप आला की मेळाव्यासाठी आपल्याला काही ठराव तयार करांयचे आहेत. तेथे काम माझ्यावर आले. मी कच्चा मसुदा गजुनानाशी चर्चा करून तयार केला तो गजुनानी तैलिक महासभेच्या मिटंगला नेला. थोड्याफार फेरफारीनंतर त्याला मंजुरी मिळाली मग त्याची पुस्तिका काढण्याचे गजुनांनी मनावर घेतले. वेळ काढून मी त्या ठरावाची हस्तलिखित प्रत तयार केली मग गजुनानी त्याच्या शेकडो प्रती छापून घेतल्या. ३ महिने आमचे प्रचारदौरे व हे काम चालले होते. त्यात आम्ही केवळ नाशिक जिल्हाच पिंजुन काढला असे नाही तर शेजारच्या नगर, ठाणे, धुळे जिल्ह्यातील काही भागालाही जाऊन भिडलो ह्याचा सुखद प्रत्यय मेळाव्याच्या वेळी आला नुसत्या मालेगाव शहरातुन ५ हजार लोक मेळाव्याला आले होते. १०० पेक्षा जास्त खचाखच भरलेल्या बसेस नाशिक शहरातून निघाल्या होत्या. मेळावा कमालीचा यशस्वी झाला. अगदी महाराष्ट्र सी.आय. डी. च्या नोंदीप्रमाणे मेळाव्याला किमान साडे तिन लाख लोक हजर होते. फक्त एकाच गोष्टींने मन थोडे खट्टु झाले ते म्हणजे सभास्थानीच्या मंचावर फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचेेच पुढारी भाव मारून गेले त्यांनी दिलेली आश्वसनेही नंतरही ११ वर्षे सत्तेत असताना कधी पुर्ण केली नाही.
त्यावेळी अनुसुचित जातीची घटनेच्या ३४१ कलमानुसार १ ली सुची, ३४२ कलमांप्रमाणे अनुसुचित जमातीची २ री सुची घटनेच्या पुस्तकात समाविष्ट आहे तशी ३४० कलमा प्रमाणे इतर मागास जाती पैकी काही जातीची ३ री सुची करून इतर दोन सुचीप्रमाणे तिच्यात समाविष्ट असलेल्या जाती जमातीला जगा आरक्षणाच्या पुर्ण सवलती मिळतात तशा ह्या तिसर्या सुचीतला समाजाला ही मिळतील असे आशेचे गाजर दाखवण्यात आले होते. त्या सुचीत तेली जातीचा समावेश व्हावा. ओबीसी तील ३७४३ जातीना जे तुंटपुंजे आरक्षण लाभ मिळत होते त्याएवजी तिसर्या सुचीत मर्यादित जाती समाविष्ट होऊन पुर्ण लाभ मिळतिल म्हणुन आम्ही रान उठवले होते. राष्ट्रवादीच्या औरंगाबादेत झालेल्या अधिवेशनात गजुनानाच्या जोडीला तडसानी हा प्रश्न लावुन तेली जातीचा समावेश झालाच पाहिजे असे शरद पवाराना पटवले होते. तरी मंत्रींडळाच्या बैठकीच्या वेळी तडसाच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक मंत्र्यांना मंत्रालयात जाऊन भेटलो होतो. आणि मंत्रीमंडळाने जी ५० जातींची यादी केंद्राकडे पाठवली त्यामध्ये तेली जात ४९ क्रमांकावर होती पण त्याचवेळी निवडणुकांची आचारसंहिता लागली वाजपेेयीचे राज्य गेले आणि बरोबर तिसरी सुचीही दफन झाली.
त्या नंतर तेली समाजाचा शक्तीगढ असलेल्या विदर्भात तेली समाजाला महामेळावा घ्यावा आसा विचार निघाला. नागपुरचे मैदान मारण्याची जबाबदारी पुन्हा तडसावर सोपवण्यात आली त्या मेळाव्यासाठी भुसावळचे मा. संतोष चौधरी आणि नागपुरचे विजयभाऊ डोंगरे त्यांनी प्रचंड आर्थिक ताकद लावली होय आम्ही पुन्हा एक झंझावात सुरू करणार होतो पण माणसे जमवण्याचे प्रमुख काम विदर्भावर सोडण्यात आले. तरीही नाशिक, नंदुरबार व भुसावळहुन ३ रेल्वे भरून लोक नागपरला गेले. अनेकांनी वैयक्तिक उपस्थिती नोंदवली. पण विदर्भातुन अपेक्षित गर्दी गोळा झाली नाही त्यामुळे सदुंबरेसारखे विराट स्वरूप आले नाही. सर्वपक्षिय नेते येण्याएवजी पुन्हा राष्ट्रवादीचे नेतेच आले. त्यांनतर अनेकवेळा महामेळाव्याच्या घोषणा झाल्या वर्धा, जालना आशा घोषणाही झाल्या पण अजुन काही ३ र्या सुचीप्रमाणे ३ रा तेली राज्य मेळावा प्रत्यक्षात होऊ शकलेला नाही हे आम्हाला नसुटलेले कोडे आहे.
मध्यतंरात वर्धा नदीतुन बरेच पाणी वाहुन गेले पण २००७ - ०८ साली रामदास तडस हे तिसर्यादा पुन्हा त्याच मतदारसघातुन विधान परीषदेला उभे राहिले राज्यात इकॉ.-रा.कॉ. ह्या संकुल आघाडीचे शासन चालु हेाते. ह्यावेळी तडस आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना चंद्रपुरचे खासदार बॅ. नरेश पुगलिया यांनी वर्धा विरूद्ध चंद्रपूर असा जिल्हा वाद उभा केला. दर वेळेला वर्ध्याचाच काय म्हणून ? ह्यावेळी चंद्रपूरचाच म्हणुन त्यांनी स्थानिक अस्मितेला फुंकर घातली. स्वत: इंकॉ.चे नेते.असताना आपल्या पक्षातील स्वत:चा हस्तक जिवेरीद्दुन जव्हेरी ह्याला तडसा विरूद्ध अपक्ष उभे केले. सर्वत्र चाणक्यनीती वापरली मागेही त्याने आपले माजी मंत्री खा. शांताराम पोटदुखे ह्या स्वपक्षिय नेत्या विरुद्ध अपक्ष उमेदवारी करून स्वत: पडल्या बरोबर पोटदुखेना पराभुत करण्याचा आसुरी आनंद मिळवला होता ! आघाडीला फाटाफूट झाल्यामुळे थोड्या मतांनी तडसाचा पराभव झाला. आणि त्यांची विजयाची हॅयट्रीक थोडक्यात हुकली. २००८ मध्ये सर्वत्र २०१४ प्रमाणेच इकॉंविरूद्ध वारे होते. आघाडीत राहुन तडसांना स्व:तचा देवली मतदारसंघात निवडणूक लढवता येणार नव्हती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद हे फक्त शोभेचे बाहुले होते. २००९ च्या निवडणुकीत पक्षांतर केले आणि स्वर्गीय गोपिनाथ मुंडेच्या मैत्रीने देवळीसाठी भाजपाचे तिकीट मिळवले तेथे त्यांची लढत कै. प्रभारावाचे भाचे व मंत्री कांबळेशी होती तडसानी मोठ्या जिद्दीने निवडणूक लढवली. निवडणूक चालू असताना देवळी नगरपालिकेच्या एका प्रकरणा मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला धनशक्ती व शासनशक्तीपुढे निकराची लढत देऊन तडस २ - ३ हजार मतानीच पराभुत झाले. त्याचा नवा घरोबा देश व राज्यस्तरावर पराभुत झाल्यामुळे तेल गेले तुप ही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी तडसांची अवस्था झाली पण तडस हरले नाही. थकले नाही सतत उमेद धरून महाराष्ट्रामधील तेली समाजासाठी कार्य करीतच राहिले.
तैलिक महासभेकडून फारसे धडाकेबाज कार्य होत नसल्यामुळे २०१० मध्ये मी प्रसिद्धीप्रमुखाचे पद सोडुन दिले. गावागावी मडंळीकडून जे समाजकार्य चालू आहे त्याचा आणि तैलिक मिडीयाकडून जे प्रबोधनाचे व हक्क जागृती कार्य चालू होते त्याचा समाजाला अहवाल सादर करीत राहिलो मध्यतरात तैलिक महासभेचे प्रांतिक महासचिव ह्यांचे निधन झाले हाते. माझे चि. डॉ. भुषण हे शिरपूर सोडून नाशिकला प्राचार्यपदी रूजु झाले होते. त्याना धारदार व वक्तृत्वाचा वारसा आहे. हे ओळखून गजानन शेलार ह्यांनी समाजकार्यबरोबर महासभेच्या कार्यात ओढले आणि माझ्या जागी त्यांना प्रसिद्धी प्रमुख नेमले पण शिंदेच्या जागी नेमलेल्या महासचिवांचे व तडसांचे काही पटेना दोघातील वादंग समाजाच्या व्यासपिठावरही गाजण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा त्या महासचिवानी राजिनाम दिला आणि सर्वानुमते प्रचार्य डॉ. भुषण कर्डिले ह्यांची प्रांतिक महासचिव म्हणुन निवड झाली तडसानी आपल्या मनासारखा महासचिव मिळाल्याचा आनंद वाटला.
इ.स. २०१३ च्या मध्यापासुनच २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे नेतृत्व नव्या दमाचे नरेंद्र मोदी करणारे हे स्पष्ट झाले भाजपाचे अनेक बुजुर्ग व पेपर टायगर नेते नाराज झाले तरी मोदीच्या प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला होता. अशा स्थितीत नांदेडचे चिंतन शिबीरे संपवुन एका कार्यक्रमासाठी आम्ही यवतमाळाला आलो तेथे तडसाची गाठ पडली तेथे मी गजुननाना, प्रिया महिंद्रे, डॉ. भुषण कर्डिले व बाकीच्यनी ह्या वेळी आपल्याला हजारो वर्षानंतर दिल्लीच्या राजगादीवर मोदीच्या रूपाने तेली बसवायचा आहे. त्यामुळे वर्धा मतदारसंघातुन खासदारकीसाठी तुम्हाला उभे राहावयाचे आहे. असे बजावले समोर तुमचे गुरू खा. दत्त मेघे वा गुरूबंधु सागर मेघे इकॉं. तर्फे उभे राहिले तरी मागे हटायचे नाही. आम्ही तुम्हाला सर्व मदत दे| पण तडस म्हणाले २०० कोटीच्या मेघे पुढे ५० लाखाचा तडस कसा काय टिकणार ? आम्ही सांगितले ह्यावेळी चमत्कार होणार आहे. मोदीची लाट आहे, अबकी बारी सिर्फ मोदी की सरकार हा नारा प्रभावी ठरणार आहे आणि मोदीना मत देणारा खासदारकीसाठी मत असा आमचा प्रचार राहणार आहे. पहातो विचार करतो असे म्हणत तडस उठले पण २०१४ च्या सुरूवातीपासुनच मोदी लाटेची सुनामी सर्व देशभर पसरली भाजपाचे तिकीट तडसाना जहीर झाले मागच्या ५ वर्षात लोकसभेत महाराष्ट्राचे तेली प्रतीनिधित्व शुन्य होते. ते ह्यावेळी पुन्हा प्रस्थापित करायचे निश्चित झाले होते. ह्याच तेली विरोधी पक्षाने निष्कारण मोदीच्या जातीचा उद्धार केला. मोदींच्या भावानेही आपण तेली असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. बलदंड मेघे पुढे तडस पाचोळ्यासारखे उडून जातील ह्या मग्ररूरीला टोला लावण्यासाठी मा. नरेंद्र मोदीनी महाराष्ट्रातील पक्षाची पहिली प्रचारसभा १८ मार्च २०१४ रोजी वर्धाला घेतली . तिला बलदंड प्रतिसाद मिळाला आणि मग तडसांच्या अंगी बळ संचारले महाराष्ट्रातुन मदतिचा महापुर लोटला. नाशिक जिल्ह्याने गोळा केलेला मदतनिधी घेऊन गजुनानस, अशोककाका, डॉ. भुषणकर्डिले, किशोरचौधरी इत्यादी कार्यकर्ते वर्ध्याला पोहचले. ८ दिवस संपुर्ण जिल्हा फिरले आणि वर्धा जिलह्यातील विविध पक्षनेत्याना तडसांच्या विजयोन महत्व पटवले. पक्षभेद विसरून सारा तेली समाज मोदीच्या विजयासाठी तडसच्या पाठी एकत्र झाला. मतमोजणी सुरू झाली तरी तडसाची धाकधुक चालूच होती कदाचित विजय मिळाला तर १५ - २० हजारांनी मिळेल म्हणत होते. पण मतपटीने चमत्कार दाखवला आणि सागर मेघेचा चक्क २ लाख ३५ हजार मतानी पराभव करून तडस विजयवीर ठरले.
ना. मोदी धरून आता समाजाचे लोकसभेत ७ खासदार आहेत. मोदी सोडुन बाकीच्या ६ खासदाराना तडसानी आता एकत्र केले पाहिजे एक खा. ताम्रध्वज साहु सोडता बाकी सगळे भाजपाचे आहेत ते विविध प्रांतातून आलेले आहेत. त्याचा एक गट बनवून आत संपूर्ण भारतभर फिरून पोटजाती मोडून तेली तेथून सारा एक ह्यासाठी बलिष्ठ सामाजिक संघटन बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कर्तृत्व सिद्ध केले तर मंत्रिपद चालत येईल भिक मागावी लागणार नाही ( महाराष्ट्रातुन अल्पसंख्य ब्राह्मण समाजाचे महत्वपुर्ण खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत हे वास्तव नजरे आड कसे करता येईल.) लोकशाहीत शिरगणती म्हणजे पाठबळासाठी किती डोके पाठीशी आहेत हे फार महत्वाचे ठरते. त्यामुळे अखिल भारतीय पातळीवर जायचे तर पहिल्यांदा तडसांनी अख्खलित हिंदी बोलायला शिकले पाहिजे. कारण त्याशिवाय लोकसभेत प्रभाव पडणार नाही व पक्षनेतृत्वाचे लक्ष जाणार नाही. कठीण असली तरी तोडकी मोडकी इंग्लीश शिकली पाहिजे. कारण आंध्र , केरळ कर्नाटक व तमीळनाडु मध्ये ही आपला समाजल बर्यापैकी आहे. भाषा हे परस्पर संवादाचे अतिशय महत्वपुर्ण माध्यम आहे. भारत जोडो साठी प्रथम भारतातील तेली जोडो हे कार्य सुरू केले पाहिजे. संसद सदस्याला मोफत प्रवास असतो त्याचा फायदा घेऊन समाजाशी संवाद साधण्यासाठी सदैव पायाला भिंगरी लावुन फिरले पाहिजे. मोदींच्या मागे लागून विविध प्रांतातिल तेली समाजाचे प्रश्न सोडवणे त्यांच्यासाठी चांगली कामे करून घेणे ठरणार महत्वाचे त्याशिवाय तेली समाजाचे अनेक प्रश्न लोंबकळत पडले आहे ओबीसींची जातवार जनगणना न झाल्यामुळे तेली समाजाच्या लोकसंख्येची वर्गवारी आणि रचना समजलेली नाही जर ३ री सुची होत नाही तर भारताच्या सर्व प्रांतातील तेली एकाच प्रवर्गात आले पाहिजे ह्यासाठी केंद्रीय यादीमध्ये तरी हिमाचल प्रदेशा प्रमाणे तेल्यांना अनुसुचित जाती (एस.सी.) असावेत म्हणुन प्रयत्न केले पाहिजेत तेली समाजाची अस्मिता जागवण्यासाठी तैलिक मिडीया जी जिवापाड तडफड करीत आहे. त्याच्या मदतीसाठी आणि त्याचे अखिल भारतीय लुज फेडरेशन बनवण्यासाठी मदत केली पाहिजे. प्रश्न अनेक आहेत सोडवायला सुरूवात करा. थोडे सोडवले तरी पुढच्या निवडणुकीमध्ये विजय त्याचाच आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.